जीव की प्राण असलेला मोबाइल कोरोनाकाळात व्हिलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 04:02 PM2020-07-16T16:02:15+5:302020-07-16T16:08:11+5:30

तो, ती आणि व्हिलन

coronavirus - mobile is new villain in the lovestory. | जीव की प्राण असलेला मोबाइल कोरोनाकाळात व्हिलन!

जीव की प्राण असलेला मोबाइल कोरोनाकाळात व्हिलन!

Next
ठळक मुद्देत्याच्या-तिच्या नात्यात व्हिलन ठरू शकतो का?

-नितांत महाजन
‘चलो इकबार फिर से अजनबी बन जाए हम दोनो.’ 
असं या काळात अनेकांना वाटलं असेल का? तसा डेटा तर काही उपलब्ध नाही. आकडेवारी हाताशी नाही.
मात्र तरुण मित्र-मैत्रिणींशी, जे कोरोनापूर्व काळात प्रेमात पडलेत त्यांच्याशी बोलताना अनेकदा जाणवतं की ते कनेक्टेड तर आहेत, म्हटलं तर सोबत आहेत, म्हटलं तर त्यांचा मोबाइल हा त्यांच्यातला लाइव्ह दुवा आहे.
आणि म्हटलं तर तोच मोठा व्हिलन आहे. असं अनेकांना वाटतं की, हल्ली बोलताना सतत भांडणंच होत आहेत. आपण काय बोलतोय, भलता काय बोलतोय. आपला मूड काय, तिचा मूड काय?
आपल्याला कुणाच्या घरात पावसाचं पाणी शिरलं हे पाहून उदास वाटतं, तिला पागोळ्या पाहून रोमॅँटिक. आणि वाटणं चूक नाही; पण ते सारं वाटत असताना आपण ज्याच्या/जिच्या प्रेमात आहोत त्याला/तिलाही तसंच वाटलं पाहिजे हा हट्ट.
आणि तो त्या मोबाइलवर सुरू होतं.
आणि मग शेवटी एक भरतवाक्य येतंच, की तुला काही माङया भावनांची कदरच नाही.
मुळात कदर करणार कशी, काही किलोमीटर लांब, काळवेळमूडमौसम सगळंच वेगळं असताना चला, व्हा रोमॅँटिक असं कसं होईल, त्यापेक्षा हा मोबाइलच नसता तर बरं, असंही काही दोस्तांना वाटतं.
मग ते सतत लास्ट सीन, ते स्टेटस, ते टोमणो, ते इमोशलन ब्लॅकमेलिंग असं काहीच झालं नसतं.
कोरोनाकाळातल्या या लव्हस्टोरीत एकदम व्हिलनची एंट्री का व्हावी? आणि तोही बिचारा मोबाइल? 
पण मोबाइल व्हिलन कसा? त्यानंच तर ते प्रेम फुलवलं, जगवलं, वाढवलं, मग त्याला का दोष द्यायचा?
पण तरी काही मित्र-मैत्रिणींच्या लव्हस्टो:या, त्यातली भांडणं, त्यांना होत असलेला मनस्ताप, गळ्यात साखळी बांधल्यासारखा बांधलेला कनेक्टिव्हिटीचा पट्टा.
यात काही गोष्टी दिसतात. तो गुंता कसा सोडवायचा, हा अर्थात ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, नाहीतर गुंता होऊ न देणंच उत्तम.


1) आपण बोलावंसं वाटतं म्हणून एकमेकांशी बोलतो की ‘सवय’ लागली आहे म्हणून विनाकारण बोलतं ते चेक करा.  मोबाइल अॅडिक्शन, आपण एकटे नाही, कुणीतरी सोबत आहे, ‘आपलं’ आहे असं समूजन बोल ना, बोल ना करत अनेकजण बोलतात. भांडणं झाली तरी बोलतात. मग सॉरी म्हणायला बोलतात. मग त्यावरून भांडतात; पण बोलतात. अति बोलणं हा प्रॉब्लेम आहे का, हे तपासायला हवं.
2) हल्ली तर काहीजण फोनवर बोलतच नाहीत. सतत व्हॉट्सअॅप किंवा व्हिडिओ कॉल घरच्यांना लपवून. मात्र ते करतानाही बोलण्यासारखं काहीच हाताशी नसेल, त्यातून गैरसमजच अधिक वाढत जातात.  त्यात परस्परांविषयी असलेली ओढ कमी होते.
3) इतर मित्र-मैत्रिणींशी का एवढं तासन्तास बोलते, अमुक ग्रुपवर का जास्त बोलते, तमुक मिम मुद्दाम शेअर केली यावरूनही आताशा वाद होताना दिसतात.
4) पझेसिव्हनेस  हा अजून एक मुद्दा. दुस:यानं श्वासही घेतला तर आपल्याला सांगावं असं काहींना वाटतं. त्यामुळे एकाला न सांगता दुस:यानं काही ऑनलाइन करणंही काही नात्यांमध्ये गुन्हा आहे.
5) आता तर जो तो घरात. त्यात मोबाइलवर काहीबाही शेअर होतं. काही नात्यांमध्ये जरा हॉट फोटो, क्लिप्सचीही मागणी होते. कितीही प्रेम असलं तरी हे करणं टाळायलाच हवं. न्यूड ऑनलाइन काहीही शेअर करणं धोक्याचंच आहे.

 

Web Title: coronavirus - mobile is new villain in the lovestory.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.