क्रोशा दागिने...सध्याचा अत्यंत लोकप्रिय मामला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 01:30 AM2017-11-30T01:30:00+5:302017-11-30T01:30:00+5:30
लोकरीचे सुंदर कानातले मुली घालतील आणि क्रोशा ज्वेलरी नावाचा उद्योगच सुरू होईल असं वाटलं तरी होतं का आपल्याला?
क्रोशा ज्वेलरी.
सध्याचा अत्यंत लोकप्रिय मामला. असंख्य रंगांच्या लोकरीच्या धाग्यात
क्रोशा सुईवर विणून तयार केलेल्या या ज्वेलरीचा ट्रेण्ड भारतातच नाही तर जगभरात हिट झालाय. आता तर हिवाळा सुरू झालाय. त्यामुळे विंटर ज्वेलरी म्हणूनही तो जाम फेमस होतोय. मध्यंतरी धागा, लोकर यापासून तयार केलेल्या गोंडा ज्वेलरीचा टेÑण्ड होता.. आता त्याची जागा या क्रोशा ज्वेलरीने घेतलीय.कण्टेम्पररी, मॉडर्न, स्टेटमेण्ट ज्वेलरी ही या लोकरीच्या दागिन्यांची सध्याची ओळख. इको-फ्रेण्डली ज्वेलरी हा अजून एक किताब.
या भन्नाट ट्रेण्डची ही एक झलक.
वजनाला हलके
क्रोशा ज्वेलरी लोकप्रिय होण्याचे प्रमुख कारण म्हणजे ही ज्वेलरी वजनाला हलकी-फुलकी. लोकर, धाग्यापासून विणलेल्या या दागिन्यांमुळे मॅचिंग उत्तम जमतं. वजन कमी. कान ओघळण्याची भीती नाही. त्वचेला कोणतीही अॅलर्जी होत नाही.
मामला मॅचिंग है!
क्रोशा ज्वेलरी म्हणजे काहीतरी बोल्ड लूक असणारी ज्वेलरी असे प्रथमदर्शनी समज होण्याची शक्यता असते; परंतु क्रोशा ज्वेलरीत सिल्क साडी, डिझायनर साडी, जीन्स-कुर्ती, जीन्स-टॉप, स्कर्ट-टॉप, कॉर्पोरेट अटायर या सर्व पेहरावांवर शोभून दिसतील असे असंख्य प्रकार, डिझाइन्स आज उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रसंगाला साजेशी ज्वेलरीही यात सहज उपलब्ध झाली आहे. काहीतरी हटके मिरवत असल्याचाही फील यामुळे मिळतो. फुले-पाने-फळे या डिझाइन्सचा सुरेख मेळ या ज्वेलरीत साधलेला दिसतो. अन्य ज्वेलरीप्रमाणेच क्रोशा ज्वेलरी सेट्सही मिळू लागले आहेत. हव्या त्या रंगात हा मामला खुलतो.
झुमके-चोकर-ब्रेसलेट
झुमके, चोकर नेकलेस, रेनड्रॉप नेकलेस, कफ ब्रेसलेट, डँगलर्स (इअररिंग), पायल, अंगठी असे सर्व पारंपरिक पण तरीही मॉडर्न टच लाभलेले डिझाइन्स क्र शा ज्वेलरीत मिळतात. लोकरीबरोबरच बीड्स, बटन्स यांचाही वापर केलेला आढळतो.
ऑनलाइन शॉप्स, पोर्टल्स
भारतात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, सुरत, वाराणसी या शहरांमध्ये क्रोशा ज्वेलरीचे स्वतंत्र ब्रॅण्ड्स उदयास आले आहेत. हे ब्रॅण्ड्स त्या त्या भागात स्वत:ची उत्पादने विक्री करतच आहेत शिवाय ऑनलाइनही विक्री ते करतात. जगभरात क्र ोशा ज्वेलरीचे असंख्य ऑनलाइन पोर्टल्स सुरू झाले आहेत. इतकेच नाही तर अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, इंग्लंड, फ्रान्स या देशांमध्येही भारतात तयार होत असलेली क्रोशा ज्वेलरी मोठ्या प्रमाणावर निर्यात होते.
ऑनलाइन क्लासेस
क्रोशा ज्वेलरीची वाढती लोकप्रियता पाहून अनेक क्राफ्ट क्लासेस, तसेच हॉबी क्लासेसमध्ये यासंदर्भात विशेष कोर्सेस सुरू झाले आहेत. तसेच चेन्नई, बंगळुरू यासारख्या शहरांमध्ये तर अनेकींनी क्रोशा स्टुडिओज सुरू केले आहेत. तेथे बेसिक टू अॅडव्हान्स यापद्धतीने हे ज्वेलरी प्रशिक्षण दिले जाते. इंटरनेटवर क्रोशा ज्वेलरीचे ट्युटोरियल्स सहज उपलब्ध आहेत. मोफतच. यू ट्यूबवर क्रोशा ज्वेलरी म्हणून फक्त व्हिडीओ सर्च करून पाहा.