दीपिकाचा एअरपोर्ट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:33 AM2018-03-29T08:33:24+5:302018-03-29T08:33:24+5:30

प्रवासात, फिरायला जाताना हे ट्राय करता येईल का?

Deepika's Airport Look | दीपिकाचा एअरपोर्ट लूक

दीपिकाचा एअरपोर्ट लूक

Next

- श्रुती साठे
आता प्रवास म्हटलं की चांगले कपडे घालणं आलंच. पण चांगले घालण्याबरोबरच ते कम्फर्टेबलही असले पाहिजेत. मात्र फॅशनच्या नावाखाली तो ‘कम्फर्ट’ आपण जपतो का, हे पाहणं महत्त्वाचं असतं. अलीकडे एक नवीन फॅशन आपण पाहतोय. विशेषत: सेलिब्रिटींची. एअरपोर्ट लूक असं त्याचं नाव.
बहुतांशी सेलिब्रिटीज किंवा विमानप्रवासाला सरावलेले लोक एअरपोर्टसाठी स्पोर्टी आणि स्मार्ट कॅज्युअल लूकला पसंती देतात (फार गरज असल्यास फॉर्मल लूकसुद्धा निवडला जातो). नीट पाहिलं तर लक्षात येईल, एअरपोर्टसाठी फार रंगीबेरंगी, प्रिंटची गजबज असलेले कपडे शक्यतो टाळले जातात. क्लासिक आणि सरधोपट असा काळा, पांढरा, करडा, निळा रंग विमानप्रवासात वापरला जातो.
फॅशन जगतात सध्या मोनोक्र ोमची चांगलीच चलती आहे. हेच ध्यानात ठेवून दीपिका पदुकोणने अलीकडेच एक ब्लॅक स्वेट पॅण्ट आणि व्हाइट स्वेट शर्ट घातला. ही स्टाइल तिला अतिशय स्पोर्टी लूक देऊन गेली. यामध्ये तिने फॅशन आणि कम्फर्टची घातलेली सांगड उठावदार दिसते.
दुसरं उदाहरण अनुष्का शर्माचं. व्हाइट क्रॉप टॉप आणि रीप्ड जीन्सवाला हा एअरपोर्ट लूक तरुणींनी ट्राय करून पाहायला हरकत नाही.
अर्थात हे सारं ट्राय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा..

* जॅकेट किंवा श्रग, एखादा स्टोल बरोबर ठेवणं उत्तम ठरते.
* जीन्स किंवा लाउंज, स्वेट पॅण्ट वापरणार असाल पायात शूज मस्त दिसतात.
* लेदरची हॅण्डबॅग किंवा बॅकपॅक उठून दिसते.
* अगदी साधी हेअरस्टाइल करा. केसांचा बन किंवा पोनीटेल उत्तम.
* हलकासा डिओड्रण्ट तुम्हाला नक्कीच कम्फर्टेबल करेल.
* वेस्टर्न कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसाल, तर कॉटन किंवा लिननचा कुर्तासुद्धा सुरेख दिसतो.

 sa.shruti@gmail.com

Web Title: Deepika's Airport Look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.