लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:36 PM2018-01-24T15:36:20+5:302018-01-25T10:07:08+5:30

माणूस आणि टेक्नॉलॉजी हे नातंच आता बदललं. आता टेक्नॉलॉजी माणसाच्या पुढे निघतेय.

CCTV sees ... a new revolution that transforms Industy 4.0 career | लाट

लाट

googlenewsNext

- डॉ. भूषण केळकर

इण्डस्ट्री ४.० विषयी आपण बोलतोय. गेल्या आठवड्यात इंडस्ट्री १.० ते ३.० पर्यंतचा प्रवास कसा झाला हे पाहिलं. आणि त्यापुढचा म्हणजेच औद्योगिक क्रांतीचा अर्थात इंडस्ट्री ४.० ची सुरुवात हा टप्पा आला. तो २०११ मध्ये. म्हणजे ज्याची चर्चा आपण करतोय तो काळ सुरू झालेला आहे. आणि त्यासाठी लागणारी इको सिस्टिमही आधीच तयार होत होती. त्यामध्ये होतं आयओटी. अर्थात इंटरनेट आॅफ थिंग्ज. क्लाउड कम्प्युटिंग. रोबोटिक्स आणि एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्स. त्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट अंतर्भूत झाल्याने इंडस्ट्री ४.० तयार झालं. ती म्हणजे सायबर फिजिकल सिस्टिम. म्हणजेच स्वत:चं नियंत्रण स्वत: करू शकणारी, आभासी (सायबर) व मूर्त (फिजिकल) जगाला जोडली गेलेली प्रणाली.
इंडस्ट्री ४.० ची सुरुवात २०११ मध्ये झाली ती इंडस्ट्री ४.० या नावाने. जर्मन सरकारनी कार्यान्वित केलेला एक हायटेक स्ट्रॅटेजी प्रोजेक्ट स्मार्ट फॅक्टरी म्हणून मांडला गेला. हानओव्हर फेअर ही जगप्रसिद्ध औद्योगिक व यंत्र जगतातील ‘जत्रा’. २०११ मध्ये तिथं इंडस्ट्री ४.० या नावाचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि मग पुढे हेच नाव प्रचलित झालं.
आॅक्टोबर २०१२ मध्ये इंडस्ट्री ४.० वर्कग्रुपने जर्मन सरकारला त्यांच्या सूचना व संकल्पना सादर केल्या. त्यामुळेच या वर्कग्रुपच्या सदस्यांना इंडस्ट्री ४.० चे संस्थापक/जनक मानलं जातं. ८ एप्रिल २०१३ मध्ये पुन्हा एकदा हॅनोव्हर जत्रामध्येच इंडस्ट्री ४.० चा अंतिम मसुदा व अहवाल सादर केला गेला. त्याच वर्षी आपल्याला माहिती असणाºया ‘मॅकेन्झी’ या जगप्रसिद्ध कंपनीने Siegfriend Dais या बॉश जर्मन कंपन्यांच्या अधिकाºयांची मुलाखत घेतली. मुलाखत घेतली व त्यातून जो वेग इंडस्ट्री ४.० ने पकडला तो धडाक्यातच. २०१४ पासून जर्मनीच नव्हे तर अन्य अनेक विकसित व विकसनशील देशांनी इंडस्ट्री ४.० ची अपरिहार्यता, उपयुक्तता आणि ताकद ओळखली. ती कार्यान्वित केली.
आणि आता ती लाट आपल्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातलं नातंच त्यानं बदलेल. त्यानं आपल्यावर कसा परिणाम होतोय त्याविषयी पुढच्या लेखात

इंडस्ट्री ४.० चं तंत्र काय?

इंडस्ट्री ४.० ची थोडी तांत्रिक परिभाषेत ओळख करून घेऊ. kagermaun whalster आणि Helbing यांच्या २०१३ च्या मसुद्यानुसार चार अत्यंत महत्त्वाची सूत्रं इंडस्ट्री ४.० मध्ये अंतर्भूत आहेत.
१) इण्टरोपरॅबिलीट म्हणजे यंत्रे- उपकरणं, सेन्सर्स व माणसं हे चारही घटक एकमेकांना इंटरनेटने जोडलेलं असणं. यात आयओटी येतं आणि आय आयओपी म्हणजेच इण्टरनेट आॅफ पिपलसुद्धा येतं. उदा. आपण आता मोबाइल वापरून घरातील ए/सी. बंद करू शकतो.
२) इन्फॉर्मेशन ट्रान्सपरन्सी. माहितीची पारदर्शकता भौतिक व मूर्त जगाची आभासी व डिजिटल प्रतिकृती उपलब्ध असणं. ही डिजिटल प्रतिकृती असल्यानं ती सर्वांना सर्व ठिकाणी सर्वकाळ उपलब्ध असणं. उदाहरणार्थ एखाद्या भल्यामोठ्या अजस्त्र कारखान्यातील कोपरान् कोपरा आणि प्रत्येक यंत्र वा उपकरण नेमकं काय स्थितीत आहे याची माहिती कंट्रोल रूममध्ये असणं. ती कुठेही शेअर करता येणं. सोपं सांगू, ते म्हणजेच सीसीटीव्ही!
३) तांत्रिक मदत अर्थात टेक्निकल असिस्टन्स. सर्व माहितीच्या आभासीकरण व पारदर्शकतेमुळे माणसाची निर्णयप्रक्रिया सोयी करण्यासाठी केलेली मदत. त्याचबरोबर ती अंमलात आणण्यासाठीची मदत.
४) निर्णयांचे विकेंद्रीकरण करणं. यंत्रे, उपकरणे, सेन्सर्स याबद्दलचे निर्णय कुठूनही घेता येण्याची क्षमता व त्याचबरोबर स्वयंनिर्णयांची व स्वयंसिद्धतेची क्षमता या यंत्र व उपकरणांमध्ये असणं.

(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)

Web Title: CCTV sees ... a new revolution that transforms Industy 4.0 career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.