फेसबुक अकाऊंट डिलीट करताय? पण...
By admin | Published: June 8, 2017 11:51 AM2017-06-08T11:51:54+5:302017-06-08T11:51:54+5:30
आपल्याला वाटलं केलं अकाऊंट डिलीट इतकं हे प्रकरण सोपं नाही. काळजी घ्या !
- निशांत महाजन
अनेकांना अधूनमधून झटका येतो, ते लिहितात आपल्या टाइमलाइनवर.. आय अॅम क्विटिंग. किंवा मी फेसबुकचा निरोप घेतोय, बास आता, पकलो आता. जातो आता. मग त्यांचे मित्रमैत्रिणी गयावया करतात, म्हणतात जाऊ नकोस. थांब. काय झालं? कुणी काही केलं का? आमचं काही चुकलं का? आम्ही तुला मिस करू? असं बरंच काही होतं. शे-दोनशे कमेंट येतात. परिणाम? त्यातले काहीजण चारसहा दिवस, काही चारपाच महिने जातात. काही जातही नाहीत. काही गेलेले परत येतात. हे चक्र चालूच राहतं. आणि मग काही महिन्यांनी तेच नाटक परत. आम्ही सोडून जातो, निरोप कसला घेता माझा, जातो आता, असं काहीही इमोशनली सुरुच राहतं. मात्र काहीजण तसे नसतात. ते खरंच कंटाळतात या साऱ्याला आणि फेसबुकचा कायमचा निरोप घेतात. मात्र आपलं अकाउण्ट डिलीट करताना काही गोष्टींची काळजी घ्या. नाहीतर जी माहिती आपण डिीलीट केली असं तुम्हाला वाटतं तिचाही दुरुपयोग होऊच शकतो.
१) स्टेप बाय स्टेप
तुम्ही ठरवलं की अकाऊंट डिलीट करायचं तर एकेक करून आधी तुमच्या तिथल्या काही फोटो पोस्ट डिलीट करा. जे तुम्हाला फार महत्त्वाचं वाटतं किंवा काहीच डिलीट करू नये असं वाटतं ते डाउनलोड करुन स्वत:कडे सेव्ह करा.
२) एक्सपाण्डेड आर्चिव्ह
फेसबुककडे तुम्ही जुना डेटा मागू शकतात. त्यामुळे सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ती माहिती डाउनलोड करू शकता. डिलीटही करू शकता.
३) लॉग पहा
आपल्या तमाम फेसबुक अॅक्टिव्हिटीचा एक लॉग असतो. त्या लॉगमधून महत्त्वाच्या पोस्ट कळतील, त्या डाउनलोड करुन घ्या. बाकी सारं लॉगसह डिलीट मागून घ्या.
४) वाढदिवस?
फेसबुकमुळे आपल्याला अनेकांचे वाढदिवस कळतात. मात्र ते डिलीट केले तर? त्यामुळे फेसबुककडे फ्रेण्ड्स बर्थडची माहिती मागा. ती माहिती मिळेल. महत्त्वाच्या तारखांना फोनमध्ये रिमाइंडर लावा.
५) डिअॅक्टिव्हेट की डिलीट?
खरंतर आपलं अकाऊंट डिलीटच करायची गरज नसते. कारण काय सांगावं डिलीट केल्यावर दोन महिन्यानं पुन्हा परत यावंसं वाटलं तर? त्यापेक्षा काही काळासाठी आपलं अकाऊंट डिअॅक्टिव्हेट करून ठेवा. ते फक्त तुम्हाला दिसतं, इतरांना दिसणारच नाही. परत आलोच तर पुन्हा अॅक्टिव्हेट करता येतं. त्यामुळे डिलीट करण्याची घाई करू नका. यासंदर्भात फेसबुकपेज हेल्पसेंटरमध्ये ही माहिती मिळेल.