औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या  विदेशी  विद्यार्थ्यांची  लॉकडाउन गोष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2020 09:37 AM2020-05-07T09:37:44+5:302020-05-07T09:41:26+5:30

इराण, इराक, येमेन , सिरीया या देशांतले अनेक विद्यार्थी औरंगाबादमध्ये शिकतात, कोरोना कोंडीत परक्या देशात या मुलांना काय अनुभव आलेत?

corona virus : lockdown : iran-iraq-yemen-syria students in Aurangabad, living in time of corona. | औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या  विदेशी  विद्यार्थ्यांची  लॉकडाउन गोष्ट 

औरंगाबादमध्ये शिकणाऱ्या  विदेशी  विद्यार्थ्यांची  लॉकडाउन गोष्ट 

Next
ठळक मुद्दे विदेशातले लॉकडाउनचे दिवस

- राम शिनगारे

औरंगाबादही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे.
या शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात फक्त मराठवाडय़ातूनच नाहीतर विदर्भातून, सा:या महाराष्ट्रातून, देशातून विद्यार्थी शिकायला येतात.
विदेशी विद्यार्थीही या विद्यापीठात शिकतात. सध्या 5क्क् पेक्षा अधिक परदेशी विद्यार्थी इथं शिकत आहेत. सध्या परीक्षांचे दिवस; पण लॉकडाउनमुळे परीक्षा नाहीत. स्थानिक विद्यार्थी तर आपल्या गावी परतले; पण या परदेशी विद्याथ्र्याचं काय?
तसं पाहता सुदैवाने या विद्याथ्र्याना लॉकडाउनच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला नाही. स्थानिक नागरिक, प्रशासनाचं सहकार्य मिळाल्यामुळे त्यांना हव्या त्या वस्तू मिळाल्या. 
आता ते सुरक्षित आपापल्या घरांमध्ये आहेत.
मात्र त्यांच्याशी गप्पा मारल्या, जागतिक महामारीच्या काळात आपल्या घरापासून दूर परक्या देशात राहताना काय असेल त्यांची मनोवस्था?
बोलता बोलता ही मुलं सांगतात की, आता कोरोनापेक्षाही अधिक चिंता शिक्षणाची वाटते. दोन महिन्यांपासून विद्यापीठ बंद आहे. परीक्षा केव्हा होणार याविषयी काही स्पष्ट नाही. शैक्षणिक नुकसान होईल की काय याचीच काळजी त्यांना लागून राहिली आहे.
सध्या 152 विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध विभागांमध्ये पदव्युत्तर पदवी, एम.फिल., पीएच.डी.चं शिक्षण घेत आहेत. या विद्याथ्र्याना त्यांच्या देशांनी शिष्यवृत्त्या मंजूर केलेल्या आहेत. शहरातील अन्य महाविद्यालयांध्ये 4क्क् र्पयत परदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात. 
यातील बहुतांश विद्यार्थी हे इराण, इराक, येमन, सिरीया या देशांतले आहे. त्यांचे अशांत देश, तिथली गृहयुद्ध, रोज फुटणारे बॉम्ब या मुलांना नवे नाहीत. त्यातून मार्ग काढत त्यांनी देशाबाहेर पाऊल ठेवलं ते शिक्षणासाठी.
दूर औरंगाबादमध्ये ते पोहोचले, आणि आता कोरोनानं सा:या जगाला वेठीस धरलेलं असताना आपल्या शिक्षणाचं काय या काळजीनं त्यांना घेरलं आहे. 
एकीकडे त्यांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासन लक्ष ठेवून आहे. 
विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. मुस्तजिब खान या विद्याथ्र्याच्या नियमित संपर्कात असतात. काही अडचण आलीच तर ती सोडविण्यासाठी तत्परतेनं मदत केली जाते.
याविषयी डॉ. खान सांगतात, अनेक विद्याथ्र्याना मेसेज करतो. मेल केल्या जातात. मोबाइलवर संपर्क आहेच. मात्र ही मुलंही तशी समंजस आहेत, ते निभावून नेतात. सहसा अडचणी सांगत नाहीत. मध्यंतरी एका विद्यार्थिनीने मागणी केली होती की, माझी बहीण हैदराबादमध्ये शिक्षण घेत आहे. तिच्याकडे मला जाण्याची इच्छा आहे. त्यासाठी मदत करावी, मात्र हैदराबादला जाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्यामुळे तिला पाठवता आलं नाही. तो नाइलाज होता, मात्र औरंगाबादेत आम्ही या मुलांना कुठलीही अडचण येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो. काही विद्याथ्र्यानी या लॉकडाउनमुळे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली, तर काहींना आपल्या शिष्यवृत्तीची मुदत संपेर्पयत अभ्यासक्रम पूर्ण करायला हवा याची चिंता आहे. त्यांना विद्यापीठ प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य आम्ही नक्कीच करू!’


