बीट द ड्रम

By admin | Published: November 3, 2016 06:15 PM2016-11-03T18:15:35+5:302016-11-03T18:15:35+5:30

नायजेरीअस परकशनिस्ट बाबाटुंडे ओलाटुंजी यांनी ‘ड्रम्स आॅफ पॅशन’ नावाचा आपला अल्बम रिलीज केला आणि त्यावेळी पहिल्यांदा पाश्चिमात्य जगात आफ्रिकन म्युझिक लोकप्रिय झालं..

Beat The Drum | बीट द ड्रम

बीट द ड्रम

Next
>- मयूर देवकर
 
ड्रम. या शब्दाला खरंतर अनेक छटा आहेत. त्यामागे मोठा इतिहास-भूगोल आहे..त्यात जायचं काही कारण नाही..पण थोडक्यात सांगायचं तर १९६० ची ही गोष्ट असेल. नायजेरीअस परकशनिस्ट बाबाटुंडे ओलाटुंजी यांनी ‘ड्रम्स आॅफ पॅशन’ नावाचा आपला अल्बम रिलीज केला आणि त्यावेळी पहिल्यांदा पाश्चिमात्य जगात आफ्रिकन म्युझिक लोकप्रिय झालं..
कृष्णवर्णीयांच्या संघर्षाचा तो एक मोठा टप्पा होता..जो आजही ‘यादगार’ मानला जातो..काळ बदलतो, आणि बदलताना काही जखमा नव्यानं देतो..जगभर सध्या निर्वासितांचे प्रश्न आहेत..त्यांची भेदरलेली विनासहारा मनं आहेत..त्यांना थोडा आनंद मिळावा म्हणून ‘ड्रम’ मदत करतील, करू शकतील का असा प्रयत्न काही जागतिक संस्था करत आहेत..हे सारं आठवण्याचं कारण की, हा महिना म्हणजे नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय ड्रम मंथ म्हणून साजरा होतो आहे.. काय असतो ड्रम? फक्त काही वाद्यं? त्यावरचे बिट्स. ड्रमरचा अ‍ॅटिट्यूड? बॅण्डनं स्टेजवर लावलेली आग? हे सारं तर असतंच असतं.. पण त्याहून महत्त्वाचं असतं, ड्रमरनं आनंदी असणं..त्याचा आनंद चेहऱ्यावर दिसणं..वादनात त्याचं आणि वाद्याचं एक होणं.आणि ते वाजवत असताना असं वाजवणं की, मनावरची सारी ओझी जणू खाली उतरवून ठेवली आहेत.. ध्वनी आहे तो केवळ वाद्यांचा, साऱ्या अवकाशात भारून उरलेला..इतर वादकांशी मेळ आहे, ताल जुळतोय..पण तरीही ड्रमर आपली अशी एक खास दुनिया वादनातून निर्माण करतो..इतका एक्सायटेड असतो.. आत्यंतिक ऊर्जेनं भरलेला की, ती ऊर्जा पाहून ऐकणाऱ्याच्या मनात ऊर्जेचे निखारे चेतावेत..ड्रमरच्या त्याच पॅशनेट, अत्यंत ऊर्जेच्या एक्सायटिंग जगाची ही एक खास सफर.. कारण ड्रम्सची क्रेझ भारतीय तरुणांमध्येही वाढते आहेच.. आणि ती आता मोठ्या शहरातून उतरत छोट्या शहरातही आपला बीट अचूक पकडते आहे.. त्याविषयी

Web Title: Beat The Drum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.