दिमाग की बत्ती

By Admin | Published: June 9, 2016 05:09 PM2016-06-09T17:09:30+5:302016-06-09T17:59:32+5:30

आपलं मन एखाद्या विषयात जास्त रमतं. तसंच एखाद्या विषयात काही केलं तरी रमत नाही, असं का होतं? याचं कारण आपल्या बुद्धिमत्तेत असतं.

Brain light | दिमाग की बत्ती

दिमाग की बत्ती

googlenewsNext

 - डॉ. श्रुती पानसे

 
एखादी गोष्ट 
आपल्याला मनापासून आवडते, एखादी काही केल्या 
डोक्यात शिरत नाही, असं का?
आणि जे आवडत नाही,
 तेच करत राहिलं तरी डोकं 
आणि मन त्यात रमत नाही,
याचं रहस्य काय?
 
 
आपलं मन एखाद्या विषयात जास्त रमतं. 
तसंच एखाद्या विषयात काही केलं तरी रमत नाही, असं का होतं?
 याचं कारण आपल्या बुद्धिमत्तेत असतं. 
आपली बुद्धिमत्ता ज्या विषयात असेल, त्या विषयात आपण सहजपणो रमतो. अमेरिकन न्यूरॉलॉजिस्ट डॉ. हॉवर्ड गार्डनर यांनी द थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्सेस (The Theory of Multiple Intelligences)नावाचा सिद्धांत मांडला आहे. या त्यांच्या सिद्धांतात याचं सुंदर  विश्लेषण केलं आहे. त्यांनी या आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत 1. भाषिक बुद्धिमत्ता, 2. गणिती बुद्धिमत्ता, 3. संगीतविषयक, 4. निसर्गविषयक, 5. शरीर/स्नायूविषयक, 6. व्यक्तीअंतर्गत बुद्धिमत्ता, 7. आंतरव्यक्ती आणि 8. अवकाशीय बुद्धिमत्ता. (मागील लेखात हा संदर्भ तुम्ही वाचला होताच.)
 आता त्यातल्या प्रत्येक बुद्धिमत्तेविषयी तपशिलानं समजून घेऊ. 
आपल्या मेंदूत वेगवेगळी क्षेत्नं असतात, त्या क्षेत्नातून मेंदूची सगळी कामं चालतात. ज्या क्षेत्नात न्यूरॉन्सच्या जुळणीचा वेग जास्त असतो, त्या क्षेत्नाशी संबंधित विषयात आपल्याला रस असतो, त्याच प्रकारचं काम आपण निवडायला हवं. एखाद्या ठिकाणी आपण 1क्क् टक्के रमत नाही, याचं कारण न्यूरॉन्समध्येही असू शकतं.
 
भाषिक बुद्धिमत्ता 
आपल्यापैकी ज्यांना भाषा या विषयात खूप आवड असते, जी माणसं लेखन-वाचन करायला किंवा बोलायला, संवाद साधायला कायम उत्सुक असतात त्या सर्वामध्ये भाषिक बुद्धिमत्ता असू शकते, असं आपल्याला म्हणता येतं. ज्यांच्यात ही बुद्धिमत्ता असते, ते लोक शिक्षक, प्राध्यापक ही कामं आवडीनं करतात. लेखक, पत्नकार, स्क्रि प्ट रायटर, कवी, निवेदक, वक्ते म्हणून प्रसिद्ध होतात. त्या सर्व माणसांमध्ये ही बुद्धिमत्ता असते. नवी भाषा शिकतात/ शिकवतात. कॉमेंट्री करतात, शब्दकोडी सोडवण्याचा छंद असतो. तुम्हाला हे किंवा यापैकी काही मनापासून करायला आवडतं का, हे तपासून बघा.
 
