रक्तदान करके देखो, अच्छा लगता है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 03:13 PM2020-06-11T15:13:21+5:302020-06-11T15:16:23+5:30

लॉकडाऊन, संचारबंदी यामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, शिबिरांना परवानगी नाही त्यामुळे रक्तदान झालं नाही. आता रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. मुख्यमंत्र्यांनीही आवाहन केलं की, रक्तदान करा. कोरोनाच्या संकटकाळात तरुण मुलांनी जबाबदारीने करावी अशी ही गोष्ट आहे.

coronavirus crisis, Donate blood, feels good | रक्तदान करके देखो, अच्छा लगता है!

रक्तदान करके देखो, अच्छा लगता है!

Next
ठळक मुद्देआपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.

- राहुल गायकवाड

कधी कोणी असा विचारसुद्धा केला नसेल की कोरोनासारखा एक छोटासा विषाणू संपूर्ण जगाला वेठीस धरेल. 
गेल्या तीन महिन्यांपासून भारत या विषाणूचा सामना करतोय. पुढील अनेक काळ आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, असं जगभरातील तज्ज्ञ सांगताहेत. 
कोरोनाचा फटका सर्वच विभागांना बसला, तसा तो वैद्यकीय क्षेत्नालादेखील बसला. कोरोनाबाधित रुग्णांच्या सातत्याने वाढत जाणा:या संख्येमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर ताण आला. त्यातच हाल झाले ते इतर आजारांनी ग्रस्त असणा:या रुग्णांचे. संपूर्ण वैद्यकीय यंत्नणा सध्या कोरोनाला हरविण्यासाठी काम करत असल्याने इतर व्याधींनी ग्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे कोणालाच घराबाहेर पडता न आल्याने रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे.
त्यामुळे आता रुग्णांवर उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एरव्ही पूर असो की कुठलीही नैसर्गिक आपत्ती तरुण मुलं जिवावर उदार होऊन काम करतात. गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात अनेक तरुणांनी केलेलं मदतकार्य आपण पा¨हलं आहेच.
मात्र ही कोरोनाची आपत्ती अशी वेगळीच की या काळात कुठं कशी मदत पोहोचवणार, घराबाहेर पडता येत नाही, शारीरिक अंतराचे नियम आहेतच, त्यातही अनेक तरुणांनी गरजूंना अन्नाची पाकिटं देणं अशी कामं केली.
मात्र आता अजून एक महत्त्वाचं काम आहे जे तरुण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात, ते म्हणजे रक्तदान.
कोरोनाच्या काळात अतिमहत्त्वाच्या शस्रक्रियांच्या व्यतिरिक्त इतर शस्रक्रि या बंद ठेवल्याने रक्ताची मागणी इतर वेळच्या तुलनेत कमी होती. मात्र असं असलं तरी ज्या 
रुग्णांना डायलिसिस करावं लागतं तसंच ज्या कोरोनाबाधित रुग्णांना रक्ताची गरज होती अशा रु ग्णांना रक्त उपलब्ध होणं अवघड जात आहे. 
लॉकडाऊनपूर्वी विविध संस्था, महाविद्यालये यांच्यामार्फत रक्तदान शिबिरे आयोजित केली जात होती. परंतु लॉकडाऊनच्या काळात अशी शिबिरे आयोजित करता आली नाहीत. 
त्यातच एकदा घेतलेले रक्त योग्य वेळेत वापरले नाही तर ते खराब होते, त्यामुळे रक्तदानाची प्रोसेस सातत्यानं सुरू असणंही आवश्यक असतं.
पुण्यासारख्या शहरात दिवसाला आठशे ते हजार पिशव्या रक्त लागते. लॉकडाऊनच्या काळात मात्न हा पुरवठा होऊ शकला नाही.  
अलीकडेच मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे यांनी रक्तदानासाठी पुढं येण्याचं आवाहन केलं. परंतु फिजिकल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्यानं तसंच घराबाहेर कोरोनाची भीती असल्याने अनेक तरुण समोर आले नाहीत. त्यातच जाहीर कार्यक्रम घेण्यास बंदी असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणंही सामाजिक संस्थांना, रक्तपेढय़ांना शक्य झाले नाही. 
रक्तदान करायला येणा:या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे तपासणंही शक्य नसल्याने अनेकांनी ही रिस्क घेतली नाही. 
लॉकडाऊन काळात संचारबंदी असल्याने अनेक रक्तदात्यांना इच्छा असतानादेखील रक्तदान करण्यासाठी जाता आलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. लॉकडाऊन संपलं तरी कोरोनाची भीती राहाणार आहेच. त्यामुळे पुढेसुद्धा किती तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येतील, हा प्रश्न आहेच. मात्र आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार करून रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. कोरोनाला न घाबरता, रक्तदान करके देखो अच्छा लगता है !

‘रक्ताचे नाते’ या रक्तसंकलनासाठी काम करणा:या संस्थेचे प्रमुख राम बांगड सांगतात, लॉकडाऊनमुळे रक्तदाते रक्तदान करू शकले नाहीत. त्यामुळे या काळात रक्ताचा मोठा तुटवडा जाणवला. आता लॉकडाऊन शिथिल होत असल्याने इतर व्याधींचे रु ग्णदेखील रु ग्णालयात दाखल होत आहेत. त्यातील अनेकांना रक्ताची गरज आहे. कोरोनाच्या भीतीमुळे अजूनसुद्धा अनेक लोक हे रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाहीत. आम्ही या काळात अनेक शिबिरे घेतली. रक्तदान करताना संपूर्ण खबरदारी घेतली जात असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.’
कोरोनाला घाबरून रक्तदान टाळू नये, असा त्यांचा सल्ला आहे.  

******
या संकटकाळात रक्तदान करून आपण आपली सामाजिक जबाबदारीही पार पाडू शकतोच. असाच विचार काही तरुणही करतात. अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात ई-पास काढूनही रक्तदान केलं. काहींनी आपल्याला बाकी काहीच करता येत नाही तर निदान रक्तदान तरी करूम्हणत आपला खारीचा वाटा उचलला.
संध्या सोनवणो ही तरु णी सांगते, ‘कोरोनामुळे रक्तदान पुरेशा प्रमाणात झालेलं नाही. त्यातच रक्ताची सातत्यानं गरज असल्याने सध्या रक्ताचा तुटवडा आहे. त्यामुळे आपल्या परीने आपण काही प्रयत्न करायला हवेत या हेतूने मी रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळत असेल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.


(राहुल लोकमत डॉट कॉममध्ये वार्ताहर आहे.)


 

Web Title: coronavirus crisis, Donate blood, feels good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.