बायोनिक बॉडी सूट
By admin | Published: January 7, 2016 10:03 PM2016-01-07T22:03:12+5:302016-01-07T22:03:12+5:30
आयुष आणि अर्णव एकाच शाळेत शिकतात. हरिद्वारलाच राहत असल्यानं नियमित गंगा आरतीलाही जातात. तिथं गंगा घाटावर अनेक विकलांग
Next
>- आयुष गुप्ता, अर्णव शर्मा
इयत्ता बारावी, हरिद्वार, उत्तराखंड
आयुष आणि अर्णव एकाच शाळेत शिकतात. हरिद्वारलाच राहत असल्यानं नियमित गंगा आरतीलाही जातात. तिथं गंगा घाटावर अनेक विकलांग भिकारी त्यांना दिसत. त्यापैकी अनेकांना तर हातही नाहीत. या मुलांना रोज ते दृश्य पाहून त्रस व्हायचा. त्याच काळात त्यांनी आयर्न मॅन नावाचा सिनेमा पाहिला. त्यातला रोबोटिक सूट पाहिला. त्यांना वाटलं अशी मेकॅनिकल बॉडी या घाटावरच्या भिका:यांना देता आली तर? त्यांचं आयुष्य सोपं होईल. मग त्यांनी कुठून कुठून रिसायकल मटेरिअल मिळवलं आणि एक बायोटिक सूटच तयार केला. ज्यांना हात नाही त्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल अशी त्यांची कल्पना.
आयुष म्हणतो, ‘मला वेगवेगळे रोबोट बनवायचे आहेत. असे रोबोट जे माणसांची कामं सहज करतील. त्यातूनच मला या सूटची कल्पना सुचली आणि वाटलं की, ज्यांना अवयव नाहीत त्यांच्यासाठी असा बॉडी सूट बनवावा.’
अर्णव म्हणतो, ‘माङया वडिलांचं मोटर रिपेअर करण्याचं वर्कशॉप आहे. त्यात मी काही काही शिकतो, त्यातूनच ही आयडिया आम्ही प्रत्यक्षात उतरवली.’