करिअरच्या वाटेवर तुम्ही यंत्राशी शर्यत लावताय? पण जिंकणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:41 PM2019-06-06T13:41:35+5:302019-06-06T13:42:04+5:30

उद्याच्या जगात जर यंत्रच माणसाची कामं अचूक, न सांगता, वेगानं आणि स्वतर्‍हून करणार असतील तर माणसांनी करायचं काय? तेव्हा माणसाच्या हाताला रोजगार आणि खिशाला पैसा कसा मिळेल?

On the career path, you are racing with the machine? But who will win? | करिअरच्या वाटेवर तुम्ही यंत्राशी शर्यत लावताय? पण जिंकणार कोण?

करिअरच्या वाटेवर तुम्ही यंत्राशी शर्यत लावताय? पण जिंकणार कोण?

Next
ठळक मुद्देप्रचंड वेगानं बदलणार्‍या तंत्रज्ञानावर स्वार व्हायचं की त्याच्यापुढे हात टेकायचे, हा निर्णय आपल्यालाच घ्यावा लागणार आहे!

अतुल कहाते

यंत्र मानवांमुळे आपलं उद्याचं जग नक्की कसं असेल याची  कल्पनाही करवत नाही. खरं तर उद्याची वाट  बघण्याचीसुद्धा गरज नाही, आजच इतके बदल आपल्या अवतीभोवती आहेत. आणि ते दूर कुठंतरी नाही तर आपल्या आयुष्यात आपल्याच अवतीभोवती घडत आहेत.
* मिलग्रो नावाची कंपनी भारतात गेल्या काही वर्षापासून  घरात झाडलोट करणारे यंत्नमानव विकतेच आहे. हे  यंत्र मानव म्हणजे aगोलाकार तबकडय़ांसारखे असतात. या  तबकडय़ा घरभर फिरून सगळीकडचा कचरा साफ करतात. पूर्वी या तबकडय़ा फक्त घर झाडू शकत; आता  मात्न त्या घर पुसूही शकतात ! तसंच ठरावीक वेळेला  आपलं काम सुरू करणं, काम संपलं की आपोआप  चार्जिगसाठीच्या ठिकाणी जाऊन बसतात. म्हणजे घरकाम करण्यासाठी जर यंत्र आले, तर आज ते काम करणार्‍या माणसांचं काम जाईल का?
याशिवाय डिशवॉशर, कपडे धुवून वाळवून देणारे वॉशिंग मशीन ही सगळी यंत्नसुद्धा आपल्याकडे येत आहेत. साहजिकच ही कामं मानवानं न करता यंत्रानं करण्याची शक्यता येत्या काळात अधिक आहे.
****
* जैवतंत्नज्ञानामुळे कुठल्याही जिवाणूंचा खातमा करू  शकणारी प्रतिजैविकं  तयार करणं, खराब होत असलेले  अवयव बदलणं अशा गोष्टी तर घडतीलच; पण अक्षरशर्‍  जनुकांच्या पातळीवर जाऊन त्यात बदल करणं आणि अगदी मानवावर टेलर मेड उपचार करणं शक्य होईल, असेही बदल वैद्यकीय क्षेत्रात घडत आहेत.
****
* मधुमेह असलेल्या लोकांना रक्तातल्या साखरेची  पातळी वरखाली झाली की आपोआप इन्शुलिन  टोचणारी यंत्नणा भविष्यात सहजपणे उपलब्ध असेल.  शरीरातल्या सगळ्या क्रि यांवर लक्ष ठेवणारी मॉनिटर्स    शरीरात घालता येतील. साहजिकच कुठलाही आजार  जडण्याची शक्यता दिसताच त्याला प्रतिबंध करणारी यंत्नणा लगेचच अमलात आणली जाईल. म्हणूनच कदाचित भविष्यात चिरतारुण्य, अमरत्व, अशक्यप्राय  शस्रक्रिया या आवाक्याबाहेरच्या गोष्टी अधिकाधिक  सोप्या होत जातील.
****
नॅनो तंत्नज्ञानामुळे कल्पनेपलीकडच्या क्षमता असलेली  इलेक्ट्रॉनिक उपकरणं, कधीच खराब न होणारे किंवा  मळणारे कपडे, भन्नाट प्रकारची वाहनं, उपकरणं, रोजच्या  वापरातल्या भन्नाट वस्तू हे सगळं शक्य होऊ शकेल.
****
करमणुकीच्या विश्वात तर नुसता धुमाकूळच माजेल.  व्हच्यरुअल रिअ‍ॅलिटी तसंच ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी म्हणून  ओळखल्या जाणार्‍या तंत्नज्ञानांमुळे घरबसल्या आपण  स्वित्र्झलडमधल्या बर्फात खेळण्याचा अनुभव घेऊ शकू  किंवा ऑस्ट्रियामधल्या नाझी छळछावण्यांमध्ये फेरफटका  मारू शकू. एखाद्या चित्नपटामध्ये आपण चक्क हवी ती  भूमिका खर्‍या पात्नाऐवजी केल्याचा आभास निर्माण करू  शकू. टीव्ही, म्युझिक प्लेअर या सगळ्या संकल्पना  कदाचित कालबाह्य होतील. अतिवेगवान इंटरनेटचा वापर  करून आपण एकाच पडद्यावर टीव्ही, इंटरनेट, गेम्स,  आभासी जग हे सगळं अनुभवू शकू. अर्थातच स्मार्ट टीव्हीसारख्या संकल्पना वापरून टीव्ही निर्माते यातून मार्ग  काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं तर आपण आतासुद्धा  अनुभवतच आहोत.
****
*पैसा आणि चलन यांच्या बाबतीत होणारे बदल आपण  काहीअंशी अनुभवतोच आहोत. कागदी आणि नाण्यांच्या  स्वरूपातल्या चलनाचं स्थान अधिकाधिक कमकुवत होत  जाईल. डिजिटल चलनाचा वापर प्रचंड मोठय़ा प्रमाणावर  वाढेल. त्यातही क्रे डिट किंवा डेबिट कार्ड्स कितपत  वापरली जातील याविषयी शंका आहेच. याचं कारण  म्हणजे निती आयोगमध्ये काम करत असलेल्या अमिताभ कांत यांच्या म्हणण्यानुसार फक्त आपल्या अंगठय़ांच्या  ठशांवरच सगळे आर्थिक व्यवहार घडू शकतील.  साहजिकच अर्थकारणामध्ये विलक्षण उलथापालथी  घडतील. काय सांगावं, भविष्यात बँकांच्या शाखाच  कदाचित नसतील. एटीएम्सची गरजही भासणार नाही.  कित्येक बँका आतापासूनच भारतात घरबसल्या बँक खातं  उघडणं आणि आपल्या खात्याचे संपूर्ण व्यवहार फक्त  इंटरनेटवरून करणं अशा सोयी उपलब्ध करून देत आहेत.

