सेलिब्रेशन...ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 01:00 AM2017-10-19T01:00:00+5:302017-10-19T01:00:00+5:30

ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच.. पण हे लख्खं उजळलेले दिवे माझ्यासोबत कायम असतील आणि त्या प्रकाशात मी प्रत्येक क्षणी आनंद वेचेल. आनंद वाटेल..जगण्याचं सेलिब्रेशन मनापासून करेल! आज. उद्या. कायम.

Celebration ... This is the four-day fireworks, there is still lightness | सेलिब्रेशन...ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच

सेलिब्रेशन...ही चार दिवसांची आतषबाजी, रोषणाई तर आहेच

Next

सेलिब्रेशन.
हा शब्द कधी आला आपल्या आयुष्यात.
जरा काही चांगलं झालं की,
आपण म्हणतो चला, पार्टी करू..
चलो सेलिब्रेट करते है..
पण करतो आपण खरंच सेलिब्रेट.
आणि केलंच तर ‘खाणं-पिणं’
धांगडधिंगा नाचणं यापलीकडे
सेलिब्रेशनचा आनंद येतो आपल्या वाट्याला?
- अनेकदा नाहीच!
कारण पार्ट्या, खाणंपिणं, चहाच्या टपरीपासून पबपर्यंतचा दंगा
हे सारं आपल्या आयुष्यात कॉमन व्हायला लागलं.
विकेण्ड पार्ट्या, लॉँग ड्राइव्ह,
लेट नाइट पार्ट्या हे सारं तर रुटीनच.
आणि ते नियमित करूनही आपला
आनंद आपल्या मनात खोलखोल उतरत नाही.
अत्तराच्या मंद गंधासारखी आपली सोबत करत नाही,
आपल्या मनात दरवळत नाही..
असं का?
कारण आपण जगण्याचं सेलिब्रेशन करत नाही..
आपल्याला छोट्या गोष्टीत आनंदच होत नाही..
आईनं केलेल्या बटाट्याच्या काचºया,
बहिणीच्या हातचं गोड-आंबट वरण,
मित्रानं आठवणीनं आपल्यासाठी डब्यात आणलेला चिवडा,
कुणीतरी आपल्यासाठी जेवायला थांबणं,
कुणी आपली वाट पाहणं,
आपल्याला मेसेज करून कुठेस विचारणं,
पहिल्या पावसात भिजत आपल्यासाठी भजी घेऊन येणं,
पौर्णिमेचा चंद्र बघ किती सुंदर दिसतोय असं फोन करून सांगणं,
आपल्या वाढदिवसाला पहिला फोन
करता यावा म्हणून मध्यरात्रीपर्यंत जागणं,
आणि आपण उदास असलो, चिडलो, भडकलो
तरी ते समजून घेणारं कुणीतरी असणं..
यासाºयात आपल्याला सेलिब्रेशन दिसत नाही.
मोगºयाची मूठभर फुलं,
रस्त्यावरचा प्राजक्ताचा सडा,
सिग्नलवर उभी हसरी शाळकरी मुलं
यांच्याकडे पाहून आपल्याला आनंद होत नाही..
आणि मग आपलं सेलिब्रेशन मनात उतरत नाही..
जगण्यात मुरत नाही..
यंदा दिवाळी साजरी करताना
सांगू ना स्वत:ला की,
ही चार दिवसांची आतषबाजी आहे,
रोषणाई तर आहेच..
पण हे लख्खं उजळलेले दिवे
माझ्यासोबत कायम असतील
आणि त्या प्रकाशात मी प्रत्येक क्षणी आनंद वेचेल.
आनंद वाटेल..
जगण्याचं सेलिब्रेशन मनापासून करेल!
आज. उद्या. कायम.

Web Title: Celebration ... This is the four-day fireworks, there is still lightness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.