#BlackLiveslivesMatter

By admin | Published: April 7, 2017 06:47 PM2017-04-07T18:47:09+5:302017-04-07T18:47:09+5:30

उत्तरं माहिती नाही तरीही उत्तर पत्रिकेला पुरवण्या जोडणारे आणि सिनेमाच्या कथा लिहून काढणारे आपल्याकडे वस्ताद काही कमी नाहीत. पण अमेरिकेत?

#BlackLiveslivesMatter | #BlackLiveslivesMatter

#BlackLiveslivesMatter

Next

- आॅक्सिजन टीम

१८ वर्षाच्या तरुण मुलानं प्रवेश अर्जात १०० वेळा का लिहिले हे शब्द?

उत्तरं माहिती नाही तरीही उत्तर पत्रिकेला पुरवण्या जोडणारे आणि सिनेमाच्या कथा लिहून काढणारे आपल्याकडे वस्ताद काही कमी नाहीत. पण अमेरिकेत?
अमेरिकेत एका १८ वर्षाच्या बांग्लादेशी अमेरिकन मुस्लीम मुलानं प्रवेश अर्जात असं काही लिहिलं की ते वाचून प्रतिष्ठित स्टॅनफर्ड विद्यापीठानं त्याला प्रवेश तर दिलाच पण त्याचं मनापासून कौतूकही केलं.
झियाद अहमद असं या तरुण मुलाचं नाव. झियादनं स्टॅनफर्ड विद्यापिठात प्रवेश अर्ज केला. प्रवेश परीक्षेत त्याला अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारण्यात आला. 
‘व्हॉट मॅटर्स टू यू अ‍ॅण्ड व्हाय?’
या प्रश्नाचं उत्तर म्हणून झियादनं #BlackLiveslivesMatter असं शंभरवेळा लिहून काढलं. आपल्याला प्रवेश मिळेल की नाही याचा विचार न करता जे आपल्याला महत्वाचं वाटतं ते लिहिणं आणि निर्भिडपणे कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी संधी मिळेल तेव्हा बोलणं हे झियादला जास्त महत्वाचं वाटतं?
तो म्हणतो, त्यांनी विचारलं व्हॉट मॅटर्स यू? मी जे वाटलं ते लिहिलं. कृष्णवर्णीयांच्या हक्कांविषयी बोलायला हवं ते मिळतील म्हणून लढायला हवं.
मुख्य म्हणजे या त्याच्या कृतीशील चळवळीचा स्टॅनफर्ड विद्यापीठानंही मान राखला आणि त्याला प्रवेश दिला.
झियादला ओबामांच्या राजवटीत व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार डिनरचं आमंत्रणही मिळालं होतं, मुस्लीम अमेरिकन चेंजमेकर म्हणून त्याला बोलावण्यात आलं होतं.

कृष्णवर्णीय मुलांच्या भारतातल्या जगण्याविषयीचा ‘आॅक्सिजन’मध्ये प्रसिद्ध झालेला लेख
इथे वाचा.. http://www.lokmat.com/storypage.php?catid=31&newsid=4915

Web Title: #BlackLiveslivesMatter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.