सुंदर डोळ्यांना काळ्या वर्तुळांचा शाप?
By admin | Published: April 27, 2017 04:08 PM2017-04-27T16:08:04+5:302017-04-27T16:08:04+5:30
- हे घ्या उ:शाप
Next
- मयूर पठाडे
तुमची बॉडी आकर्षक आहे.
तुम्ही दिसायला सुंदर आहात.
तुम्ही कॉन्फिडन्ट आहात.
चारचौघांत तुम्ही उठूनही दिसता.
पण.
तुमच्या डोळ्यांखाली काळी वतरुळं आहेत.
तुम्ही तरुण असा किंवा तरुणी.
तुमच्या डोळ्यांखाली काळी वतरुळं असली तर तुमच्या पर्सनॅलिटीला ते टाचणी तर लावतंच, पण तुमचा भावही डाऊन करतं.
अर्थातच आपल्या डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळं ही आपली लाईफस्टाईल चुकीची आहे हेच सुचवत असतात. अपुरी झोप, वेळीअवेळी खाणं, हार्माेनल चेंजेंस, अनुवंशिकता. ही सारी कारणं त्यामागे असतात.
त्यासाठी काही केमिकल्सही बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग होतो, नाही असं नाही, पण बर्याचदा या केमिकल्सचा तुमच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमची स्किन वाईटाकडे अधिक वाईटाकडे जाऊ शकते.
असं होऊ द्यायचं नसेल, तर नॅचरल घरगुती उपायच त्यासाठी जास्त उपयोगी ठरू शकतात असं काही संशोधकांचं, अभ्यासकांचं म्हणणं आहे.
त्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले आहेत.
कशी घालवाल ही काळी वर्तुळं ?
1- किसलेला बटाटा-
किसलेल्या बटाट्याचा रस करा. या रसात कापसाचा बोळा बुडवा. डोळे बंद करा. कापसाचा हा बोळा साधारणपणे दहा मिनिटे काळ्या वतरुळांवर ठेवा.
2- टोमॅटो आणि लिंबू-
एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा लिंबू रस एकत्र करून हा रस डोळ्यांखालच्या काळ्या वतरुळांवर दहा मिनिटे लावून ठेवा. दहा मिनिटांनी साध्या पाण्यानं चेहरा धुवून टाका. दिवसांतून दोन किंवा तीन वेळा हाच प्रयोग करा. टोमॅटो आणि लिंबाच्या रसात पुदीन्याची पानं टाकून तो रस तुम्ही प्यायलात तरी थोड्याच दिवसांत तुमच्या डोळ्यांखालची काळी वतरुळं कमी होऊ शकतात.
3- ग्रीन टी बॅग्ज-
बाजारात मिळणार्या ग्रीन टीच्या छोट्या बॅग फ्रिजमध्ये ठेवा. गार झालेल्या या बॅँग्ज डोळ्यांवर ठेवा.
4- बदामाचं तेल-
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ असतं हे आता सगळ्यांनाच माहीत झालं आहे. बदामाचं हे तेल काळ्या वतरुळांवर लावा. हलकेच मसाज करा. रात्रभर ते तसंच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ पाण्यानं धुवून टाका.
डोळ्यांखालची काळी वतरुळं घालवण्यासाठी वर दिलेले उपाय अत्यंत महत्त्वाचे आहेत.
आणखीही बरेच उपाय आहेत.
त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..