चायनिज भेळ, इंटरनेट आणि चटकदार चव

By admin | Published: March 14, 2017 04:32 PM2017-03-14T16:32:57+5:302017-03-14T16:32:57+5:30

स्ट्रीट फूड. म्हणजे खवय्यांची चंगळच!

Chinese beans, internet and sauces taste | चायनिज भेळ, इंटरनेट आणि चटकदार चव

चायनिज भेळ, इंटरनेट आणि चटकदार चव

Next

 - भक्ती सोमण

स्ट्रीट फूड.
म्हणजे खवय्यांची चंगळच!
रस्त्यावर उभं राहून आपण जे चमचमीत खातो, त्या चवीची तोड नसते अनेकदा. मुख्य म्हणजे प्रत्येक शहर, प्रत्येक गल्ली, तिथला गाडा इथले पदार्थ सारखे असले तरी त्याची चव वेगळी असते.
आता मुंबईत आलात आणि रस्त्यावरचा वडापाव नाही खाल्ला तर काय मजा. मुंबईची मजा अनुभवायची तर वडा पाव तर मस्ट. त्यात आता भेळ- पाणी पुरी, फ्रेंकी, इडली डोसा या प्रकारांबरोबर क्रेझ आहे ती चायनिज भेळेची. 
मुळात चायनिज भेळ ही काही अस्सल चायनिज प्रकारात मोडणारी ‘चायनिज’ म्हणावी अशा पदार्थातली नाहीच. चायनिज स्वयंपाकात वापरले जाणारे घटक एकत्र करुन त्यांना दिलं गेलं आहे हे भारतीय रूप. 
कोबीची भजी, आलं, लसूण, कांदा, कोबी परतून दिलेले फ्राईड न्यूडल्स आणि शेजवान चटणी अशा एकत्रीकरणातून केलेली ही भेळ अवघ्या १० रूपयात मिळते. मुंबईत तर सर्वच स्टेशन, शाळा-कॉलेजच्या परिसरात तर हमखास. कमी किंमतीत पोटभरीचे साधन म्हणून अनेकजण ती मिटक्या मारत खातात. 
पण स्ट्रीट फूडच्या या चवीत स्वच्छतेचं काय? 
जरा कधीतरी अशा ठेल्यांवर लक्ष देऊन बघाच. एकदा माझंही तसंच झालं, दुपारी चारची वेळ, भजी तळल्याचा घमघमाट येत होता, म्हणून पावलं आपसूकच त्या वासाकडे वळली. दादर स्टेशनबाहेरच्या त्या भेळवाल्याकडे चांगलीच गर्दी होती. पण...
नुकताच पाऊस पडत असल्याने खाली चिखल आणि पाणी... अतिशय किचकिचाट. अशा वातावरणात ती भेळ चवीला चांगली असल्याचं एकजण म्हणाला. उलट पावसाळा नसेल तर आजूबाजूला घाण ही असतेच. त्यामुळे या चटकदार खाण्यापायी आपण आरोग्याचं नुकसान तर करत नाही ना हेही पाहणं महत्वाचं ठरतं. आहारतज्ज्ञ तर रस्त्यावरची ही चायनिज भेळ खाऊच नका, असा सल्ला देतात. 
या भेळेसंदर्भात टॅक्सीत आॅफिसमधल्या मैत्रीणीशी चर्चा चालू होती. ठिकाण आल्यावर आल्यावर आम्ही उतरणार इतक्यात, तो टॅक्सीवाला म्हणाला, कशाला ती रस्यावरची भेळ खायची. त्यात जो शेजवान सॉस वापरला जातो तो मुंबईतल्या एका मार्केटमध्ये ७५ रू पाच लिटरच्या बरणीप्रमाणे मिळतो. तर पाऊच फक्त १० रूपयात! त्यापेक्षा इंटरनेटवर पाहून घरी करा ना..
ऐकून धक्काच बसला.
मान्य आहे की चायनिज भेळ अत्यंत चांगली लागते, पण म्हणून आपण ती कुठंही खाणार का?
मग त्यावर उपाय काय?
उपाय एकच, चायनिज भेळ आता घरीही करता येते युट्यूबवर पाहून. त्यामुळे तर टॅक्सीचालक काकाही इंटरनेट कसं वापरता येईल हे सांगतात.
हे वाचून तुम्ही म्हणालं ही तर टिका करतेय आमच्या आवडत्या भेळेवर. पण ही वस्तुस्थिती आहे. खरंतर रस्त्यावरचं खाणं कधीतरी खायला नक्कीच हरकत नाही. पण किमान स्वच्छ जागी खाल्लं तर ते आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलंच आहे. नाही का?

Web Title: Chinese beans, internet and sauces taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.