चे गव्हेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 08:59 AM2018-05-17T08:59:51+5:302018-05-17T08:59:51+5:30
त्यानं केला तसा प्रवास करायचा तर जगाचं पुस्तक उमगत जातं..
‘इफ ट्रॅव्हलिंग वॉज फ्री, यू माइट नेव्हर सी मी अगेन’, असे किंवा अशा आशयाचे अनेक डायलॉग्ज आपण फेसबुकवर सततच वाचत असतो. या साऱ्यानं सध्या भटकंती, प्रवास याला खूप ग्लोरिफाय केलं आहे. अर्थात चार गावं फिरल्यानं, वेगळा समाज पाहिल्याने आपण अधिक शिकत असतो हे खरंच. पण म्हणून वर्षातून चार वेळा गोव्याला जाणं याला देशाटन वगैरे म्हणण्यासारखं नाही.
देशाटन वेगळं. भटकंती वेगळी.
तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून जरा बाहेर पडलात, जग पाहिलंत की तुम्हाला जसं जग कळायला लागतं, तसं आपण स्वत: कसे आहोत हेही कळायला लागत. पण, यासाठी लोकांशी प्रत्यक्ष बोलायला हवं, त्यांची भाषा, संस्कृती, चालीरिती, प्रश्न आणि मुख्य म्हणजे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. यानेच तुम्ही खºया अर्थाने समृद्ध होता.
असंच काहीसं आपल्या अर्नेस्टो ‘चे’ गव्हेरा बद्दल घडलं.
हो, आपल्या टी-शर्ट्सवर ज्याचं चित्र असतं, तोच, क्युबामधल्या क्र ांतीचा महत्त्वाचा भाग, क्र ांतिकारी लेखक. डॉक्टरकी शिकून सेटल व्हायचं त्याचं ध्येय होतं. ब्युनोस एरिसमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, हे सगळं ‘खरं’ जग नाही, ही अस्वस्थता त्याला सतत छळत होती. त्या काळात त्यानं दोन प्रवास केले. पहिला प्रवास एकट्यानं स्वत:च्या सायकलीला एक मोटार लावून केला. साधारण दोन हजार किलोमीटर्सचा प्रवास त्यानं अर्जेंटिनाच्या ग्रामीण भागामध्ये फिरून पूर्ण केला. पुढच्या प्रवासात त्याने आपल्या मित्राबरोबर संपूर्ण लॅटिन अमेरिका फिरून पार केला. हा प्रवास त्यानं ९ महिन्यांत पूर्ण केला.
या प्रवासात खाणकामगार, शेतकरी, सरकारबरोबर काम करणारे ठेकेदार यांना तो भेटला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. अनेक लोकांपर्यंत त्याची वैद्यकीय सेवाही पोहोचवली. या प्रवासात भांडवलशाही आणि एकाधिकारशाहीने त्याच्या लॅटिन अमेरिकेला ग्रासलं आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
त्याच्या या प्रवासासंबंधी आणि त्याच्या आयुष्याला कलाटणी देणाºया या प्रवासासंबंधी त्यानं ‘मोटरसायकल डायरीज’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हे मूळच स्पॅनिश भाषेतलं पुस्तक इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे.
तुम्ही यूट्युबवर गेलात आणि उँी ॠ४ी५ं१ं असं सर्च केलंत तर तुम्हाला असंख्य डॉक्युमेंटरी सापडतील. त्यातही या प्रवासाबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
पाहा आणि ठरवा, प्रवासाला जायचं का? आणि करायचा प्रवास तर कसा करायचा..?