सतत थकवा? झोप येतेय? उदास वाटतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 06:00 AM2019-02-28T06:00:00+5:302019-02-28T06:00:05+5:30

हे काही बरं नव्हे, जरा तब्येतीचं म्हणणं ऐका.

Constant fatigue? Sleepy? Feel sad?-why | सतत थकवा? झोप येतेय? उदास वाटतंय?

सतत थकवा? झोप येतेय? उदास वाटतंय?

googlenewsNext
ठळक मुद्देबदलत्या ऋतूचे आजार

- नितांत महाजन

ऋतूबदल होतोय. दरवर्षी या काळात आळस येतो. काहीजणांना एकदम डिप्रेस्ट वाटून रडू येऊ शकतं. झोप येते असं वाटतं, पण शांत झोप लागत नाही. ही सगळी वातावरणाची कृपा आहे असं मानलं तरी, काही गोष्टी आपणच केल्या तर हे ऋतूसंक्रमण आपण निभावून नेवू शकतो. 

1) व्हिटॅमिन डी
आपल्याकडे उदंड सूर्यप्रकाश असूनही अनेक स्त्रीपुरुषांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आढळते. स्त्रियांमध्ये तर जास्तच. त्यावर उपाय काय? खरंतर रोज सकाळी 10 मिनिटं तरी किमान कोवळा सूर्यप्रकाश आपल्याला मिळायला हवा. उन्हात जायला हवं. त्यामुळे सूर्योदयानंतर लगेच काही काळ उन्हात फिरुन या, खुर्ची टाकून बसा. त्यानं डी जीवनसत्व तर मिळेलच. फ्रेश वाटेल. हे जीवनसत्व फारच कमी असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्यानं औषध घ्या.

2) प्रो बायोटिक
फार मोठा वाटतो हा शब्द. त्या साठीची औषधंही बाजारात ढिगानं मिळतात. म्हणजे काय तर आपल्या पोटात पचनाला मदत करणार्‍या हेल्दी बॅक्टेरियांची आतडय़ांना मदत होणं. ते आतडय़ात असणं. त्यासाठीची औषधं घेण्यापेक्षा आहारात दह्याताकाचा वापर करावा. शक्यतो दही सकाळच्या जेवणात, नाश्त्यात घ्यावं. त्यानं पचनशक्ती चांगली राहते.

3) झिंक
झिंक सप्लीमेण्ट प्रतिकार शक्ती वाढवायला मदत करते. घरचा गुळाचा शिरा, साधा शिरा, पौष्टिक सुकामेवा, मनूका यातून हे मिळू शकतं. पण इन्फेक्शन सतत होत असतील तर डॉक्टरच्या सल्यानं झिंक सप्लीमेण्टची औषधं घेवू शकतात.

4) आयर्न
लोह. रक्तवाढीसाठी आवश्यक. नाचणीचं पिठ, गुळाचा शिरा, बीट, राजगीरा लाडू असं खरंतर या काळात खायला हवं. आणि शक्यतोवर लोखंडी कढईतच भाज्या करायला हव्या. त्यातून लोह पोटात जातं. आपलं हिमोग्लोबिन तपासून घ्यावं. ते फारच कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं उत्तम.

5) नाश्ता
हा सगळ्यात सोपा उपाय. गरमागरम, घरचं, पोळीभाजी, पोहेसांजा, असं खाल्लेलं उत्तम. सकाळी पोटभर नाश्ता केला तर त्यानं आपली एनर्जी लेव्हल चांगली राहते, मूडही चांगला राहतो दिवसभर.

Web Title: Constant fatigue? Sleepy? Feel sad?-why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.