औरंगाबादेतील बहुतांश परदेशी विद्यार्थी हे खोली, फ्लॅट भाडय़ाने घेऊन राहतात. अनेकजण स्वयंपाक स्वत: करतात. त्यामुळे त्यांना मेस बंद असल्याचा त्रस झाला नाही. त्यांच्या नेहमीच्या सवयीचं/ पद्धतीचं शिजवून निदान जेवता आलं. काही विद्यार्थी विवाहित असल्यामुळे पत्नी, मुलांसह वास्तव्याला आहेत. लॉकडाउनमुळे किराणासह इतर वस्तूंची दुकानं काही वेळेपूर्वीच उघडली जातात. त्यामध्ये खरेदीसाठी हे विद्यार्थी बाहेर पडत नाही. यासाठी त्यांना घरमालक, किराणा दुकानदार घरपोच सेवा देऊन सहकार्य करतात. 
विद्यापीठातील इंग्रजी विभागात पीएच.डी.चे संशोधन करत असलेले येमनचे मन्झूर सांगतात, ‘मी कुटुंबासह औरंगाबादेत वास्तव्याला आहे. माझं संशोधनाचं कार्य पूर्ण झालं असून, मौखिक परीक्षा घेण्याची प्रतीक्षा आहे. ही परीक्षा झाल्यानंतर माङया देशात परत जाऊ शकतो. लॉकडाउनमुळे त्याला विलंब होऊ नये, एवढीच आशा आहे. आम्ही येमेनचे 3क्क् पेक्षा अधिक विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आहोत. कोणाला काही अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्नही करतो. त्यामुळे कोणाला परक्या देशात आहोत, आपल्याला कोणी मदत करणार नाही, असं वाटत नाही. जिवाला घोर आहे तो वेळेत शिक्षण पूर्ण होण्याचा कारण आम्हाला नियोजित वेळेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेली आहे. त्या वेळेतच शिक्षण पूर्ण करणं बंधनकारक आहे. लॉकडाउनमुळे परीक्षा, पीएच.डी.च्या मौखिक परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. किमान आम्हा परदेशी विद्याथ्र्याच्या ऑनलाइन परीक्षा तरी घेतल्या पाहिजेत, एवढी आमची अपेक्षा आहे. विद्यापीठ प्रशासनाला आम्ही तशी विनंती केली आहे. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, या आठवडय़ात त्यावर काही तरी तोडगा निघेल, अशी आशा आहे.’
विद्यापीठातील पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत असलेला इम्रान अबुबकर हा विद्यार्थी सांगतो, ‘माझं शेवटचं सेमिस्टर आहे. ते केव्हा पूर्ण होईल हे आता सांगता येत नाही. पण बाकी इथं औरंगाबादमध्ये आम्हाला काही त्रस झाला नाही. आम्ही परदेशी आहोत, असं वाटलं नाही. फळं, इतर वस्तू स्थानिक प्रशासनाने पुरवल्या. अडचणी अशा त्यानं आल्या नाहीत. विद्यापीठानेही वाढीव व्हिजासाठी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. आता तर आम्ही इतके इथले झालो आहोत की, आम्ही भारतीयच असल्याचा फिल येतो. आम्हीही लॉकडाउनचे नियम कसोशीने पाळले. ज्या सूचना मिळतात, त्याचं पालन केलं. मी येमेन विद्यार्थी संघटनेचा पदाधिकारी आहे. आम्ही सगळ्यांनीही जबाबदारीनंच वागायचं ठरवलं, तसं वागलो.’
परदेशातील विद्याथ्र्याचे पीएच.डी.चे मार्गदर्शक तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुधीर गव्हाणो सांगतात, मागील काही दिवसांपासून परदेशी विद्यार्थी संपर्कात आहेत. सोशल मीडिया, मेसेजद्वारे संदेशांची देवाणघेवाण होत आहे. सर्व विद्यार्थी स्वत:च्या खोल्यांमध्ये लॉकडाउन आहेत. त्यांच्यात अंतर्गत संवाद उत्तम आहे.’


(राम लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/ वार्ताहर आहे.)
 

Web Title: corona virus : lockdown : iran-iraq-yemen-syria students in Aurangabad, living in time of corona.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.