मुंबईच्या रस्त्यांवर चालणारा जीवघेण्या साहसांचा वेडा कल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:40 PM2018-12-06T13:40:08+5:302018-12-06T13:40:53+5:30
अचाट आणि क्रूर थ्रिलच्या भयंकर जगातली भयंकर स्टण्टबाजी कशी चालते?
- मनीषा म्हात्रे
ब्रिटिश पार्कर्स उंच इमारतींवरून इकडून तिकडे उडय़ा मारण्याचे स्टण्ट करतात, ते मुंबईला नवीन असलं, तरी रात्री-बेरात्री चालणारी तरुण मुलांची स्टण्टबाजी मुंबईला नवी नाही. त्यातही कार आणि बाइक रेसिंग तर अत्यंत आम बात आहे. त्यातही रात्री रंगणार्या बाइक रेसिंग तर भयंकर आवाज करत पळतात. सुसाइड स्टण्ट, बर्न आउट, टू ओ सर्कल, स्टॅण्डिंग व्हॅली यांसारख्या अनेक नावांनी तरुण जगात हे स्टण्ट आजही रंगतात.
गेल्यावर्षी पुण्यात सुपरक्र ॉस स्पर्धेतही असाच एक प्रकार घडला होता. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशातील आणि परदेशातील स्पर्धकांनी त्यात भाग घेतला होता. दुचाकींच्या वेगाचा थरार यावेळी प्रेक्षकांना अनुभवता आलाच. पण, त्याचबरोबर स्पर्धकांनी दुचाकीवरून धाडसी स्टण्टदेखील करून दाखवले. त्यानंतरही अशीच भयंकर धास्तावणारी चर्चा बराच काळ रंगली.
वाहनाला खेळणं समजून स्टण्टबाजी करण्याची मानसिकता तर तारुण्यात अत्यंत आम बात आहे. तशी मानसिकताच आहे असं दिसतं. मात्र त्यामुळं जीव गमवण्याची वेळ येऊ शकते, काही सेकंदाचं थ्रिल आयुष्यभर किंमत मोजायला लावतं, हे लक्षातच येत नाही.
आता वर्षाखेर जवळ येत आहे. थर्टि-फस्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईतील हॉटेल्स, पब, रेस्टॉरण्ट, समुद्रकिनारे, चौपाटय़ांवर गर्दी होणार हे उघड आहे. मात्र त्याचवेळी ही स्टण्टबाजीही होणार असं दिसतं. मुंबईच्या रस्त्यांवर मोटारसायकल रेसिंगच्या थरारक स्पर्धा लावण्याची तयारीदेखील सुरू आहे. दरवर्षी अनेक शहरांत हे बाइक स्टण्ट होतात.
सुपर बाइक रेसिंग, अॅक्टिव्हा रेसिंग, कपल्स बाइक रेसिंग, अशा प्रकारात रेसिंग आणि स्टण्टबाजी करण्यात येतात. यासाठी गाडय़ा बनविण्याची तयारी गॅरेजमध्ये सुरू आहे. फॉरेन्स रेसिंग बाइकचे पार्ट तसेच पल्सर 220, डीओ, केटीएम, यामहा, अॅक्टिव्हा या बाइक्समध्ये पोर्ट करत रेसिंग बाइक तयार केल्या जातात. यात 5 हजारच्या काबरर्ेेरेटरऐवजी 20 हजारांचा काबरेरेटर बसविण्यात येतो. जेणेकरून ती वेग पकडेल. शिवाय त्यामुळे 1 लीटर पेट्रोलमध्ये ही बाइक 5 ते 6 किमी धावते. सायलेन्सरचा मफलरही काढण्यात येतो. जेणेकरून त्याचा आवाज वाढतो, अशी माहिती रेसिंग बाइक बनविण्यात स्पेशालिस्ट असलेले मेकॅनिक कन्नन नायडू यानं दिली. ‘आम्ही ज्या ठिकाणी अधिकृत रेसिंग होतात, त्याच ठिकाणी रेसिंगच्या बाइक बनवण्यासाठी जातो. मात्न सध्याच्या घडीला रायडर बाइक मेकॅनिकचं प्रमाणपत्न नसतानाही अनेक मेकॅनिक मंडळी मोठय़ा प्रमाणात अशा बाइक्स बनवून देत आहेत.’ असं कन्नन सांगतात.
