बॉलिवूड करीचा सिक्सर

By admin | Published: January 22, 2015 06:55 PM2015-01-22T18:55:44+5:302015-01-22T18:55:44+5:30

अमेरिकेतलं पॉप म्युङिाक, मायकल जॅक्सन ते हॉट बर्गर हे जगभर पोहोचलं ते अमेरिका महासत्ता होती म्हणून नव्हे तर महासत्ता होण्याच्या प्रवासात जगभरच्या माणसांनी ‘अमेरिकन’ वस्तू सहज स्वीकारल्या.

Bollywood Curry Sucker | बॉलिवूड करीचा सिक्सर

बॉलिवूड करीचा सिक्सर

Next
>आमचा देश महासत्ता होणार; आमच्याशिवाय जगाचं पानही हलणार नाही असे नारे देऊन काही कुणी महासत्ता होत नसतं; सामाजिक-आर्थिक विशेषज्ञांचं म्हणणंच आहे की; तुमचा देश जसजसा शक्तिशाली बनत जातो, तसतशा तुमच्या देशाची ओळख सांगणा-या खुणा जगभर लोकप्रिय होऊ लागतात. अमेरिकेतलं पॉप म्युङिाक, मायकल जॅक्सन ते हॉट बर्गर हे जगभर पोहोचलं ते अमेरिका महासत्ता होती म्हणून नव्हे तर महासत्ता होण्याच्या प्रवासात जगभरच्या माणसांनी ‘अमेरिकन’ वस्तू सहज स्वीकारल्या. तेच आता चीनचं होतं आहे. जगाच्या कानाकोप:यात कुठंही जा, मेड इन चायना वस्तू जशा भेटतात तसंच कुठंही मिळतं ‘चायनिज’ फूड. कुंग फू कराटेवाले सिनेमे आणि हक्का न्यूडल्स या गोष्टींनी जगभर ‘चीन’ पोहोचवला.
भारतीय अर्थव्यवस्था मोठी होत असताना आणि तरुण मनुष्यबळ जगभर पोहोचत असताना भारतीय माणसांची ओळख म्हणून अनेक गोष्टी जगभर पसरत आहेत. त्या गोष्टीतून लोक ‘भारत’ नावाचा देश ओळखीचा करून घेत आहेत. 
त्यातल्याच तीन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे बॉलिवूड-फूड आणि क्रिकेट!
क्रिकेट हा काही भारताचा राष्ट्रीय खेळ नाही; मात्र तरीही आजच्या घडीला क्रिकेट ही एकमेव गोष्ट आहे जी भारताची नुस्ती ओळखच नाही तर भारतीय माणसालाही एका सूत्रत बांधते. सव्वाशे कोटी लोकांच्या एकत्रित देशप्रेमाचा अनुभव फक्त क्रिकेटचा अटीतटीचा सामनाच देऊ शकतो. एका सचिन तेंडुलकर नावाच्या माणसापाठी अख्खा देश वेडा कसा व्हायचा हे या देशानं अनेकदा अनुभवलं आहे. तोच सचिन तेंडुलकर हा भारताची जगभरातली ओळख ठरण्याइतका मोठा झाला तो याच क्रिकेटवेडापायी!
मात्र नुस्तं भावनिक प्रेम आजच्या घडीला महत्त्वाचं नसतं; त्यानं तुमची ताकद सिद्ध होत नाही, हे नव्या जगाचं गणित. त्याच परिभाषेत उत्तर द्यायचं तर आजच्या घडीला बीसीसीआय म्हणजे क्रिकेट कण्ट्रोल बोर्ड ऑफ इंडिया यांच्या इतकं जागतिक क्रिकेटमधे कुणीच श्रीमंत नाही. बीसीसीआयच्या शब्दाला क्रिकेट जगतात जे वजन आहे, ते त्यांच्या आर्थिक ताकदीमुळे आणि भारत नावाच्या क्रिकेटवेडय़ा बाजारपेठेमुळेच ! एकीकडे पैसा, दुसरीकडे गुणवत्ता या दोघांच्या जोरावर आज क्रिकेट भारताची ओळख बनला आहे.
जे क्रिकेटचं तेच बॉलिवूडचं. जगाच्या ज्या कोप:यात लोकांना भारत काय नि हिंदी कुठली भाषा हे माहिती नाही, त्या कोप:यातले लोकही आज बॉलिवूड म्युङिाकवर लटकेझटके डान्स करतात. हे कशामुळे होतं तर जिथं भारताची दुसरी काहीच खूण पोहोचत नाही, तिथं बॉलिवूड सिनेमे, बॉलिवूड फिल्म्स पोहोचत आहेत. पडद्यावरचं ते लार्जर दॅन लाईफ जगणं पाहून जगभरातले लोक एण्टरटेन करून घेताहेत स्वत:ला ! आपल्याला कल्पनाही नसते पण जगभरातल्या 9क् देशात बॉलिवूडचे सिनेमे आजच्या घडीला प्रदर्शित होतात. देशांतर्गत जितका पैसा कमवतात, त्यापेक्षा जास्त पैसा ओव्हरसिज राइट्समधून मिळवतात.
बॉलिवूड हा शब्दच ऑक्सफर्ड डिक्शनरीत आता ‘इंग्रजी’ शब्द म्हणून स्वीकारला गेला आहे, ही आपल्या सिनेमाची ताकद आहे. सिनेमाचं हे वेड एकीकडे आणि भारतीय खानपानाची चटक दुसरीकडे. भारतीय ‘करी’ अर्थात मसालेदार आमटी, समोसा, वडापाव, इडलीसांभार, डोसा आणि बिर्यानी हे सारे पदार्थ जगभरात मिळतात, जगभरातले लोक आवडीनं खातात.
एखाद्या देशाची ओळख म्हणून जेव्हा त्या देशातलं संगीत, नृत्य, खानपान, सिनेमे, स्पोर्ट जगभरात लोकप्रिय होऊ लागतं तेव्हा समजावं की, त्या देशाची ताकद वाढते आहे.
भारत तशी ताकद वाढवतोय असं आता सामाजिक अभ्यासकांचं मत आहे.
त्या ताकदीची ही एक झलक.
 
