जीव तोडून क्रिकेट खेळणारी एक मुलगी

By admin | Published: June 18, 2015 05:18 PM2015-06-18T17:18:21+5:302015-06-18T17:18:21+5:30

‘‘क्रिकेट मला आवडतं, तेच खेळायचं म्हणून मी शाळेला रामराम ठोकला आणि बाहेरून परीक्षा दिली, त्यानं बिघडलं काहीच नाही!’’

A boy playing cricket and playing cricket | जीव तोडून क्रिकेट खेळणारी एक मुलगी

जीव तोडून क्रिकेट खेळणारी एक मुलगी

Next
>क्रिकेट हेच माझं ध्येय. मला क्रिकेट आवडतं, तेच मला खेळायचं होतं. ‘मुली कुठं क्रिकेट खेळतात का?’ असे शेरे मारणा:यांकडे दुर्लक्ष करून मनापासून क्रिकेट खेळायचं होतं आणि तेच मी केलं! 
त्यासाठी ठरवलं की, शाळेत जाण्यापेक्षा दहावीचा फॉर्म बाहेरून  भरू, घरी अभ्यास करू, पण क्रिकेटवर अन्याय करायचा नाही. दहावी परीक्षेत बहिस्थ विद्यार्थी म्हणून नोंदणी करीत 62 टक्के गुण मिळवले. ते ही इंग्रजी माध्यमातून!  
कोल्हापुरातल्या कसबा बावडा भागात मी राहते. लहानपणापासून मुलांमध्ये गल्लीत क्रिकेट खेळायचे. हौसेपोटी क्रिकेट खेळताना वडिलांना एकदा विचारलं, मुलींची टीम नसते का? ते म्हणाले, ‘असते ना! चांगलं खेळीस तर तुलाही त्या टीममध्ये नक्की जाता येईल.’ तेव्हाच ठरवलं की, आपण त्या टीममधून खेळायचं. खूप मेहनत करायची.  ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक सदा पाटील आणि इम्रान पटेल यांनी मला क्रिकेटचे प्राथमिक धडे दिले. यामध्ये जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय 14 वर्षाखालील गटात विविध स्पर्धा मी गाजवल्या. या कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्राच्या 19 वर्षाखालील संघासाठी माझी निवड केली. 15 दिवस पुणो येथे सराव शिबिर झाल्यानंतर पश्चिम विभाग  संघातही निवड झाली. पश्चिम विभागाचे सामने केरळ येथे मे महिन्यात सुरू झाले. पुढे दहावीचं वर्ष. 75 टक्के हजेरी पाहिजे; अन्यथा  दहावीच्या अंतिम परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असं शाळेनं वारंवार बजावलं होतं.  मग यावर एकच उपाय होता, तो म्हणजे बहिस्थ म्हणून दहावीची परीक्षा द्यायची. कोल्हापुरातील आयर्विन ािश्चन हायस्कूलमधून 17 क्रमांकाचा बहिस्थ विद्यार्थी म्हणून दहावीचा अर्ज भरला. मग  क्रिकेटकडे लक्ष देण्यास वेळच वेळ मिळाला. रोज दिवसातील सहा तास शाहूपुरी जिमखाना मैदानावर क्रिकेटचा सराव केला. पुढे सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांत पुणो येथे सराव शिबिरासाठी पहिल्या 25 मध्ये निवड झाली. तेथे चमक दाखविल्यानंतर महाराष्ट्राच्या संघातून 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेसाठी पुणो येथे निवड झाली. त्यानंतर लीग सामने झाले. यातून महाराष्ट्राचा संघ निवडला. ऑक्टोबर महिन्यात केरळ येथे विभागीय क्रिकेट स्पर्धाना प्रारंभ झाला. यातही पश्चिम विभागाकडून निवड झाली. गुजरात, सौराष्ट्र, बडोदा, मुंबई आदि संघांबरोबर खेळण्याची अगदी लहान वयातच संधी मिळाली. दररोज क्रिकेटचे धडे गिरवताना डोक्यात दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करण्याचा विचारही असायचा. दिवाळीत काही दिवसांची सुटी मिळाल्यानंतर गणिताची खासगी शिकवणी लावली. केवळ काही दिवसच या वर्गाला हजेरी लावली. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत काही वेळ अभ्यास केला. इकडे क्रिकेटचे धडेही चालूच होते. सकाळी साडेसहा ते दहा वाजेर्पयत व सायंकाळी चार ते साडेसहा असा एकूण सहा तास सराव केला. दिवसातील बहुतांश वेळ क्रिकेटचे धडे गिरविण्यातच जात होता. घरातील सर्वाना दहावी कशी होणार, म्हणून काळजी लागली होती. त्यात इंग्रजी माध्यमातून दहावीची परीक्षा! दोन्ही आघाडय़ांवर खेळताना चांगलीच दमछाक होत होती. दोन्ही क्षेत्रंत काहीही करून जिंकायचेच हे लक्ष्य ठेवून जमेल तसा अभ्यास करत परीक्षा दिली. आणि 62 टक्के मार्कही मिळाले. आई-वडील,  खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षिका केतकी खवरे, क्रिकेट प्रशिक्षक दिवाकर पाटील, माजी रणजीपटू ध्रुव केळवकर, रमेश कदम, अरुण नातू, पॉल्स निवृत्ती सूर्यवंशी आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बाळ पाटणकर,  ऋतुराज इंगळे यासा:यांनीच या प्रवासात खूप मदत केली. 
आता मला भारतीय खुल्या महिला क्रिकेट संघातून व 19 वर्षाखालील संघातून खेळायचे आहे. त्या दृष्टीने माझा क्रिकेटचा सराव सुरू आहे. दिवसातील सहा तास क्रिकेटसाठी देत आहे. अर्थात मी पदवीर्पयत शिक्षणही पूर्ण करीनच, पण सध्या लक्ष्य एकच, क्रिकेट!!
- ऋतुजा देशमुख 
( शब्दांकन - सचिन भोसले)
 

Web Title: A boy playing cricket and playing cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.