मुंबईतल्या ग्रॅण्ट रोडसह बंगळुरू, चेन्नई, चायना, इंडोनेशिया येथून या बाइक्ससाठी विविध पार्ट मागविण्यात येतात. एका बाइकसाठी 30 हजारांहून 10 लाखांर्पयत पैसे मोजण्यात येतात. आता इअर एण्ड सेलिब्रेशनसाठी तर यासार्यानं जास्तच जोर धरलेला आहे.
यात नुस्ती हौस नाही तर मुंबईसह विविध ठिकाणच्या रस्त्यांवर मध्यरात्नीनंतर होणार्या बाइक रेसिंगसाठी कोटय़वधी रुपयांचा सट्टाही लावण्यात येत आहे. सर्रास बेटिंग होतं.
धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या मुलांचीही या रेसिंगमध्ये एक वेगळी टीम आहे. मुंबईच्या वरळी सी लिंक, विक्र ोळी पूर्व द्रुतगती मार्ग, पेडर रोड, वांद्रे रिक्लेमेशन सेंटर ही ठिकाणं सध्या रेसिंग पॉइंट झाली आहेत. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई तसेच अन्य शहरांतून आलेली तरुणाई हाजीअली अथवा नरिमन पॉइण्ट येथे एकत्न येतात. गुरुवारी, शनिवारी आणि रविवारी रात्नी साडेबारा ते पहाटेपर्यंत त्यांचा खेळ सुरू असतो. 1 किमीपासून ते 7 किमीर्पयतच्या अंतरात रेसिंग होते. नाकाबंदी, पोलीस बंदोबस्त याची माहिती ते आधीच घेऊन असतात आणि सुरू होतो, तो रेसिंगचा जीवघेणा थरार.
खरं तर यात सहभागी होणार्या अनेक बाइकर्सना हेही माहिती नसतं की, आपल्या जोरावर बेटिंग सुरू आहे. राजकीय नेते, अभिनेते आणि काही बडय़ा मोबाइल कंपन्यांचे मालक हौसेपोटी या रेसिंगवर बेटिंग लावत असल्याची माहिती काही रायडर्स नाव न छापण्याच्या अटीवर देतात.
हजार रुपयांपासून कोटय़वधींमध्ये याचा खेळ रंगतो आहे. एका रेसिंगमागे 20 ते 22 लाख रुपये लावले जातात. तरुण मुलांच्या थ्रिलचा हा असा सध्या खेळ झालेला आहे आणि त्यावर अनेकजण पैसेही कमवत आहेत. मात्र थ्रिलपायी डोकं वापरणं बंद केलं तर तरुणांचा हा असा वापर होणं अटळ आहे.
***
‘ऑक्सिजन’च्या वाचकांसाठी
आपल्याकडे अजून फारशा चर्चेत नसलेल्या या अचाट साहसी प्रकारांची माहिती देतो आहोत, ते तुमच्या हाती नवं कोलीत द्यावं म्हणून नव्हे!
ज्याविषयी उघडपणे बोललं जात नाही, असे अनेक विषय तुमच्या हातातल्या चौकोनी स्क्रीनमधून तसेही तुमच्यार्पयत पोहचत असतातच. तिथे ‘दिसतं’ ते थ्रिल ! आम्ही सांगतो आहोत, ते त्यात दडलेले धोके ! तेव्हा, जपून राहा!!!
***
बाइक
स्टण्टचे प्रकार
360 डिग्री - या प्रकारात रायडर रेसिंग बाइक हवेत तीन वेळा फिरवतो. या सर्व प्रकरांमध्ये ही रेसिंग सर्वात जीवघेणी ठरते.
फ्रण्ट व्हीली स्टण्ट - बाइकच्या पुढच्या चाकावर गाडी चालवून स्टण्ट मारणं, जवळपास 2 ते 3 किमी अंतर हे पुढच्या चाकावर कापलं जातं.
स्टॉपी व्हीली स्टण्ट - बाइकच्या मागच्या चाकावर गाडी चालवून स्टण्ट करणं.
90 डिग्री - बाइक 90 डिग्रीला सरकवत जमिनीला घर्षण करत चालविली जाते. या दरम्यान निघणारा स्पार्कसाठी हे रायडर्स वेडे असतात. मात्न, यातूनच अनेकदा बाइक एकमेकांवर घसरते. अपघात होतो.
