कानातले घेताय?, तुमच्या चेह-याचा आकार ओळखून खरेदी करा ट्रेन्डी कानातले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:40 AM2017-08-31T11:40:30+5:302017-08-31T11:53:57+5:30
आवडलं की घे कानातलं असं आपण करतोे, पण ते खरंच आपल्याला शोभतं का?
सजणंधजणं कानातल्यांशिवाय पूर्ण होणं अशक्यच. हल्ली तर फॅशननुसार, ट्रेन्डनुसार कानातले निवडण्याचा आग्रह असतो. पण कानातले निवडताना आणखी एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. चेहºयाच्या आकाराशी, रंगाशी सुसंगत कानातले घालणं फार महत्त्वाचं असतं. केवळ कानातलं छान आहे म्हणून ते आपल्या चेह-याला सुट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेहºयाशी सुसंगत असे कानातले घातले तर ते जास्त उठावदार दिसतात.
चेह-याला काय शोभेल?
१. आयताकृती चेहरा
काहीसा उभट आणि रूंदीला कमी असा चेहरा म्हणजे आयताकृती चेहरा असं म्हणता येईल. हनुवटीपाशी हा चेहरा निमुळता झालेला असतो. अशा चेहºयाच्या मुलींनी साधारणत: थोडेसे लटकणारे पण भरगच्च असलेले कानातले घालावेत. भरगच्च म्हणजे द्राक्षाचा घड जसा दिसतो त्याप्रमाणे डिझाइन असलेले; पण हनुवटीच्या रेषेपर्यंत लांबीला असलेले कानातले. त्यानं चेहºयाला काहीसा भरीव आकारही येईल आणि हे कानातले खुलून दिसतील.
२. चौकोनी चेहरा
लांबी, रूंदीला काहीसा समान असलेला हा चेहरा आणि हनुवटीही काहीशी चौकोनी असेल तर लांब, अंडाकृती आकाराचे, नाजूकसे कानातले निवडावेत. किंवा ठसठशीत असे टॉप्सही छान दिसतील. फक्त ते आकाराने मोठे आणि भरीव डिझाइन असलेले हवेत.
३. बदामी चेहरा
चेहरा जर बदामी असेल तर झुमके वापरायला हवेत.
४. अंडाकृती चेहरा
या चेह-याच्या तरुणींना कोणतेही कानातले छानच दिसतात. साधे टॉप्स, हलकेसे त्रिकोणी, लोंबते कानातले या चेहºयावर छान दिसतात.
५. डायमंड चेहरा
साधारणत: हनुवटीपाशी हा चेहरा लांब आणि निमुळता होत जातो. या चेहºयाच्या तरुणींना टेझल कानातले, मोठे झुमके छान दिसतात.
६. गोलाकार चेहरा
या चेह-याला लोंबते, निमुळते किंवा टॉप्स छान दिसतात.
- मोहिनी घारपुरे-देशमुख