कॉम्बो- दिवाळीचा नवा फॅशन ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 06:50 AM2019-10-24T06:50:01+5:302019-10-24T06:55:02+5:30

खण-इरकल या पारंपरिक कापडाचा उत्तम वापर करत रंगांचं आणि फॅशनचं फ्युजन हा यंदा दिवाळी ट्रेण्ड आहे.

Combo - New fashion trend of Diwali | कॉम्बो- दिवाळीचा नवा फॅशन ट्रेण्ड

कॉम्बो- दिवाळीचा नवा फॅशन ट्रेण्ड

Next
ठळक मुद्देसध्या दागिन्यांमध्ये चलती आहे ती ऑक्सिडाइजच्या दागिन्यांबरोबरच फ्रेब्रिक म्हणचेच कपडय़ापासून केलेल्या दागिन्यांची.

- भक्ती सोमण

दिवाळीत हमखास या साडय़ा नेसल्या जातात. एखादी सिल्कची साडी, ड्रेस विकत घेतला जातो. थोडक्यात सणाच्या दिवसात साडय़ा आवडीने नेसल्या जातात. 
दिवाळीसारख्या सणांच्या दिवसात प्रामुख्याने गडद रंगाच्या चमकदार लूक असणार्‍या साडय़ा जास्त चलतीत असतात. 
तसं यावर्षी काय आहे?
यावर्षी खण, इरकलच्या साडय़ा पुन्हा चर्चेत आहेत. खण, इरकल आवडतं कारण त्यानं मिळणारा ट्रेडिशनल लूक. रंगाचं वैविध्य बघायला मिळतं. याशिवाय कलर कोलाज करण्याकडे आता मुलींचा भर असतो. म्हणजे गुलाबी साडीवर निळा ब्लाउज, किंवा कॉटनच्या बारीक नक्षी असलेल्या साडीवर खणाचा ब्लाउज, प्लॅन साडीवर कलमकारी असं कॉम्बिनेशन केलं जातं. 

कॉम्बो
ंसमजा, तुम्ही अजरक साडी नेसली तर त्याच्यावर कलमकारीची बॉर्डर करता येऊ शकते. किंवा खणाची बॉर्डरही जोडता येऊ शकते. इरकल साडीवर तर खणाची बॉर्डर आजकाल पहायला मिळते. या प्रकारच्या साडय़ा नेसण्याकडेही मुलींचा कल आहे.  
--
पैठणीचे ड्रेस 
पैठणीच्या साडय़ा या खास समारंभात, लग्नात, सणांच्या दिवसात आवजरून नेसली जाते; पण साडीपेक्षा पैठणीच्या ड्रेसना आता खूपच मागणी आहे. साडीपेक्षा पैठणी ड्रेस घेण्याकडे मुलींचा ओढा खूप आहे. ड्रेसबरोबरीने पैठणीचे वन पीसही मिळतात. अर्थात हे बरेच महाग असतात.  

फ्रेब्रिकचे दागिने 
ेसध्या दागिन्यांमध्ये चलती आहे ती ऑक्सिडाइजच्या दागिन्यांबरोबरच फ्रेब्रिक म्हणचेच कपडय़ापासून केलेल्या दागिन्यांची. यात खण, इकत, खादी अशाप्रकारचं ग्लेजचं कापड वापरून त्यातून कानातले, गळ्यातल्याचे विविध प्रकार केले जातात. 


 

Web Title: Combo - New fashion trend of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.