लाइक्सच्या नादात फसताय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:24 PM2018-11-22T15:24:17+5:302018-11-22T15:24:32+5:30

कमेण्टाकमेण्टी आणि लाइकचा असा चक्रव्यूह की, माणूस गुंतत जातो. फसतोही. पण जागा होतो तेव्हा आभासी दुनियेतले हे जीवलग असतात कुठं?

beware- social media is a trap.. | लाइक्सच्या नादात फसताय का?

लाइक्सच्या नादात फसताय का?

Next
ठळक मुद्देहे जग समजायला वाटतं तितकं सोपं नाही!

 - श्रीनिवास गेडाम

फेसबुक. आता फेसबुक माहीत नाही अशी व्यक्ती मिळणं जरा कठीणच आहे. या फेसबुकवर समाजातील चांगल्या-वाईट गोष्टींचं प्रतिबिंब उमटल्याशिवाय राहात नाही. समाज नेमका कसा आहे हे फेसबुक दाखवतं. एका अर्थानं फेसबुक हा समाजाचा आरसाच आहे.
या फेसबुकवर काय लिहिलं हे बघण्यापेक्षा कुणी लिहिलं याला लोक जास्त महत्त्व देतात. तुमचा स्वतर्‍चा कंपू नसेल तर दोन-चार लाइकच्या पलीकडे तुम्हाला कुणी लाइक करत नाही असा माझा अनुभव. एखाद्या सुंदर पोरीनं ‘आज थोडं उशिरा  उठले सकाळी!’ एवढं जरी म्हटलं तरी तिला वाह, मस्त, बढीया म्हणणार्‍या (आंबट) शौकिनांची कमी नसते. नुसता फोटो जरी टाकला तरी ढीगभर लाइक्स नि कमेण्ट.
एका तिशीतल्या तरुणीनं दारावर आलेल्या भिकार्‍याला जुने कपडे देऊन त्याच्या सोबत फोटो काढला आणि तो फेसबुकवर टाकला. तिच्या नेहमीच्या चाहत्यांनी तिला साक्षात देवीचा दर्जाच देऊन टाकला. या सुंदर स्त्नीऐवजी एखाद्या पुरुषानं जर हे काम केलं असतं तर? याच लोकांनी त्याची खिल्ली उडवली असती हे नक्की!
 फेसबुकवर काहीजण भिष्म पितामहासारखे असतात. ते लाइक घेण्याचं काम करतात. ते स्वतर्‍च्याच तोर्‍यात. वयानं, अधिकारानं मोठे. दुसर्‍यांना चांगलं म्हणणं त्यांच्या गावीही नसतं! एकप्रकारचे फेसबुकवरील ते दादाच असतात. त्यांच्या पोस्टही भयानक असतात. सहसा कुणी त्यांच्या वाटय़ाला जात नाही. जातीपातीवरून इथे खूप भांडणं होतात. एकदम अश्लील भाषेत प्रत्युत्तर दिलं जातं. ते वाचलं तरी अंगावर शहारे येतात! 
कॉमेण्ट्स करणार्‍यांच्या वेगवेगळ्या तर्‍हाही इथं पाहायला मिळतात. कुणी पोस्ट न बघताच लाइक करतं. काहींना पोस्ट कळत नाही तरी लाइक करतात. काहीजण सहसा कुठलीच कामेण्ट करत नाही, लाइकही करत नाहीत, मौनी बाबा बनून राहतात; पण जरा कुठे संधी मिळाली की कोंडीत पकडून गळा आवळायला मागेपुढे बघत नाही. लिहिणं जमत नाही पण कामेण्ट्स करून आपलं ज्ञान पाझळणारेही काही महाभाग असतात. 
असे अनेक  ट्रेण्ड इथं दिसतात; पण मला एक गोष्ट आवजरून सांगायची आहे. फेसबुकवर काहीजण काही दिवस खूप जवळीक दाखवतात. आश्वासनं देतात. खूप दोस्ती. खूप प्रेम. असं वाटतं एकदम जीवाला जिवलग मिळाले. मलाही काही अशीच गायक मंडळी फेसबुकवर मिळाली होती. त्यांनी स्वतर्‍च माझ्या  गजलांना, गाण्यांना स्वरबद्ध करण्याचं आश्वासन दिलं होतं. पुढे ते कुठे गडप झाले कळलंच नाही!
 फेसबुकवर प्रेम वगैरे होतं याचा मला तरी अनुभव आला नाही. पण शेरोशायरीचा थोडाबहुत मलाही नाद असल्यानं मी फेसबुकवर एका तरुणीच्या शेरोशायरीला उत्तर द्यायला लागलो. फेसबुकचा त्यावेळी कुठलाही अनुभव मला नव्हता. मी एकदम नवीन होतो. माझ्या  शेरोशायरीच्या  कमेण्टाकमेण्टीमुळे सुरुवातीला तरुणी चिडली पण नंतर आमच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं. फेसबुकवाल्यांनी तर आमची जोडीच बनवून टाकली होती. पुढे मीच यातून सुटका करून घेतली.  
फेसबुकवर काही वाईट अनुभव आले तसेच चांगले  अनुभव पण आलेत. फेसबुवर मला दोन जीवाभावाची माणसं भेटली; पण ते थोडेच. बाकी एकूण मामला जरा डेंजरच. 
हे जग समजायला वाटतं तितकं सोपं नाही!


 

Web Title: beware- social media is a trap..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.