पैसे मोजून जॉब विकत घेताय?

By admin | Published: April 2, 2015 06:22 PM2015-04-02T18:22:23+5:302015-04-02T18:22:23+5:30

सध्या देशभर गाजत असलेला रेल्वे नोकरी घोटाळा! धाडसत्र, अटकसत्र, आरोपसत्र सगळं सरसकट सुरू आहेत; या घोटाळ्यात महाराष्ट्रातले ४0 तरुणही हातोहात फसवले गेले.

Buying jobs by paying for money? | पैसे मोजून जॉब विकत घेताय?

पैसे मोजून जॉब विकत घेताय?

Next

 सध्या देशभर गाजत असलेला रेल्वे नोकरी घोटाळा!

धाडसत्र, अटकसत्र, आरोपसत्र सगळं सरसकट सुरू आहेत; या घोटाळ्यात महाराष्ट्रातले ४0 तरुणही हातोहात फसवले गेले.
आणि तेही बेमालूम.
फसवणूक करणार्‍या टोळीने तरुणांना रेल्वे भरतीचं आमिष दाखवलं, नुस्ते ऑफर लेटरच नाही तर काहींना तर अपॉइण्टमेण्ट लेटर्सही मिळाले आणि काहींनी तर म्हणे बिहारमधल्या लहानसहान स्टेशनवर प्रशिक्षणही पूर्ण केलं.
आणि मग कळलं की, काही लाख रुपये या मुलांकडून उकळून एक बडं रॅकेट परागंद झालं.
- अर्थात ही झाली ताजी बातमी.
पण या अशा बातम्या, असे घोटाळे आपल्या देशात नवीन नाही, बेरोजगार तरुणांची फसवणूक, त्यांना लागणारं लाखो रुपयांचं चंदन हे सारंही काही नवीन नाही!
अशा बातम्या सतत प्रसिद्ध होतात आणि अकुशल, अर्धकुशल, कमी शिकलेल्या तरुणांसह अनेक उच्चशिक्षितही त्यात अडकतात!
मुळात कुणी आपल्याकडे नोकरी लावून देण्यासाठी पैसे मागतं असेल तर अशा ठिकाणी आपणच ‘लाच’ देऊन नोकरी मिळवावी का, हा खरं तर कॉमनसेन्सचा प्रश्न आहे.
पण आपल्या देशात नोकरीची आशा अनेकांच्या कॉमनसेन्सलाही डोकं वर काढू देत नाही.
तरुण मुलं वडीलधार्‍यांशी भांडून लाखो रुपये भरतात आणि फसतात.
काहीजण देशात फसतात, काहीजण विदेशात जायचं हे स्वप्न विकत घेऊन फसतात.
गर्तेत अडकतात, काहींना फक्त विदेशात नोकरी या दोन शब्दांचंच इतकं आकर्षण की, त्यापायी ते काहीही करायला तयार होतात.
हे असं सारं तुमचं किंवा तुमच्या मित्रांचं होत असेल तर तुम्ही जरा तरी सावध व्हावं, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा न्यायानं का होईना खबरदारी बाळगावी म्हणून या अंकात ही विशेष चर्चा.
नोकरीच्या घोटाळ्यांपासून स्वत:ला वाचवण्याची,
भामट्यांनी आपल्याला मूर्खात काढून नये म्हणून कानाला खडा लावत, काही गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात!

Web Title: Buying jobs by paying for money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.