मित्रमैत्रिणी जानसे प्यारे. ‘कूल ग्रूप’मधे एण्ट्री

By admin | Published: January 2, 2015 03:16 PM2015-01-02T15:16:25+5:302015-01-02T16:14:47+5:30

मित्र म्हणजे जीव की प्राण. आपल्याला जगात मित्रमैत्रिणींपेक्षा जवळचं, आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही असं वाटण्याचं वय असतंच.

Dear friends Entry in 'Cool Group' | मित्रमैत्रिणी जानसे प्यारे. ‘कूल ग्रूप’मधे एण्ट्री

मित्रमैत्रिणी जानसे प्यारे. ‘कूल ग्रूप’मधे एण्ट्री

Next

मित्र म्हणजे जीव की प्राण. आपल्याला जगात मित्रमैत्रिणींपेक्षा जवळचं, आपल्याला समजून घेणारं कुणीच नाही असं वाटण्याचं वय असतंच.

मात्र या मुलांच्या जगातला नवा ट्रेण्ड वेगळाच आहे. त्यांना एखादा फाफे असतोच असतो, पण मुलीची बेस्ट फ्रेण्ड मुलगीच असेल आणि मुलाचा बेस्टी मुलगाच असेल असं आता उरलेलं नाही.
उलट मुली तर उघडपणो सांगतात की, मुलगी मैत्रीण असल्यापेक्षा मुलगा जर बेस्ट फ्रेण्ड असेल तर खूप सपोर्ट मिळतो. 
मात्र हे ‘बेस्टी’वालं प्रकरण इथवरच मर्यादित नाही, आपण कुठल्या ग्रुपमधे आहोत हे काही मुलांना जास्त महत्त्वाचं वाटतं. शाळेतल्या सगळ्यात ‘कूल ग्रुप’मधे तरी आपल्याला प्रवेश हवा किंवा आपला ग्रुप तरी सगळ्यात कूल हवा. आणि त्या ग्रुपमधे शिरता यावं म्हणून अनेक मुलं अक्षरश: जीव काढून ठेवायला तयार असतात.
काही मुली तर खोटय़ा खोटय़ा गर्लफ्रेण्ड होऊन स्मार्ट मुलामुलींच्या ग्रुपमधे शिरतात. ‘कूल’ जगाचा आणि जगण्याचा भाग होण्यासाठी अखंड आटापिटा करणा:या या मुलांच्या पालकांना हेच कळत नाही की, आपलं मुल एकदम डिमाण्डिग का झालंय.
पण त्या मुलामुलीला मात्र वेगळं जग हाका मारत असतं.
आणि या कूल ग्रुपमधे आपण नसलो तर आपण आउडेटेड आणि लेफ्टआऊट होतो असं अनेकांना वाटतं.
कसं असतं हे जग?
 कूल ग्रुपवाले करतात काय?
 
1) एकतर अॅक्सेण्टवालं इंग्रजी बोलणारी हायफाय मुलंमुली या ग्रुपमधे असतात. माध्यम इंग्रजी नसेल तर स्मार्टपण टगी, हुशार पण अभ्यास एके अभ्यास न करणारी,  चौकस मुलं म्हणजे हा कूल ग्रुप.
2) या कूल ग्रुपवाल्यांना नवीन येणा:या सगळ्या गॅजेट्सची, गाडय़ांची, गॉसिपची माहिती असते.
3) ते कपडे एकदम ट्रेण्डी  घालतात, एकदम स्टायलिश राहतात.
4) ते कायम हॉटेलात, मॉलमधे जातात, 
सिनेमे पाहतात, आणि घरच्यांची रोकटोक 
खपवून घेत नाहीत.
5) त्यांचं आपलं एकच ब्रीद असतं, ‘घरच्यांना पाहिजे त्यापेक्षा जास्त परसेण्टेज मी आणतो/
आणते ना, मग बाकी मला एन्जॉय करू द्या.
6) अशा हॅप्पीवाल्या ग्रुपमधे जाऊन आपली ‘शान’ वाढेल असं अनेकांना वाटतं, ते सारे कूल ग्रुपवाले!
 
 
पार्टी आणि सेलिब्रेशनची क्रेझ..पार्टी अभी बाकी है!
 
‘व्हॉल्यूम कम कर, पापा जग जाएगा.’
ही गाण्याची ओळ पंधराव्या वर्षाचा कोडवर्ड असू शकते का? 
मुळात पंधरा वर्षाचे मुलंमुली पाटर्य़ा करत असतील आणि ‘व्हॉल्यूम कम कर.’ म्हणत पहाटेर्पयत नाचत असतील यावर विश्वास ठेवणं तसं अवघड आहे.
पण नवमध्यमवर्गीय घरात, नवश्रीमंती वातावरणात वाढणारी अनेक मुलंमुली सर्रास ‘पाटर्य़ा’ करतात. नियमित करतात. सतत करतात.
पार्टी हा विषय आला म्हणून सहज विचारलं की, पार्टी करायला निमित्त काय असतं पण प्रत्येक वेळेस?
अनेक मुलामुलींनी अश्मयुगातला माणूस पहावा अशा नजरेनं पाहत सांगितलं की, ‘पार्टी के लिए स्पेशल ओकेजन नहीं लगता, बिना बहाने के भी पार्टी हो सकती है.!’
कुणाचा वाढदिवस असेल, परीक्षा संपली, रिझल्ट लागला ही तर पार्टीची बेसिक कारणं झाली. मात्र एखादा चार दिवस गावाला जाणार असेल तरी, नवीन फोन घेतला तरी, एखाद्या जुन्या मित्रशी भांडण झालं, गर्लफ्रेण्डला डंब केलं, गर्लफ्रेण्डने डंब केलं, भांडण असलेल्या मित्रशी किंवा मैत्रिणीशी पॅचअप झालं तरी पार्टी केलीच जाते.
प्रत्येक पार्टीला जाणं आणि बाकीच्यांना हेवा वाटेल अशी हॉटेलात जंगी पार्टी देणं हे नवश्रीमंत 15 वर्षाच्या जगातलं स्टेटस सिंबॉल आहे.
एक मैत्रीण तर अत्यंत ठामपणो म्हणाली, ‘पार्टी इज कुलेस्ट थिंग इन लाईफ, इफ यू पार्टी, यू आर देअर, इफ यू डोण्ट, यू आर आउट!’
-आपण असे ‘आउटडेटेड’ ठरू नये म्हणून ही मुलं घरच्यांशी प्रसंगी भांडूनही पाटर्य़ा करतात, त्यासाठी पैसे खर्च करतात. आणि तरीही रेस्टलेसच असतात.
अर्थात आजही ‘शाळकरी’ पाटर्य़ाचं बहुसंख्य जग पूर्वीसारखंच, टीटीएमएमवरच चालतं.
एकाच जगात ही दोन अनोळखी जगं आहेत.

Web Title: Dear friends Entry in 'Cool Group'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.