कलर कोडेड थर्मामीटर
By admin | Published: January 7, 2016 10:10 PM2016-01-07T22:10:56+5:302016-01-07T22:10:56+5:30
जन्मजेयला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि उद्योगपतीही. त्याला अशी उपकरणं बनवायची आहेत जी सामान्य माणसाला सहज आणि स्वस्त उपलब्ध होतील.
Next
>जन्मजेय सिंग राठोड
इयत्ता दहावी, बेंगळूरू, कर्नाटक
जन्मजेयला शास्त्रज्ञ व्हायचंय आणि उद्योगपतीही. त्याला अशी उपकरणं बनवायची आहेत जी सामान्य माणसाला सहज आणि स्वस्त उपलब्ध होतील. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून त्यानं एक थर्मामीटर बनवलं आहे. ते रंगीत आहे. म्हणजे काय तर ताप खूप जास्त असला तर ते थर्मामीटर लाल रंग दाखवेन. मध्यम असेल तर नारंगी रंग दाखवेन आणि ताप नसेल तर ते हिरवा रंग दाखवेल. जर इमर्जन्सी असेल तर ते थर्मामीटर आपोआप अॅम्ब्युलन्सला फोन डायल करेल. एवढंच नाही तर नुस्ते रंग न दाखवता त्या थर्मामीटरमधून कुठल्या रंगाचं चिन्ह आलं आहे हे सांगेनही. म्हणजे व्हाइस मेसेजही येईन. फक्त मनुष्यच नाही तर पाळीव प्राण्यांसाठीही हे थर्मामीटर वापरता येऊ शकतं, असं जन्मजेयला वाटतं.
जन्मजेय म्हणतो, ‘सर्वाना सहज परवडेल आणि वापरताही येईल अशी आरोग्यसुविधा साधनं बनवणं हे माझं स्वपA आहे.’