निर्माण

By admin | Published: July 28, 2016 05:15 PM2016-07-28T17:15:58+5:302016-07-28T17:46:31+5:30

मनातल्या अस्वस्थ प्रश्नांना कृतिशील उत्तरं देणारी एक प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेत सहभागी होण्याची एक नवी संधी

Build | निर्माण

निर्माण

Next

- आॅक्सिजन टीम
शिक्षण-नोकरी-करिअर, पैसा, नाकासमोरचं जगणं आणि स्वत:पुरतं पाहणं याहूनही वेगळं आणि जास्त आनंददायी असं जीवनात काही असतं का? 
केवळ पैसे कमावण्यापलीकडे अधिक अर्थपूर्ण जगणं आपल्याला शक्य आहे का?
आपल्या कौशल्यांचा, क्षमतांचा उपयोग आपण समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करू शकतो का? 
हे आणि असे बरेच प्रश्न पडतात तुम्हाला? वाटतं कधी की, आपण सेटल होणार म्हणजे नक्की काय होणार? नेमकं काय हवं आपल्याला आपल्या आयुष्याकडून? किंवा कधी वाटतं का, की नुस्त्या व्यवस्थेला शिव्या घालत बसण्यापेक्षा आणि आपल्याच घरात टीव्हीसमोर बसून चिंता करणं आणि सोशल मीडियावर तावातावानं मत मांडणं यापलीकडे आपण काही करू शकतो का? 
समाजाचे नंतर, आधी आपल्या आनंदाचे, आपल्या जगण्याचे नक्की प्रयोजन काय असे प्रश्न छळतात तुम्हाला?
ज्यांना असे प्रश्न पडतात, छळतात त्यांनी नुस्ता शाब्दिक खल न करत बसता या प्रश्नांचा कृतिशील शोध घ्यावा यासाठी डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुरू केलेली एक शिक्षणप्रक्रि या म्हणजे निर्माण.
‘निर्माण’ म्हणजे शिकण्या-समजण्यापासून आपणच आपला शोध घेण्याची एक प्रक्रिया आहे. आणि गेली काही वर्षे तरुण मुलंमुली या प्रक्रियेत सहभागी होत नव्या अनुभवांचा भाग होत आहेत. सामाजिक काम करताना स्वत:ची ध्येयंही गवसत आहेत.
‘निर्माण’ प्रक्रि येचा एक भाग म्हणून तीन शिबिरांची एक मालिका विकसित करण्यात आली आहे. ‘सर्च’, गडचिरोली येथे होणाऱ्या या शिबिरांदरम्यान स्वत:ची ओळख, आजूबाजूच्या समाजाची, निसर्गाची ओळख, समाजातील विविध प्रश्न आणि सोडविण्याच्या विविध पद्धती, प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांसोबत संवाद अशा विविध टप्प्यांमधून शिबिरार्थी प्रवास करतात. स्वत:बद्दल आणि समाजाबद्दल अधिक समृद्ध समज असणारे अनेकजण आपल्या आयुष्यात शिक्षण संपल्यावर पुढे काय या प्रश्नाचं खऱ्या अर्थानं अर्थपूर्ण उत्तर स्वत:चं स्वत: शोधतात. 
२००६-१६ या काळात निर्माण प्रक्रियेतल्या सहा बॅचेसमध्ये महाराष्ट्रभरातील ८०० हून अधिक युवक-युवती सहभागी झाले. यापैकी सुमारे १२० जण हे आज सामाजिक समस्यांवर तोडगे शोधणारं काम मनापासून पूर्णवेळ करत आहेत.
समाजातील विविध समस्यांना आव्हान म्हणून स्वीकारू इच्छिणाऱ्या युवांना संघटित करणं व त्यांना आवश्यक मार्गदर्शन, कौशल्य व पोषक वातावरण उपलब्ध करून देणं हे निर्माणचं ध्येय आहे. विचार, भावना व कृती या तीनही अंगांनी स्वत:ची रु ंदी व खोली वाढविण्याचा प्रयत्न याद्वारे तरुण मुलामुलींना करता येतो. 
आपणही या वाटेनं जावं, स्वत:ला शोधावं, जगण्याला गांभीर्यानं शोधत मग पुढचा आयुष्याचा निर्णय घ्यावा त्यांच्यासाठी निर्माण आता यावर्षीही एक संधी घेऊन येत आहे. निर्माणप्रक्रियेत सहभागी होण्याची ही संधी आहे.
इच्छा असेल, तर निर्माणच्या या निवडप्रक्रियेत जाऊन स्वत:ला नक्की जोखून पाहता येईल!



संपर्क कुठे करायचा?

* निर्माणची सातवी बॅच येत्या जानेवारीपासून येथे सुरू होत आहे. 
* यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक निवडप्रक्रिया आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज http://nirman.mkcl.org या संकेत स्थळावरून डाउनलोड करता येईल. 
* प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २५ आॅगस्ट, २००६ आहे. 
* माहितीसाठी 
https://www.facebook.com/nirmanforyouth/ हे फेसबुक पेज पाहा किंवा 
या ईमेलवरही संपर्क साधता येईल.
nirmaanites@gmail.com वयोमर्यादा :
१८ ते २८ या वयोगटातील तरुण-तरुणींना यात सहभागी होता येईल.

अधिक माहितीसाठी
९८९०३३३३६७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Web Title: Build

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.