पॉवरपॅक सिनेमा
 
1) शंभर वर्षे पूर्ण करणा:या हिंदी सिनेमानं अर्थात बॉलिवूडनं स्वत:ची ओळख निर्माण करत आपल्या नावाचीच मुद्रा ऑक्सफर्ड डिक्शनरीत उमटवली आहे. बॉलिवूड हा आता इंग्रजी शब्द म्हणूनही ओळखला जातो.
2) मागच्या वर्षी जगभरात भारतीय सिनेमाची 32क् कोटी तिकिटं विकली गेली. अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशातील एकत्रित हॉलिवूड तिकीट विक्रीपेक्षा ही संख्या जास्त आहे.
3) जगभरातल्या 9क्हून अधिक देशात बॉलिवूड सिनेमे प्रदर्शित होतात.
4) फक्त हिंदीच नाही तर एकूण सर्व भारतीय भाषा मिळून दरवर्षी 11क्क् सिनेमे प्रदर्शित होतात. अमेरिकन फिल्म इंडस्ट्रीपेक्षा ही संख्या दुप्पट आहे. आणि ब्रिटिश फिल्म इंडस्ट्रीपेक्षा तर दहापट जास्त आहे.
5) हिंदीपेक्षा भारतीय भाषा तमिळ आणि तेलगूमधे जास्त सिनेमे प्रदर्शित होतात.
6) भारताच्या एकूण महसुलात हिंदी सिनेमाच्या म्युङिाक राइट्समधून मिळणा:या महसुलाचा वाटा 5 % आहे.
 
करी? डोण्ट वरी.
 
