बिल गेट्स म्हणतात, माझ्यासारखं वागू नका !

By admin | Published: June 18, 2015 05:08 PM2015-06-18T17:08:40+5:302015-06-18T17:08:40+5:30

मी जे केलं ते तुम्ही करु नका. अजिबात करू नका. माझ्यासारखं होऊ नका ! शिक्षण अर्धवट सोडू नका. किमान पदवीर्पयतचं शिक्षण तरी तुमच्याकडे हवंच ! नाहीतर गरिबीत खितपत पडाल !

Bill Gates says, do not act like me! | बिल गेट्स म्हणतात, माझ्यासारखं वागू नका !

बिल गेट्स म्हणतात, माझ्यासारखं वागू नका !

Next
>मी जे केलं ते तुम्ही करू नका. 
अजिबात करु नका.
माझ्यासारखं होऊ नका !! म्हणजे काय तर शिक्षण अर्धवट सोडू नका. किमान पदवीर्पयतचं शिक्षण तरी तुमच्याकडे हवंच ! जो आवडतो तो विषय निवडा, त्याचं शिक्षण घ्या, पण किमान पदवी तरी घ्याच !
उच्चशिक्षणाविषयी एक प्रकारची उदासीनता सध्या दिसते आहे. नाही शिक्षण पूर्ण केलं, नसेल पदवी तरी काही बिघडत नाही असा अकारण आत्मविश्वास मुलांमधे येणं हेच घातक आहे !
अमेरिकेसारख्या देशात तर फारच घातक. 
ड्रॉपआऊट असणं हे काही फॅशनेबल नाही, हे लक्षात ठेवा. मी शिक्षण अर्धवट सोडलं, नाही पूर्ण केलं, काहीतरी वेगळं करून दाखवलं म्हणून माझं कौतुक होतं आहे.
पण बाकीचे ड्रॉपआऊट? त्यांचं काय? ते कसे जगताहेत कुणी विचारतं का?
यंदा अमेरिकेच्या विद्यापीठांतून 2क् लाख तरुण ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडताहेत याचा मला विलक्षण आनंद होतो आहे.
मी स्वत: ग्रॅज्युएट होऊ शकलो नाही, याचं अजूनही मला वाईट वाटतं. अमेरिकेतलं कॉलेज ड्रॉपआऊट्सचं प्रमाण चिंताजनक आहे. मला भीती वाटते की शिक्षण अर्धवट सोडलेली ही मुलं भविष्यात करतील काय?
आजच्याच घडीला अमेरिकन मनुष्यबळात पदवीधर मनुष्यबळाचा तुटवडा जाणवतो आहे. 
येत्या 2025 पर्यंत अमेरिकेतल्या दोन तृतीयांश नोक:यांसाठी पदवी ही किमान पात्रता गृहीत धरली जाईल. हायस्कूलच्या पलीकडच्या शिक्षणाला महत्त्व येईल. काही नोक:यांना तर पदवीसह व्यावसायिक प्रमाणपत्रंचीही गरज पडेल !
अशावेळी कॉलेज ड्रॉपआऊट काय करतील? आपल्या करिअरचा विचार कसा करतील?
आजच्या घडीला शिक्षण अर्धवट सोडणा:यांत अल्पउत्पन्न गटातील एक मोठा वर्ग आहे. आणि शिक्षणच घेतलं नाही तर त्यांचं वरच्या स्तरात सरकण्याचं स्वपAही अर्धवटच राहील.  गरिबीच्या दुष्टचक्रात ते ढकलले जातील. केवळ त्यांच्याकडे कौशल्य नाही, पदवी नाही म्हणून त्यांच्या हातांचं काम दुस:या पदवीधर मुलांना मिळेल. आणि देशात आर्थिक विषमताही अधिक वाढेल !
शिक्षण-पदवी आणि कौशल्याधारित शिक्षण या वाटेनं प्रवास केला तरच करिअर उभं राहू शकेल. नुस्ता हा कोर्स करून पाहू, तो करू, एखादा ऑनलाइन कोर्स करू, काहीतरी कम्प्युटर शिकू अशी धरसोड करू नका. 
जे शिकायचं ते मनापासून शिका, कौशल्य कमवा. आणि आपलं शिक्षण पूर्ण करा. किमान ग्रॅज्युएट तरी व्हाच !
अमेरिकेसारख्या आपल्या देशात हा प्रश्नच नाहीये की लोक कॉलेजात जात नाहीत, प्रश्न हा आहे की, जे कॉलेजात जातात ते आपली पदवी पूर्ण करत नाहीत. अमेरिकेतल्या काम करू शकणा:या म्हणजेच वर्किगएज मनुष्यबळापैकी एक पंचमांश लोक असे आहेत की ज्यांनी कॉलेजात प्रवेश तर घेतला होता पण त्यांनी शिक्षण पूर्ण केलंच नाही !
तुम्ही असं करू नका. शिक्षण पूर्ण करणं, उत्तम शिक्षण घेणं ही आपल्या करिअरच्या दृष्टीनं एक संधी आहे, एक एण्ट्री पास आहे हे कायम लक्षात ठेवा !
तरच येत्या काळाच्या स्पर्धेत टिकाल आणि तरुनही जाल !
म्हणूनच म्हणतो की, माङयासारखं करू नका, शिक्षण अर्धवट सोडू नका !
- बिल गेट्स
***
अमेरिकेतल्या विद्याथ्र्याना बिल गेट्स यांनी दिलेला हा कळकळीचा सल्ला ! शिकागो सिटी कॉलेजच्या कुलगुरू शेरील हीमॅन यांना दिलेल्या मुलाखतीत गेट्स यांनी हा संदेश दिला. शेरील यांच्या कॉलेजातील बहुसंख्य अधिक मुलं शिक्षण अर्धवट सोडतात. अमेरिकेत तसंही फक्त 5क् टक्के विद्यार्थीच ग्रॅज्युएशन पूर्ण करतात. या विद्याथ्र्याना शिक्षणाचं आणि पदवीचं महत्त्व पटावं म्हणून दिलेल्या मुलाखतीचा हा संपादित सारांश. सल्ला अमेरिकन विद्याथ्र्यासाठी असला, तरी आपल्यालाही तो अचूक लागू पडावा !
 

Web Title: Bill Gates says, do not act like me!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.