BLACK - पावसाळ्यात काळ्या रंगाची फॅशनेबल जादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:48 PM2019-07-11T13:48:15+5:302019-07-11T13:48:30+5:30

काळा रंग कुणालाही शोभूनच दिसतो; पण बर्‍याच जणांना काळा रंग आवडत नाही. 

Black - fashionable magic in the rainy season! | BLACK - पावसाळ्यात काळ्या रंगाची फॅशनेबल जादू!

BLACK - पावसाळ्यात काळ्या रंगाची फॅशनेबल जादू!

Next
ठळक मुद्देपावसाळा कलरफुल होऊ शकतो!

- निकिता महाजन

तुमच्याकडे काळ्या रंगाचा ड्रेस आहे का? हल्ली पाहा तमाम सेलिब्रिटी अनेकदा पाटर्य़ाना, फंक्शनला काळा ड्रेस घालतात. काहीतर आपलं स्टाइल स्टेटमेण्ट उघडं पडू नये, कुठं कोणता रंग शोभेल याचा खल करत राहू नये यासाठीही सर्रास काळे कपडे घालतात. रात्रीच्या कार्यक्रमात हल्ली कापरेरेटमध्येही सर्रास काळ्या रंगाचे कपडे घातले जातात.
आपण सामान्य माणसंच फक्त काळं पटकन घालत नाही. सणवाराला नाही, उत्सवाला नाही, कुणाच्या लग्नात तर नाहीच नाही. उगीच कुणाला वाटेल की हे काय निषेधाचे झेंडे म्हणूनही काळे कपडे टाळले जातात.
त्यात अनेक मुलींना आणि आता मुलांनाही आपल्या काळ्या-सावळ्या रंगाचा भयानक न्यूनगंड असतो. त्यामुळे काळे कपडे घालून आपण फारच काळे दिसू अशी विचित्र आणि अत्यंत चुकीची भिती अनेकांच्या मनात असते. खरं तर तसं काही नाही. तो एक गैरसमजच म्हणायला हवा.
काळा रंग कुणालाही शोभूनच दिसतो; पण बर्‍याच जणांना काळा रंग आवडत नाही. 
त्यातूनच एक समज करून घेतला जातो की पावसात तर काळे कपडे नकोच. जसे पांढरे नको. चिखल उडण्याची भीती. डाग निघत नाही. तसंच काळे नको. उगीच कुंद हवा. डल वातावरण त्यात काळ्या कपडय़ांनी उदास वाटतं असाही गैरसमज अनेकजण वर्षानुवर्षे पोसतात. पावसाळ्यात चमकदार रंगांचे कपडे घालावेत असं म्हणतात ते खरंही आहे; पण म्हणून काळा रंग वापरूच नये असं काही नाही. 
पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, या पावसाळ्यात काळ्या रंगाची आणि काळ्या-पांढर्‍या-पिवळ्या रंगांची मिक्स मॅच जादू तुम्हाला एक फ्रेश लूक देऊ शकते. कॉण्ट्रास्ट मॅचिंग हल्ली चर्चेत आहे. स्ट्रीट फॅशन ते सेलिब्रिटी फॅशन सगळीकडे कॉण्ट्रास्ट कलर वापरले जातात. त्यामुळे पावसाळ्यात कपडे न वाळणे, एकच ड्रेस मिक्स मॅच करणे, लेअरिंग करणे यासाठी काळ्या रंगाचा हात धरून कॉण्ट्रास्ट मॅचिंग करून पाहा. पावसाळ्यातही स्टायलिश रंगांचं इंद्रधनू छान बहरून येईल.

1) काळी ब्लॅक पॅण्ट, लेगिन्स, सलवार असं काहीही घातलं तरी त्याच्यावरचा एक ब्राइट कुर्ता किंवा एकदम मोठं, कलरफुल मण्यामण्याचं गळ्यातलं किंवा मोठं कानातलं तुमचं लूक बदलू शकतं.
2) लेअरचा एक ट्रेण्ड आहे.  शर्ट, शर्टवर श्रग, जॅकेट, लॉँग जॅकेट, स्ट्रोल असं लेअरिंग आणि एक ब्राइट रंग, एक काळा, एक पिवळा, केशरी असं केलं तरी फ्रेश वाटू शकतं.
3) काळ्या रंगाच्या चपला आणि पायात कलरफुल अ‍ॅँकलेट हे कॉम्बिनेशन उत्तम.
4) तेच बांगडय़ा किंवा ब्रेसलेटचंही. काळ्या रंगाची सलवार आणि कलरफुल बांगडय़ा, एखादा फेंट प्लेन कुर्ता हे उत्तम दिसतं.
5) काळ्या छत्र्या, त्यावर आपलं नाव पेंटनं कलर करणं हे तर सगळ्यात भारी.

 

Web Title: Black - fashionable magic in the rainy season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.