रात्र रात्र जागताय? झोप गेली उडत म्हणता? सावधान..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 05:26 PM2020-08-20T17:26:35+5:302020-08-20T17:31:40+5:30

नाइट मारली? फुल जागरण केलं, असं आपण किती अभिमानानं सांगतो; पण झोपेची कमतरता, रोज रात्र रात्र जागरण हे सारं आपल्या शारीरिक -मानसिक आरोग्यासाठी घातक आहे, हे कधी लक्षातच घेत नाही.

Binge watching? no sleep at all? Be careful ..its dengerous. | रात्र रात्र जागताय? झोप गेली उडत म्हणता? सावधान..

रात्र रात्र जागताय? झोप गेली उडत म्हणता? सावधान..

Next
ठळक मुद्दे झोप उडाली की उडवली?

प्राची पाठक

‘नाइट मारली’..
 हा शब्द तसा सगळेच वापरतात.
नाइट मारणं वगैरे प्रकार कॉलेजात खूप केलेले असतात. अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीर्पयत अभ्यास तुंबून ठेवायचा.
 आज करू, उद्या करू म्हणत. मग परीक्षेच्या आदल्या रात्नी जागून जशी जमेल तशी तयारी करून परीक्षा द्यायची. 
त्यात काही गडबड झाली की परत म्हणता येतं, रात्नी झोप नीट झाली नाही, तर काही आठवलंच नाही!
आणि त्या परीक्षेत पास झालं तर प्रौढीने सांगता येतं, मी तर केवळ एकच नाइट मारली!
म्हणजे, त्या त्या विषयांत आपल्याला खरोखर काही आवड आहे का, त्यात नवीन काय काय आपण आनंद घेत शिकलो, हे सोडून किती स्वस्तात तो विषय काढला आणि मार्क मिळवले, अशा गमजा वरतून.
सध्याच्या लॉकडाऊन काळात आपण काय करतोय? 


अनेकजण सध्या पूर्णवेळ घरी आहेत. कोणी घरूनच काम करत आहेत. कोणी घरूनच घरची आणि ऑफिसची अशी दोन्ही कामं करत आहेत. कोणी घरून शिक्षण घेत आहेत. बाहेर जाणं केवळ गरजेपुरतं उरलेलं आहे. असं असूनही आपला दिवस एरव्हीपेक्षा उशिरा सुरू होतोय का? घरीच तर आहोत तर अमुक गोष्ट करू केव्हाही, असं होतंय का? 
आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा जरा पुढे सरकल्या आहेत का? खाणं एरव्हीपेक्षा वाढलं आहे का? 
सतत काहीतरी चवीचं पाहिजे बाबा, अशी ओढ लागली आहे का? 
आख्खा दिवस आळसात काढल्यावर संध्याकाळी उशिरा किंवा जवळपास रात्नीच आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर काहीतरी मजेदार पाहायचं राहून गेलंय, असं आठवतं. 
मग सुरू होतं मोबाइलमध्ये किंवा टीव्हीवर रात्न रात्न जागून काहीतरी पाहत बसणं. सोशल नेटवर्किग साइट्सवर काहीतरी उगाचच सर्फ करत बसणं सुरू होतं. 
समजा, तिथे काही वेळ घालवायचाच आहे, तर दिवसा ते पाहता आलंच असतं; पण ते नाही. 
आपला दिवसच संध्याकाळी, रात्नी उजाडतो आणि वेळ जात जात मध्यरात्न कशी होते, तेच कळत नाही. 
उशिरा झोपलं की उशिरा उठणं ओघाने आलंच. 
मग उठायला दहा वाजणार आणि हे चक्र  असंच सुरू राहणार. 
अगदी मित्नांशी बोलायलादेखील रात्नीच हुक्की येणार. एका फोन कॉलवर तासन्तास बोलत वेळ कसा गेला, तेच कळणार नाही. 
मुळात, आपण तर दिवसभर विशेष काही करत नाही आहोत. जे काय करत असू, त्यात या गोष्टींचा वेळ काढता येतोच; पण ते सोडून आपण रात्नी जागवत बसलेलो असतो. हे अगदीच सहज होऊन जातं. 
अनेकदा काही कामाची गडबड असेल, तर त्याचा पहिला टोल कशावर फाडला जात असेल, तर तो झोपेवर.
 मी रात्नी जागून हे काम करून देईन, हे आपण चटकन म्हणतो. 
झोप ही आपल्यासाठी कितीही आवश्यक असली आणि त्याविषयीचे पन्नास, शंभर फॉरवर्ड्स आपण वाचलेले असले, तरीही आपण चटकन झोप कॉम्प्रोमाइझ करून टाकतो.
 माणसाला उत्तम आरोग्य राखायचं असेल, तर झोपेला पर्याय नसतो. 
झोपेला कोणताही शॉर्टकटदेखील नसतो. 
आपल्या शरीर-मनाला तजेला देण्याचं काम झोपेमुळे होतं. 
मेंदू आपल्या रोजच्या घडामोडी, आठवणी, माहिती नीट प्रोसेस करून डोक्यात सेव्ह करायचं कामदेखील झोपेतच करतो. 
इतकंच काय, सध्या जे प्रतिकारशक्ती, इम्युनिटी वगैरे सारखं बोललं जातं, ते उत्तम राखण्यासाठीदेखील झोपच आवश्यक असते, शरीराला आणि मनालाही.

