केसांना Color करताय?
By admin | Published: November 27, 2014 09:42 PM2014-11-27T21:42:26+5:302014-11-27T21:42:26+5:30
अनेकजणी मोठय़ा हौशीनं हेअर कलर करून घेतात. काही दिवस केस दिसतातही खूप छान. नंतर मात्र त्या केसांकडे पाहवत नाहीत.
Next
धनश्री संखे (ब्युटी एक्सपर्ट) -
अनेकजणी मोठय़ा हौशीनं हेअर कलर करून घेतात. काही दिवस केस दिसतातही खूप छान. नंतर मात्र त्या केसांकडे पाहवत नाहीत. तुमच्या केसांचा असा झाडू होऊ नये असं वाटत असेल तर ‘कलर्ड’ केसांची कशी काळजी घ्यायची, हे नीट समजून घेऊन अत्यंत नियमितपणे काही गोष्टी कराच.
1. तुम्ही जर उत्तम दर्जाचा कलर वापरला असेल, तर तुमचे कलर्ड केस डल-लाईफलेस-भकास दिसताच कामा नये हा खरंतर पहिला नियम. त्यामुळे तुमचे केस जर असे डल दिसत असतील तर कलरची क्वालिटी एकदा तपासून पहाच.
2. हल्ली अनेक कलर्ड ब्रॅण्डसमधे इनबिल्ट कलर कंडिशनर्स असतात असतात. जे केसांचं उत्तम कंडिशनिंग करतात. त्यामुळे केस शायनी दिसतात, अर्थात केसांना चकाकी येते. त्यामुळे तसे कलर ब्रॅण्डस वापरा.
3. केस कलर केल्यानंतर उत्तम कंडिशनर आणि सीरम वापरण्याला काही पर्यायच नाही.
4.जेव्हा जेव्हा तुम्ही केस कलर करता तेव्हा तेव्हा तुमच्या केसांची पीएच लेव्हल अर्थात पोटेंशिय ऑफ हायड्रोजन लेव्हल बदलते. त्यामुळे कायम सल्फेट फ्री श्ॉम्पूच वापरायला हवेत, त्यासाठी तुमच्या हेअरस्टायलिस्टचा आवश्यक तर सल्ला घ्या.
5.पोस्ट कलर श्ॉम्पूच का वापरायचे तर ते केस कोरडे आणि करकरीत होऊ देत नाही. फ्रिजीनेस कमी करतात.
6.अनेक हेअर सलून्समधे हल्ली युव्ही फिल्टर्स सीरम उपलब्ध असतात. खरंतर जेव्हा जेव्हा तुम्ही घराबाहेर पडा तेव्हा तेव्हा हे सीरम्स तुम्ही केसांना लावायला हवेत. त्यामुळे केसांची चकाकी कायम राहते.
7.केसांना मेहंदी लावा असा सल्ला मी तरी देत नाही. मेहंदीमुळे केसांवर जो रंगाचा लालसर थर चढतो तो वर्षानुवर्षे जात नाही.
8.तुम्ही मेहंदी वापरत असाल तर ते थांबवून लगेच हेअर कलर करू नका. मेहंदी लावणं बंद करा आणि तीन महिने वाट पहा. त्यानंतर कलर करा. आधीच केलं तर सगळे पांढरे केस कलर होत नाही, काही ठिकाणी रंग बसतो, काही ठिकाणी नाही. त्यातून ड्रायनेस वाढतो तो वेगळाच.
9.अनेक चांगल्या सलून्समधे अर्गन फ्रूट हेअर स्पा असतात. त्यानं केसांचं पोषण होतं. ते करून घ्या.
10.नेहमी कोमट पाण्यानं केस धुवा. खूप गरम पाणी वापरलं तर ड्रायनेस वाढतो आणि मुख्य म्हणजे केस कलर केले म्हणजे झालं असं समजू नये, त्यापुढे खरी काळजी घेणं आवश्यक असतं. नाहीतर केसांचं झाडूच होतो.