जेईई ऍडव्हान्स परीक्षेत पहिला आलेला चिराग; काय आहे त्याच्या यशाचं रहस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 02:54 PM2020-10-08T14:54:36+5:302020-10-08T14:58:14+5:30
चिरागचं हे ‘फोकस्ड’ असणं आणि अफाट मेहनत हे त्याच्या यशाचं गमक आहे, टॉपर होण्यापलीकडची आहेत त्याची स्वप्नं.
- राहुल शिंदे
तो मुलगाच भन्नाट आहे. देशात जेईई अॅडव्हान्स परीक्षेत त्याचा पहिला नंबर आला. टॉपर मुलगा. मात्र त्यानं त्याच दिवशी सांगून टाकलं होतं की, पहिला नंबर आला असला तरी भारतातील कोणत्याही आयआयटीमध्ये मी प्रवेश घेणार नाही. मी अॅस्ट्रोफिजिक्समध्ये काम करणार.
त्याच्याशी अजून गप्पा मारायच्या म्हणून त्याला फोन केला, तर तो म्हणाला मला रात्री 2 वाजता वेळ असतो, तेव्हा बोलूया का?
तर अशा मध्यरात्री त्याच्याशी मस्त गप्पा रंगल्या आणि एका अतिशय हुशार पण भन्नाट आणि अतिशय अभ्यासू मुलाची ओळख झाली. चिराग फलोर त्याचं नाव.
तर गप्पा सुरू होता तो म्हणाला, मला ता:यांच्या उत्पत्तीचा शोध लावणारे खगोलशास्रज्ञ डॉ. चंद्रशेखर आवडतात. त्याला सहज विचारलं, म्हणजे तुला चंद्रशेखर बनायचं आहे का?
तो चटकन म्हणाला, ‘नाही, मला चिराग व्हायचं आहे!’
वेगवेगळ्या परीक्षा देऊन स्वत:ला सिद्ध करण्याचा एक वेगळाच छंद चिरागला लहानपणापासूनच आहे. इयत्ता तिसरीत असताना त्याने शाळेत एक परीक्षा दिली त्यात त्याला छोटंसं बक्षीस मिळालं. मग पाचवीमध्ये दिलेल्या परीक्षेत पहिला
क्र मांक पटकावल्यामुळे त्याला आयपॅड मिळाला. त्यातून सातत्यानं अभ्यास करून विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा त्याला छंदच जडला. सातवी-आठवीमध्ये असताना त्याला समजलं की, अमेरिकेतील एमआयटीमध्ये उत्तम शिक्षण मिळतं. तेव्हापासून त्यानं ठरवलं की आपण एमआयटीत प्रवेश घ्यायचा. त्यासाठी तयारी सुरू केली. यावर्षी एमआयटी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेतून निवड झालेल्या भारतातील सहा विद्याथ्र्यातही चिरागची निवड झाली आहे.
चिराग सांगतो, ‘ मला अॅस्ट्रोफिजिक्समध्ये करिअर करायचं आहे. माझं स्वप्न आहे, भारतीयांसाठी मंगळ ग्रहावर घर बांधता यावं. अर्थात, सध्या हे शक्य नसलं तरी पुढील वीस-तीस वर्षानंतर काही ठरावीक नियंत्रित वातावरणात माणसाला मंगळावर राहाता येऊ शकतं, त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. त्यामुळे मीसुद्धा मंगळावर घर बांधण्याचा विचार करतोय!’
चिरागला विचारलं इतक्या लहान वयात कशात करिअर करायचं हे तुला पक्कं माहीत आहे, आत्मविश्वास दांडगा आहे ही नेमकी काय जादू आहे?
तो म्हणतो, ‘ शाळेत एकदा देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आले होते. त्यांनी आमच्याशी संवाद साधला, त्यांनी जे सांगितलं त्याचा माङयावर मोठा प्रभाव आहे.’
चिरागचं हे ‘फोकस्ड’ असणं आणि अफाट मेहनत हे त्याच्या यशाचं गमक आहे, टॉपर होण्यापलीकडची आहेत त्याची स्वप्नं.
चिराग सांगतो, तीन
महत्त्वाच्या गोष्टी
आपल्याला हे करता येणार नाही असा विचार कुणीही मनातही आणू नये. प्रयत्न केले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त आपण जे ठरवलं ते सोडायचं नाही आणि प्रय}ात सातत्य ठेवायचं. त्यासाठी काही गोष्टी ठरवून कराव्या लागतात. मी एक वर्ष अॅण्ड्रॉइड मोबाइल वापरला नाही. मला वाटतं, ज्या गोष्टीत आपला खूप वेळ जातो, त्यापासून माङया वयाच्या मुलांनी लांब राहिलं पाहिजे.
**
माङयासारख्या अनेक विद्याथ्र्याना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याऐवजी भारतातच शिक्षण घेता येईल, अशा दर्जेदार शैक्षणिक संस्था भारतात निर्माण व्हायला हव्यात. परदेशातील विद्याथ्र्यानी या शिक्षण संस्थांमध्ये शिकण्यासाठी यावं, अशी इच्छा आहे.
**
अॅस्ट्रॉनॉमी ओलिम्पियाड स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी चिरागला मिळाली. हंगेरी येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने भारतासाठी दोन गोल्ड मेडल मिळवले. या कामगिरीबद्दल देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला बालशक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझा उल्लेख ‘मित्र ’ असा केला, तो माङयासाठी कधीही न विसरणारा क्षण आहे.
(राहुल लोकमतच्या पुणो आवृत्तीत वार्ताहर आहे.)