‘लवकर निजे, लवकर उठे, धनसंपदा त्याला मिळे’, हे वाक्य कितीही बाळबोध संस्कारी गटात मोडणारं वाटलं तरीही ते अतिशय खरं आहे. 
आपल्याला नवीन काही शिकायचं असेल, तर ते शोषून घ्यायला मेंदू अतिशय ताजातवाना हवा. 
आपण खूप प्रयत्नाने ते शिकलो की त्यानंतर मेंदूमध्ये त्या माहितीवर 
प्रक्रि या होते. त्यासाठीसुद्धा पुढची झोप आवश्यक असते.
 मनाची एकाग्रता साधल्याशिवाय नवीन काहीच उत्तमरीत्या, चटकन असं शिकता येणार नाही. शरीर काहीतरी कुरबुर करत राहील. 
आपल्याला अमुक गोष्ट समजली आहे, असं तेव्हा पुरतं वाटेल; पण नंतर मात्न काहीच आठवणार नाही. 
एरव्ही जे आपण फ्रेश मूडमध्ये चटकन करू, तेच करायला व्यवस्थित झोप झाली नसेल, तर जास्त वेळ लागतो, हे आपल्या लक्षात येईल. 
त्याने पुढचा दिवस आळसात जाईल ते आणखीन वेगळंच! 
आपण शब्दश: हँग होऊन जाऊ. 
उगाच चिडचिड, कामात लक्ष न लागणं, एकही काम धड न होणं, हे 
चक्र च सुरू होईल. 
खूप काही इमर्जन्सी असेल आणि त्यामुळे क्वचित कधी झोप उडाली, झोप नीट घेता आली नाही, तर वेगळी गोष्ट आहे. 
पण रोजच्या रोजच आपण झोपेच्या एकूण वेळात आणि दर्जात कपात करायला गेलो, तर त्या न मिळालेल्या झोपेचं करायचं काय, हे आपल्या शरीराला कळतच नाही. 
माणसाच्या शरीरात झोप न मिळाल्यावर शरीराने कोणते उपाय शोधून त्यावर मात करून पुढे चालावं, असं काही सांगणारं सर्किटच नाहीये. 
दुसरी गोष्ट म्हणजे न मिळालेली झोप अशी एकदम चार दिवस लोळून काढत भरून काढता येत नाही. 
हे म्हणजे काहीच गरज नसताना महिनाभर उपाशी राहायचं आणि एखाद्या दिवशी सगळ्या महिनाभराचं जेवून घ्यायचं, असं करणं होईल. 
ते जितकं अशक्य असेल, तितकीच अशक्य राहून गेलेली झोप भरून काढणं असतं. 
ती रोजची रोजच भरून काढावी लागते. 
म्हणूनच, आपलं झोपेचं शेडय़ूल नीट तपासू. त्यात काय काय आव्हानं आहेत, ते बघू. 
झोपेचं एक वेळापत्नकच तयार करू. पलंगावर पडल्या पडल्या झोप आलीच पाहिजे, अशी स्वत:ला सवय लावू. 
ते सगळं कसं करायचं, हे पुढील लेखात जाणून घेऊ. 
तोवर आधी आपल्या झोपेला आपल्याच विचारांच्या स्कॅनरखाली स्कॅन करूया. 
आपल्या एकूणच झोपेविषयी काही निरीक्षणं नोंदवून ठेवूया. 
नाइट मारली वगैरे प्रकार झोप नाही, तर आपलं एकूणच स्वास्थ्यच खराब करणार आहेत, हे लक्षात घेऊया..  
त्यामुळे आपल्या झोपेला असं वेठीस धरू नका.


 

Web Title: Binge watching? no sleep at all? Be careful ..its dengerous.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.