सायकॉलॉजीतही आहे की करिअर आणि पैसा!..

By admin | Published: April 26, 2017 03:58 PM2017-04-26T15:58:49+5:302017-04-26T16:02:58+5:30

- अपॉच्र्युनिटीज आहेतच, पण त्यासाठी आपला स्तर थोडा वाढवावाही लागेल.

Career and money are also in psychology! .. | सायकॉलॉजीतही आहे की करिअर आणि पैसा!..

सायकॉलॉजीतही आहे की करिअर आणि पैसा!..

Next

 - अनुराधा प्रभुदेसाई

 
आजकाल अनेक जण सायकॉलॉजीकडे करिअर म्हणून पाहतात, पण त्यात काय करिअर आहे, करिअरचे ऑप्शन्स काय काय आहेत, हेच अनेकांना माहीत नसतं. 
 
खरं तर ज्या कुठल्या कोर्सला आपण प्रवेश घेतोय, त्यावेळी किंवा त्याआधीच त्यात आपल्याला काय काय करिअरच्या संधी आहेत, हे माहीत असायला हवं.
 
अमिषा या विद्यार्थिनीनं विचारलं, सायकॉलॉजी हा मुख्य विषय घेऊन मी बीए करीत आहे. आता एसवायबीएला आहे. पण यात करिअरच्या काय संधी आहेत, तेच मला माहीत नाही. करिअर एनहान्समेन्टसाठी मी काय करू? त्याच विषयात एमए करू कि दुसरा कुठला विषय निवडू?
 
 
खरं तर सायकॉलॉजीतही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आपल्या करिअरचा दावा आणखी ठामठोक करण्यासाठी इतरही काही गोष्टी करता येतील.
 
एमएला ‘क्लिनिकल सायकॉलॉजी’मध्ये स्पेशलायझेशन केलं तर हॉस्पिटल्समध्ये काम करण्याची संधी मिळू शकते.
 
‘इंडस्ट्रिअल सायकॉलॉजी’ आणि ‘कौन्सेलिंग सायकॉलॉजी’तलं स्पेशलायझेशनही संधीची अनेक दारं उघडून देऊ शकतात. यातील स्पेशलायझेशनमुळे अनुक्रमे उद्योग आणि शाळांमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. 
 
 
कौन्सेलिंगमधेच करिअर करायचं असेल तर त्यासाठीही अनेक पर्याय आहेत. यात कॉलेजमधील तरुण-तरुणींना आपल्याला मार्गदर्शन करता येईल. 
 
करिअर संदर्भात त्यांना अनेक प्रo्न पडलेले असतात. त्यांच्या प्रo्नांना आणि या तरुणांना गायडन्स करून त्यांच्या अडचणी सोडवता येतील आणि त्यातूनही चांगले पैसे मिळवून देणारं एक उत्तम करिअर उभं राहू शकतं. 
 
आपल्या करिअरला आणखी बूस्ट द्यायचं असेल तर सायकॉलॉजीतील स्पेशलायझेशनबरोबर ‘एचआर’संदर्भातील (ह्यूमन रिसोर्स) कोर्सेसही करता येतील. या कोर्समुळे विविध ठिकाणी तरुणांना रिक्रुट करण्याचा अनुभव घेता येईल.
 
याच जोडीला ‘लर्निंग डिसअँबिलिटी कोर्स’ करता येईल. काही मुलांना शिक्षणासंदर्भातील काही अडथळे असतात. ते दूर करण्यासाठी या कोर्सचा उपयोग होऊ शकेल. त्यामुळे शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. 
 
याशिवाय हिस्ट्री, इंग्लीश लिटरेचर, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स. इत्यादि विषयांतही एमए करता येईल. त्यानं संधीची अनेक कवाडं उघडी होतील. 
(anuradha@dishaforu.com)
(दिशा कौन्सेलिंग सेंटर)
 

 

Web Title: Career and money are also in psychology! ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.