गणिती/तार्किक बुद्धिमत्ता
या बुद्धिमत्तेसाठी गणित, विज्ञान असे विषय आवडणं अनिवार्य आहे. केवळ पेपरातली गणितंच नव्हे, तर कोणत्याही समस्या शांत डोक्याने, यशस्वीरीत्या सोडवणं हे याच बुद्धिमत्तेच्या लोकांचं काम. कारण त्यातही हीच बुद्धिमत्ता वापरून तर्क केला जातो, लॉजिक वापरलं जातं.    
डॉ. गार्डनर म्हणतात की, प्रत्येकाकडे ही बुद्धिमत्ता असतेच. मात्न गणितज्ञ, शास्त्नज्ञ, संख्याशास्त्नज्ञ, वेगवेगळी इंजिनिअरिंगची क्षेत्नं, शेअर बाजार, बॅँका, पतपेढय़ांचे कर्मचारी, कोणत्याही स्वरूपाचे विश्लेषक, संशोधक, गणित शिक्षक/प्राध्यापक, विज्ञान शिक्षक/ प्राध्यापक, नकाशांचा अभ्यास करणारे अशा क्षेत्नात काम करणा:यांकडे ही बुद्धिमत्ता असते. भूमितीचा वापर चित्नकलेत होतो, आर्किटेक्ट्सना होतो, तंत्नज्ञानात होतो. या लोकांमध्ये गणिती बुद्धिमत्ता असते.
ज्यांनी स्वत:ला मुळीच रस नसताना दहावीनंतर (पालकांच्या किंवा स्व-हट्टाने) विज्ञानाकडे प्रवेश घेतला, त्यांना ते चांगल्या पद्धतीने जमतं का?
काहीजण अथक प्रयत्नाने टिकून राहतात. काहींना विज्ञान शाखा सोडून द्यावी लागते. पण काहींना ही शाखा मनापासून आवडते. ते त्यातले किडेच असतात. का तर त्यांच्या मेंदूतल्या न्यूरॉन्स पेशींना या क्षेत्नात गती असते. ते क्षेत्न आपलंसं वाटतं. मग त्या क्षेत्नात कितीही अवघड कामगिरी करायची असो; ही कामगिरी करता येते.  
 
संगीतविषयक बुद्धिमत्ता
लता मंगेशकर, आशा भोसले, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, कैलाश खेर, अजिर्तसिंग  अशा गायकांमध्ये ही बुद्धिमत्ता आहे. झाकीर हुसेन, शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरसिया, ए. आर. रहमान, अजय-अतुल या गायक- वादक-संगीतकारांमध्येदेखील ही बुद्धिमत्ता आहे. ही सर्वच नावं खूप मोठी आहेत. मात्न एकूण संगीतक्षेत्नापैकी कशातही गती असणारे, म्युङिाक स्कूल्स चालवणारे, भारतीय कथक, भरतनाटय़म शिकणारे किंवा शिकवणारे, पाश्चात्त्य संगीत, नृत्य करणारे, संगीत शिक्षक, वाद्य बनवणारे, दुरुस्त करणारे यांच्यात ही बुद्धिमत्ता असते म्हणून ते या क्षेत्नाकडे वळतात. 
अशा बुद्धिमत्तेच्या लोकांसाठी ती केवळ आवड नसते, कलाही नसते, तर ती बुद्धिमत्ता असते. बुद्धिमत्ता ही नेहमी आतून येते. ती बाहेरून थोपवून येत नाही. लादता येत नाही. त्यांना या विषयाला सोडून राहवत नाही. या कला आत्मसात होण्यासाठी कितीही कष्ट करायची त्यांची तयारी असते. अशांकडे संगीतविषयक बुद्धिमत्ता नक्कीच असते, असं आपण म्हणू शकतो.
आता हे सारं आपापलं तपासत, आपल्याला काय आवडतं, ङोपतं, शक्य आहे नी परवडतंय या सा:याचा सारासार विचार आपणच करायला हवा.
करिअर निवडताना ते सगळ्यात महत्त्वाचं.
 
(पुढील लेखात : आंतरव्यक्ती, अवकाशीय व शरीर/स्नायूविषयक बुद्धिमत्ता)
 
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com 
 

Web Title: Brain light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.