रद्दीदान
By admin | Published: August 14, 2014 03:23 PM2014-08-14T15:23:05+5:302014-08-14T15:23:05+5:30
जुन्यातून नवे आनंद वाटणारा एक ग्रुप
Next
>युवा मोरया करतात काय?
१) तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. बोरिवली परिसरात राहणारी ही सगळी मुलं.
२) ते जव्हार परिसरातील पाड्यांवर नियमित जाऊन शैक्षणिक साहित्य, खेळ शाळकरी मुलांना देतात.
३) दिवाळीत स्थानिक लोकांसाठी गेट टुगेदरसारखे मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.
४) जुने कपडे वर्षातून दोनदा गोळा करून ते आदिवासी भागात नेऊन पोहचवतात.
नक्की करतात काय ते?
दीपक नेवासकर यांच्या
मार्गदर्शनानं गिरगावातल्या काही तरुण मुलांनी एकत्र येऊन हा ग्रुप सुरू केला. आता मात्र या ग्रुपचे कार्यकर्ते बोरिवली, पुणे, नाशिक, ठाणे, दादर भागातही काम करतात. ‘रद्दीदान’ ही या ग्रुपची पहिली कल्पना. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही आपापल्या भागातून रद्दी गोळा करतात. लोकांकडे जाऊन रद्दी मागतो. त्यातून येणार्या पैशातून दप्तरं, वह्या, पुस्तकं, यासारखं शैक्षणिक साहित्य घेऊन आदिवासी पाड्यांवर नेऊन पोहचवतो. दरवर्षी जूनमध्ये हा उपक्रम असतो. त्यानंतर ऑगस्टमध्ये शैक्षणिक खेळ आम्ही लहान मुलांसाठी घेऊन जातो. हे काम गेली १0 वर्षं सुरू आहे. शहरी वातावरणात जगणार्या तरुण मुलांना यानिमित्तानं आपला देश, माणसं, समस्या कळतात, हे महत्त्वाचं.
- विशाल कुलकर्णी
फेसबूक पेज-
https://www.facebook.com/
groups/45994735166/