1) ‘इंडियन करी’ हा शब्द जगभरातल्या पॉप्युलर आणि मोस्ट गूगल्ड शब्दात मोजला जातो. ज्या देशातल्या माणसांनी आजवर एकही भारतीय शब्द खाल्लेला किंवा पाहिलेलाही नाही, त्यांनाही इंडियन करी हा शब्द सर्वसाधारण माहिती असतो, असा फेवरिट वर्डसचा अभ्यास करणा:या अभ्यासकांचा दावा आहे.
2) आपल्याला अंदाजही नसतो, पण आजच्या घडीला भारतीय फूड इंडस्ट्री सुमारे 247,680 कोटी रुपयांची आहे. सरासरी 11  टक्के विकासदर धरला तरी येत्या 2018 पर्यंत 4,08,040 कोटी रुपये इतकी मोठी उलाढाल या इंडस्ट्रीत अपेक्षित आहे.
3) एकटय़ा भारतात 85,000 बेकरी युनिट्स आहेत. देशभरात ब्रेड हा पदार्थ लोकप्रिय तर आहेच, पण भारतीय पदार्थात त्याचा वापर वाढल्यानं ब्रेड हा भारतीय पदार्थ नाही असं म्हणणं आता अवघड होऊ लागलं आहे.
4) जगभरातले सर्वाधिक शाकाहारी लोक भारतात राहतात.
5) पिङझा हट या जगभरातल्या लोकप्रिय ब्रॅण्डला भारतातच पहिल्यांदा आपले ‘प्यूअर व्हेज’ रेस्टॉरण्ट उघडावे लागले इतकी भारतीय ग्राहकांची संख्या मोठी आहे.
6) हा शाकाहारी ग्राहक आपल्याला लाभावा म्हणून जगभरातल्या बडय़ा ब्रॅण्ड्समध्ये स्पर्धा सुरू झाली आणि त्यातूच केएफसी आणि मॅक्डोनाल्ट यांनाही आपापल्या मेन्यू कार्डमध्ये शाकाहारी पदार्थाचा समावेश करावा लागला.
7) चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय झाले आहे, जगभरात सर्वाधिक चहा भारतातच प्याला जातो.
8) आंबे ही भारताची आणखी एक ओळख. जगभरात भारतीय हापूस आंब्याला मागणी असते, भारतात दरवर्षी सुमारे 12 लाख टन आंब्यांचं उत्पादन होतं. आणि जगभरात हा आंबा भारताचा ब्रॅण्ड म्हणून पोहोचतो.
9) भारतीय बाजारपेठेनं पॅक फूड, रेडीटूमेक पदार्थाच्या पॅकेजिंगचं स्वरूपच बदलून टाकलं. कमीत कमी पैशातही आता असे तयार पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
10) भारतीय स्ट्रीट फूड ही जगभरात पोहोचलेली भारतीय खानपानाची आणखी एक ओळख. पाणीपुरी, भेळपुरी, रगडा चॅट, वडापाव, समोसा हे पदार्थ जगभर लोकप्रिय होत आहेत. जगभरातल्या स्ट्रीट फूडमध्ये पौष्टिकता किती हा नवा वाद सुरू असताना भारतीय पदार्थ तुलनेनं जास्त पौष्टिक आणि तरीही अवीट चवीचे असतात असा खवय्यांचा आणि अभ्यासकांचा दावा आहे.
 
पण तरीही.
 
 
* साप गारुडय़ांचा देश अशी एकेकाळी भारताची प्रतिमा होती. मात्र आजही या हायटेक देशात सर्पदंशानं मृत्यू पावणा:याचं प्रमाण मोठं आहे. योग्यवेळेत औषधोपचार न मिळाल्यानं अनेकजण दगावतात.
 
* प्रदूषणाचा विळखा या देशाला पडतो आहे. विकासाच्या नावाखाली सर्रास जंगलं कापली जात आहेत. गेल्या फक्त तीन वर्षात दोन हजार कोटी रुपयांचं नुकसान बेकायदा जंगलतोडीनं झालं आहे.
 
* डायबिटीसचं प्रमाण देशात वाढतं आहे. 2030 पर्यंत जगात सर्वात जास्त डायबिटीसचे रुग्ण भारतात असतील असा अंदाज आहे.

Web Title: Bollywood Curry Sucker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.