स्क्रीनवर दर एका तासामागे २२ मिनिटांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 07:56 AM2020-11-05T07:56:48+5:302020-11-05T08:00:13+5:30
स्क्रिनवर डिजिटली घालवलेल्या दर एका तासामागे २२ मिनिटं आयुष्य कमी होऊ शकतं, असं एक अमेरिकन अभ्यास सांगतो.
-प्रतिनिधी
एक जरा गंभीर बातमी. कोरोनाकाळात ऑनलाइनच जगणाऱ्या अनेकांनी स्वत:ला वर्ल्ड स्ट्रोक ऑर्गनायझेशनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार येत्या काळात जगातील दर चार व्यक्तींपैकी एकाला पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पूर्वी हे स्ट्रोक येण्याचं प्रमाण वयाच्या साठीत जास्त होतं आता मात्र २५ ते ४५ या वयात असलेल्यांना हा धोका वाढला आहे. स्क्रिनवर डिजिटली घालवलेल्या दर एका तासामागे २२ मिनिटं आयुष्य कमी होऊ शकतं, असं एक अमेरिकन अभ्यास सांगतो. कोरोनाच्या काळात हृदय, मेंदू यांचे स्ट्रोक आणि डिजिटल वावर यांचाही अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये अभ्यास झाला.
डिटॉक्सची गरज अशी नव्या नव्या रूपात समोर येते आहे.