*******

* शिक्षण क्षेत्नाचं रंगरूप बदलायला सुरुवात झालेलीच  आहे. पारंपरिक पद्धतीनं चालवल्या जाणार्‍या शाळा या  युगात कालबाह्य ठरतील. महाविद्यालयांना तर विलक्षण  स्पर्धेला तोंड द्यावं लागेल. इंटरनेटवरून हव्या त्या अभ्यासक्रमाला हव्या त्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा  अशी पद्धत रुजेल. उदाहरणार्थ केंब्रिज स्कूल ऑफ  इकॉनॉमिक्समधून अर्थशास्र आणि मुंबईच्या  आयआयटीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग असं एकाच  वेळी पुण्यात बसलेला विद्यार्थी घरबसल्या करू शकेल अशीही शक्यता आहे. साहजिकच  प्रवास, अंतर,  भाषांमधला फरक आणि त्याच्याशी संबंधित असलेले  अडथळे हे सगळंही इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. 
*******
* प्रवास करण्याची गरज हौसेपलीकडे उरणार नाही. रोज ऑफिसला तासन्तास प्रवास करून जाण्याचीही गरज उरणार नाही. कार्यालयांमध्ये कर्मचार्‍यांनी आठवडय़ातून  एकदा फक्त बैठकीसाठी वगैरे जाणं अशी पद्धत असू  शकेल. उरलेला सगळा वेळ कर्मचारी घरूनच काम  करतील.
****
या आणि इतर अनेक गोष्टी उद्याच्या जगात नक्कीच  घडतील याविषयी अजिबात शंका नाही. फक्त हा ‘उद्या’   नक्की कधी उजाडेल म्हणजे किती लवकर किंवा किती उशिरा हे आज सांगणं कठीण आहे. भविष्यातल्या  वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि कालखंडात यातल्या अनेक  गोष्टी घडत जातील. मात्र त्या एकदम अचानकपणे घडतील असंही नाही. हळूहळू त्या दिशेनं प्रवास होत  असल्याचं आपल्याला जाणवत राहील. त्या प्रवासाकडे आपली नजर असावी. बदल काय वेगानं होत आहेत, याचं भान असावं आणि ते बदल जर या वेगानं घडत असतील तर आपल्याला त्या जगात उत्तम करिअर करता यावं, त्या बदलांचा लाभ व्हावा एवढी खुणगाठ तरी मनाशी असायला हवी !

Web Title: On the career path, you are racing with the machine? But who will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.