तुमचं करिअर क्लॉक बरोबर वेळ दाखवतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 07:50 AM2019-09-12T07:50:00+5:302019-09-12T07:50:01+5:30

तुमची ओळख सांगा? काय आवडतं? तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेस सांगा? या प्रश्नांची उत्तरं देता येतात का तुम्हाला?

career Clock-new concept in career selection. | तुमचं करिअर क्लॉक बरोबर वेळ दाखवतंय का?

तुमचं करिअर क्लॉक बरोबर वेळ दाखवतंय का?

Next
ठळक मुद्देतुमच्या व्यक्तिमत्त्वाला हा अभ्यासक्रम पूरक कसा आहे ते सांगण्यासाठी/ पटवण्यासाठी लिहिताना - मांडताना तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल.

- डॉ. भूषण केळकर

डिजिटल प्रेझेन्सबद्दल आपण गेल्या आठवडय़ात बोललोच. आता मी तुम्हाला एक नवीन आयडियाची कल्पना देणार आहे. मी तिचं नाव ठेवलंय, ‘करिअर क्लॉक’. हे नाव ठेवण्याचं कारण असं आहे की, या चित्रामध्ये करिअरच्या मांडणीबद्दल एकूण बारा उपांग आहेत - जणू हे करिअरचे घडय़ाळ आहे.
पहिल्या स्थानावर असलेल्या उपांगापासून बाराव्या स्थानावर असणार्‍या उपांगार्पयत तुम्ही स्वतर्‍च स्वतर्‍चे विश्लेषण करा आणि त्यावरून तुम्हाला बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
उदाहरणार्थ मुलाखतीतला लाडका प्रश्न र्‍ 
‘तुमची ओळख सांगा’, ‘तुमचे वैशिष्टय़ सांगा’, ‘तुमची बलस्थाने व कमतरता सांगा’, ‘आम्ही तुम्हाला का निवडावे, हे सांगा’, आणि असे बरेच!
तुम्ही तुमचा सीव्ही, रिझ्युमे लिहिणार असाल तरीही तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल की नेमके कोणते मुद्दे तुम्ही हायलाइट करणार आहात.
समजा तुम्ही परदेशी जाण्यासाठी प्रयत्न करत असाल किंवा आजकाल भारतातही विशेषतर्‍ मॅनेजमेंटच्या बर्‍याच संस्थांमध्ये तुम्हाला ‘एसओपी’ म्हणजे ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ द्यावं लागतं. त्यात तुम्हाला तुम्ही जो अभ्यासक्रम निवडता आहात तो तुम्हाला का करायचा आहे; तुमचा हेतू काय आहे आणि तुमच्या व्यक्तिमत्त्वाला हा अभ्यासक्रम पूरक कसा आहे ते सांगण्यासाठी/ पटवण्यासाठी लिहिताना - मांडताना तुम्हाला हे ‘करिअर क्लॉक’ उपयुक्त ठरेल.
एकूण काय हे करिअर क्लॉक म्हणजे एका दगडात दोन नव्हे तर अनेक पक्षी अर्थात कामं साधणारी कल्पना आहे.
आपण या आणि पुढील लेखांमध्ये या 12 उपांगांबद्दल नीट जाणून घेऊ ज्यायोगे तुम्हाला सॉफ्ट स्किलमधील  तुमच्या उमेदवारीचे प्रेझेंटेशन वा सादरीकरण नीट करता येईल.
पहिला भाग म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाची व स्वभाववैशिष्टय़ांची ओळख. यासाठी तुम्ही अनेक सायकोमेट्री टेस्टपैकी काही करू शकाल. त्यातून तुम्हाला तुम्ही अधिक तर्कशुद्ध आहात की भावना प्रधान, लोकांमध्ये रमता की एकांतात, शिस्तबद्धता तुम्हाला अधिक आवडते की मनस्वीपणा इ. स्वभाववैशिष्टय़े जाणू शकाल आणि तेही शास्रशुद्ध प्रकाराने. याचा उपयोग म्हणजे तुम्ही करिअरची निवड व त्यातील प्रगतीचे नियोजन तुमच्या स्वभावानुसार व त्याला सहज पूरक पद्धतीने करू शकाल.
मुलाखतीत तुम्हाला विचारले की तुमची खासियत सांगा आणि तुम्ही जर हे सांगू शकतात की  बिग फाईव्ह किंवा एमबीआटी अन्य काही चाचण्यांवरून असं कळतंय की तुम्ही विश्वासार्ह आणि नवनिर्मितीक्षम आहात तर तुमचं उत्तर अधिक विश्वासार्ह होईल.
या ‘करिअर क्लॉक’चे अन्य भाग आपण पुढील लेखांमध्ये बघूच.

 

Web Title: career Clock-new concept in career selection.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.