180 डिग्री - या स्टेजला बाइकवर बसलेल्या रायडर्सची सीटची बाजू पूर्णपणे जमिनीकडे झोकवून दिली जाते.
...
प्रसिद्धीसाठी कायपण!
पूर्वी स्वतर्ला सिद्ध करण्यासाठी साहसी खेळ खेळले जायचे. सद्यस्थितीत सोशल मीडियाच्या वाढत्या जाळ्यात फक्त प्रसिद्धीसाठी असे प्रकार होतात. सध्याची तरुणाई सोशल मीडियालाच आपलं जग समजतेय. त्यात पुढे राहणं म्हणजे यशाचा टप्पा गाठणं असा त्यांचा समज झाला आहे. लाइक्सच्या या खेळात अचाट साहस आणि खरं साहस याचं भान सुटतं आणि मग थ्रिलपोटी वाट्टेल ते करणं सुरू होतं.
- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ
भान सुटलंय.
अॅप स्टार किंवा स्वतर्ला व्हिडीओ ब्लॉगर म्हणून घ्यायच्या फॅडने तरुण पिढीला ग्रासलं आहे. जिवावर बेतेल अशा गोष्टी करूनही लाइक्स मिळवायचे आणि काही हजार लाइक्स झाले की त्यातून काही डॉलर्स कमवायचे ही पद्धत रूढ होत चालली आहे. उंचावरून जीवघेणी उडी मारणं म्हणजे एकप्रकारे आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा आहे याचं भानही या अॅप वेडय़ा मुलांना नाही. ते आलं नाही तर पुढची वाट अजून अवघड आहे.
- अॅड. प्रशांत माळी, सायबर तज्ज्ञ
.मी आयुष्यातून उठलो !
एक क्रे झ म्हणून मित्नांसोबत बाइक रेसिंगमध्ये उतरलो. आणि त्या नशेत स्वतर्लाच हरवून बसलो. हळूहळू आमच्यात पैजा लागायला लागल्या. वेगवेगळे स्टण्टही केले. मात्न याच स्टण्टमुळे मृत्यूच्या दारात कधी पोहचलो हे माझं मलाच कळलं नाही. अपघात झाला. मला वाचवण्यासाठी बाबाने घर विकलं. आई लंकेची पार्वती झाली. एवढं करूनही वाचलो खरा. मात्न कायमचा त्यांच्यासाठी एक ओझं होऊन बसलो. त्या रात्नीच्या अंधारात तोल गेला आणि मीही त्या चाकांमध्ये फसलो. आणि कायमचा अपंग झालो. बाकीच्यांनी तरी असं करू नये.
- राजेश (दोन वर्षापूर्वी स्टण्टबाजीच्या नादात त्यानं आपले दोन्ही पाय गमावले आहेत.)
.........
मुलाला गमावलं.
डोंगरीतील बडे उद्योजक. लहानपणापासून मुलाला काही कमी पडू दिलं नाही. सर्व हट्ट पुरवले. मुलाला बाइक घेऊन दिली. मात्न मुलाला रेसिंगचा नाद. मुलाला असा नाद आहे हे कळण्यापूर्वीच त्याचा मृतदेह दारात आला. आता ते आईवडील कायमचे मुंबई सोडून गावी निघून गेले.
.....
मुझे जीना है इसलिये सब छोड दिया..
सुरुवातीला थ्रिल म्हणून रेसिंगमध्ये उतरलो.
और करना है म्हणत सोशल मीडियावर धडकलो. अन्य व्हिडीओंपेक्षा लाइक्स माझ्या व्हिडीओला मिळायला हवेत म्हणून प्रय} सुरू केले. 90 डिग्री, 180 डिग्रीचे स्टण्ट करू लागलो. पाहता पाहता स्टण्ट आणि सोशल मीडियावर त्याचा रेकॉर्ड एवढं ध्येय बनलं. याच नशेत अपघात झाला. 5 वर्षानं मृत्यूच्या दारातून परत आलो. आणि कानाला खडाच लावला. मुझे जीना है.. इसलिये सब छोड दिया.
- रोहन (सध्या मेकॅनिकचं काम करतोय.)
(लेखिका लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हे वार्ताहर आहे.)