प्री-इन्स्टॉल अॅप्स डिलिट करायची सोय
By admin | Published: June 17, 2016 06:18 PM2016-06-17T18:18:01+5:302016-06-17T18:37:53+5:30
आगामी ‘आयओएस १०’ची सर्वात मोठी आणि स्मार्टफोन यूजर्सला सुखावणारी बाब म्हणजे तुम्ही आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल असलेले अॅप्सदेखील डिलिट करू शकणार.
Next
>- मयूर देवकर
अॅपलच्या वार्षिक डेव्हलपर्स परिषदेमध्ये अनेक नवीन घोषणा करण्यात आल्या. त्यामुळे टेक्नो जगतात सध्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी ‘आयओएस १०’ची सर्वात मोठी आणि स्मार्टफोन यूजर्सला सुखावणारी बाब म्हणजे तुम्ही आयफोनमध्ये प्री-इन्स्टॉल असलेले अॅप्सदेखील डिलिट करू शकणार.
नवीन आॅपरेटिंग सिस्टिममध्ये असणाºया स्पेशल सॉफ्टवेयर फीचरमुळे आता तुम्हाला नको असणारे पण फोनसोबत येणारे अॅप्स डिलिट करू शकता. म्हणजे आयफोनचे बिल्ट-इन अॅप्स - मॅप्स, कॅलक्युलेटर, म्युझिक आणि व्हिडिओ - अनइन्स्टॉल करणे शक्य होणार. विशेष म्हणजे ‘अॅप स्टोअर’वरून ते पुन्हा डाऊनलोडदेखील करता येणार.
आपल्यापैकी बºयाच जणांना वाटले असेल की, फोनमधील असे किती तरी प्री-इन्स्टॉॅल अॅप्स असतात जे आपण कधीच वापरत नाही. पण ते डिलिट किंवा अनइन्स्टॉलही करता येत नाही. लोकांची ही अडचण समजून अॅपलने यामध्ये बदलाव करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण यामुळे काही सर्वच बिल्ट-इन अॅप्स डिलिट होणार नाहीत. मेसेज, फोटोज आणि कॅमेºयाला यामधून वगळण्यात आले आहे. स्मार्टफोनसाठी अत्यावश्यक म्हणून ते अनइन्स्टॉल करता येणार नाहीत.