तरुण मुलग्यांना चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 05:55 PM2018-02-14T17:55:47+5:302018-02-15T10:38:03+5:30
अमुक ‘डे’, ढमुक ‘डे’लाच मनातलं काहीतरी सांगावं असं खरं तर आता काही उरलं नाहीये. मनात आलं, बोलून टाकलं, शेअर केलं - सब्जेक्ट क्लोज्ड!
...मुली नॉट अलाउड!
अमुक ‘डे’, ढमुक ‘डे’लाच मनातलं काहीतरी सांगावं
असं खरं तर आता काही उरलं नाहीये..
मनात आलं, बोलून टाकलं, शेअर केलं
- सब्जेक्ट क्लोज्ड!
मात्र तरीही कधीकधी वाटतं ना की,
निमित्त मिळावं काहीतरी
आणि जे मनात आतात खोल दडवून ठेवलंय
ते सांगता यावं..
किंवा असंही काहीतरी सांगावं की,
जे खरं तर ‘आम’ आहे;
पण रोजच्या धबडग्यात सांगायचंच राहून जातं,
सांगायला हवं असं वाटतं,
मनात असतं पण शब्द सापडत नाहीत...
त्यात मुली तर प्रचंड बोलतात,
मनातलं शेअर करतात.
मुलं मात्र अनेकदा अडकतात
दिल की बात होठोंपर
आते आते रुक जाती है..
कधी भीती वाटते, कधी संकोच
तर कधी सवयच नसते असं थेट
स्वत:ला ‘एक्स्प्रेस’ करायची..
पण मिळाली अशी संधी तर..?
‘आॅक्सिजन टीम’ला वाटलं की,
तरुण मुलग्यांना (हो फक्त मुलांनाच, मुली नॉट अलाउड!)
द्यावं एक चॅलेंज!
कसलं चॅलेंज?
८ मार्च जवळ येतोय. म्हणजे महिला दिन.
स्त्री किती नात्यांनी येते तुमच्या आयुष्यात!
आधी आई...बहीण.. मग मैत्रीण.. मग गर्लफ्रेंड... मग कलीग...
कधी तिचा आधार वाटतो, कधी वैताग होतो,
कधी ती एक ‘प्रॉब्लेम’ होऊन बसते, तर कधी न सुटणारं कोडं!!
तिच्या हातून मार पडतो, तिच्याच कुशीत शिरता येतं,
तिची घट्ट मिठी...तिचा स्पर्श...
कशी असते ‘ती’?
तुम्हाला कशी दिसते? वाटते?
हे एका शब्दात, अगदी अवघड झालं तर एका वाक्यात सांगायचं!!
.. पण लिहून नव्हे!
थेट बोलून आणि तुमच्या मोबाइल कॅमेºयानं ‘शूट’ करून!
फाफटपसारा, लांबलचक बोलायचं नाहीये
शक्य तर एका शब्दात..
किंवा मग आठ-दहा शब्दांच्या एका वाक्यात!
- त्यासाठी हे वाक्य पूर्ण करा..
‘ती म्हणजे.....
कसं पाठवाल ?
१) ती म्हणजे...
हे वाक्य पूर्ण करत तुमच्या मोबाइल कॅमेºयात शूट करा.
२) तेवढीच क्लिप आम्हाला मेल करा
lokmatoxygen@gmail.com
3) अंतिम मुदत २२ फेब्रुवारी २०१८
४) ‘आॅक्सिजन’च्या एका ग्रॅण्ड प्लॅन मध्ये तुमचा व्हिडीओ सिलेक्ट झाला तर
तुम्हाला मिळेल एक मस्त सरप्राइज.
५) व्हीडीओसह तुमचंं नाव, पत्ता, वय आणि संपर्क क्रमांकही पाठवा.