तेरे मेरे बीच में.

By admin | Published: January 8, 2015 09:12 PM2015-01-08T21:12:48+5:302015-01-08T21:12:48+5:30

जेवलास का? उठलास का? कुठे गेलास? कुठून आलास? कुणाशी बोलतोहेस? कुणासोबत आहे? सलग १७ मिण्टं तू माझा कॉल वेटिंगवर कसा काय ठेवू शकतोस?

Between you and me | तेरे मेरे बीच में.

तेरे मेरे बीच में.

Next

 

आजच्या ‘तरुण’  लव्हस्टोरीतला ‘सबसे बडा व्हीलन’ - मोबाईल!
 
‘प्यार से डर नहीं लगता, 
मोबाईल से लगता है.’
असं का म्हणताहेत 
प्रेमात पडलेली तरुण जोडपी?
 
***
ते म्हणतात, ‘मिस यू’,‘लव्ह यू’‘किस यू’पण म्हणजे त्यांना तेच म्हणायचं नसतं? बळजबरीनं  असं म्हणावं लागतं, कारण तसं म्हटलं नाही, तर  भांडण होतं.होतंच! सतत होतं, दिवसाला ५ तास, आठवड्यातून तीनदा भांडण होतंच.
कशामुळे? 
***
जेवलास का? उठलास का? कुठे गेलास? कुठून आलास? कुणाशी बोलतोहेस?
कुणासोबत आहे? सलग १७ मिण्टं  तू माझा कॉल वेटिंगवर कसा काय ठेवू शकतोस?
-ती  जाब विचारते, आणि त्याच्याकडे नसतंच उत्तर!का?
 
***
तो हौशीनं मिळवतो तिचा नंबर, जाम इम्प्रेस मारतो, फॉरवर्ड करतो,गुडमॉर्निंग, गुडनाईट मिसकॉलही  करतो.तुझा आवाज ऐकत रहावासा वाटतो म्हणतो,आणि मग 
तिचं नाव जरी झळकलं,स्क्रिनवर तरी त्याचा मोबाईल ढपतो.
तो फोनच उचलत नाही.का?
***
एक मोबाईल लव्हस्टोरीला एकदम ट्रॅजेडीच बनवून टाकतो,त्या ट्रॅजेडीत असतो फक्त मेलोड्रामा,
रडारड आणि अँक्शन शाब्दिक मारामारीची.? कशामुळे?
 
***
याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा एक खास विशेषांक.
महाराष्ट्र-गोवा या दोन राज्यातल्या  तरुण वाचक मित्रमैत्रिणींनी 
‘शेअर’ केलेल्या  भंजाळलेल्यामोबाईल लव्हस्टोरीची.जिचं ‘हॅपी एण्डिंग’ 
कधीच होत नाही. ‘यू, मी   मोबाईल’
संकलन-लेखन
-ऑक्सिजन टीम
 

Web Title: Between you and me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.