..सुखाचं माप

By admin | Published: October 27, 2016 04:10 PM2016-10-27T16:10:45+5:302016-10-27T16:10:45+5:30

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभर काय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!

..country | ..सुखाचं माप

..सुखाचं माप

Next

आशीर्वाद मोजू म्हणता, पण कसे मोजू? त्याचं माप काय? चिमूटभर, ओंजळभर, मनभर
काय मापानं मोजले तर आशीर्वादाचं भरभरून मिळणारं  दान ओसंडून वाहतंय हे आपलं आपल्यालाच कळेल!!
कळेल, कळतं!
त्यासाठी खरंतर कुठलं तागडं नकोय.
आपलं मनच पुरेसं आहे, आपलं सुख तोलायला!
रोज केल्या ना काही गोष्टी, तर सुखाची गिनती सोपी होते,
आणि दु:खाची टोचणी तर उरतही नाही काळजात..
त्यासाठीचा हा एक छोटुकला फॉर्म्युला
* सकाळी जाग येताच क्षणभर डोळे मिटा..
आणि आपल्याकडे चांगलं चांगलं काय काय आहे, ते आठवा..
आठवत नाही फार काही तर निदान रात्रभर आपल्याला अंग टाकायला निवारा होता, याचे तर आभार माना..
पहा, एकेक करत किती सुखं दिसतील समोर उभी..
* कुणीतरी असेलच ना जिवाभावाचं, आदल्या दिवशी तुमच्यासाठी मायेनं काही करणारं, तुम्हाला आवडणारं, त्याला एक फोन करा.. सहज.. एक मेसेज.. सहज..
मनातली माया त्या व्यक्तीपर्यंत पोहचली की इकडे दुप्पट होते ती..
* देवाला मनापासून हात जोडा. म्हणा की, हे जे आयुष्य दिलंय ते सुंदर करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन मी! आणि देवच मानत नसाल तरी मनातल्या मनात असालच ना कशाविषयी तरी कृतज्ञ..
* वाईट नेहमीच आठवता, पण चांगलं काही आठवायची, पुन्हा पुन्हा आठवायची सवय लावावी लागते मनाला..
* जे जे चांगलं, सुंदर, आवडतं ते ते मनाशी घट्ट धरा.. आणि मग लागा कामाला, त्या दिवसात सारं चांगलं घडेल.. सुंदरही!!

Web Title: ..country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.