मनातलं बोलावं असं कुणीच नाही आयुष्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 07:10 AM2019-12-26T07:10:00+5:302019-12-26T07:10:02+5:30
स्वत:च्याच ट्रॅपमधून मोकळं होण्याची सुरुवात.
प्राची पाठक
आपण बोलतो, भरमसाठ गप्पा मारतो; पण म्हणजे नेमकं काय करतो, हे कोणालाच नीट सांगता येत नाही. त्यातल्या किती गोष्टी आपण वरवरच्या बोलत असतो? नुसतंच काहीतरी बोलायचं म्हणून किती बोलतो? वेळ मारून न्यायला किती बोलतो? आपल्या मनात चालणार्या अनेक गोष्टींचा कसलाही थांगपत्ता लागू न देता इतर अनेक सतराशेसाठ गोष्टींवर बोलायचं स्किल अनेकांनी आत्मसात केलेलं असतं. कुणी घरीदारी जेवढय़ास तेवढं बोलणं पसंत करतात. कारण बोलणं म्हणजे त्यापलीकडे काही असतं, हे त्यांना माहीतच नसतं.
नुसत्याच हवापाण्याच्या गप्पा मारणं म्हणजेही बोलणं नाही. त्यात मनातल्या अडीअडचणींचं शेअरिंग असतं का, हा मूळ मुद्दा आहे.
तिशीर्पयतचा काळ हा अनेक मानसिक समस्यांनी डोकं वर काढायचा काळ असतो. याच काळात आपल्याला काहीच न बोलायची किंवा सोयीस्कर गप्प बसायची अथवा सहन करायची सवय लागते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा असते. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा ताण आपल्यावर असतो. या ताणामुळेदेखील कित्येकदा मनातलं बोलणं टाळलं जातं. मग परिस्थिती आणखी चिघळत जाते. आजूबाजूला अनेक लोक आहेत. फोनमध्ये स्टोअर केलेले कॉन्टॅक्टस ओसंडून वाहत आहेत. चॅट्सचे स्क्र ोल वाढत चालले आहेत, तरीही मनातलं बोलायला आणि ते शांतपणे ऐकून घ्यायला कोणी नाही ! ऐकून घेतलं तरी त्यावर शिक्के न मारणारे लोक दुर्मीळ. मनातलं न बोलण्यामागे हीच खरी भीती असते की आपल्या बोलण्याचा कोण कसा अर्थ लावेल?
दुसर्याशी संवाद साधायची गाडी रु ळावरून घसरायला लागते ती इथे.
* काय करता येईल?
आपल्याला समजून घेईल असा एकतरी कान शोधणं, ही आपली खरी परीक्षा असते ! त्या परीक्षेला आपल्याला आधी बसावं लागेल. आपल्याला नेमकं काय जाचतं आहे, ते दुसर्यावर न थोपवता नीट सांगता येणं ही एक कला आहे. आधी थोडं अवघड जाईल; पण नक्की जमेल. मात्र दुसर्याकडून आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांवर चटचट रेडिमेड उत्तरं मिळतील, असं गृहीत न धरता बोलायची सवय करावी लागेल आणि लगेच लोकं आपल्याशी बोलायला लागतील हा समजही बाजूला ठेवावा लागेल.
मनातलं बोलायचा सराव करावा लागतो आणि त्याचीही सवय व्हावी लागते, हे आपल्याला हळूहळू समजेल.
* त्याने काय होईल?
1- आपल्या भावभावना समजून घेणारी हक्काची मंडळी आपल्या आसपासच दिसू लागतील. आपण एकटे पडणार नाही.
2- मनातलं बोलता येत नाही, बोलत नाही, म्हणून आपण स्वतर्लाच खात राहतो, कुढत राहतो. हे कुढणं बंद होईल.
4- मोकळं झाल्यामुळे अंगावरचं ओझं एकदम उतरल्यासारखं वाटेल आणि मन प्रफुल्लित होईल.
5- नवनवीन गोष्टी करून पाहण्याची, इतरांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होईल.
7- विश्वास ठेवण्याजोग्या अनेक व्यक्ती आजूबाजूला आहेत हे कळेल.