स्मार्टफोनला रेनकोट घेतला का?

By admin | Published: June 24, 2016 06:31 PM2016-06-24T18:31:35+5:302016-06-24T18:37:09+5:30

पावसाळ्यात फोन कसा जपायचा, यासाठी काही महत्वाच्या टीप्स.

Did the smartphone take a raincoat? | स्मार्टफोनला रेनकोट घेतला का?

स्मार्टफोनला रेनकोट घेतला का?

Next
>- माधुरी पेठकर
पावसाळ्यात फोन कसा जपायचा, यासाठी काही महत्वाच्या टीप्स.
ॠतू, महिना, दिवस, वेळ. प्रसंग कोणताही असो स्मार्ट फोन शिवाय पान हालत नाही अशी परिस्थिती आहे. स्मार्ट फोन थोडासा जरी नजरेआड झाला तरी अस्वस्थ व्हायला होतं. असा जीव की प्राण झालेला स्मार्ट फोन पावसाळ्यात जरा जास्तच जपावा लागतो. एकीकडे बाहेर पडणाºया  पावसाची ओढ आणि दुसरीकडे पावसात फोन भिजणार तर नाहीना याची धास्ती. पावसाळ्यात मोबाईल सारख्या साधनांना ओलेपणापासून सर्वात जास्त धोका असतो. एकदा का फोन भिजला की तो बिघडलाच. पण म्हणून कोणी  पावसाळ्यात फोन घरी ठेवून बाहेर पडत नाही ना! फोन तर सोबत हवाच असतो. पाऊस आणि फोन  याचं सुरक्षित सख्य जोडायचं कसं?. 
  पावसापासून वाचवण्यासाठी फोनला  सुरक्षा कवच घालावं लागेल, नेहमीपेक्षा थोडी जास्त काळजी घ्यावी लागेल. 
पावसात मोबाइल पाण्यापासून जपत काही खास काळजी घेतली तर भरपावसात आपल्या खिशात मोबाइल असण्याचं टेन्शन येणार नाही. 
 
1.  सेल्फी स्टिक
बाहेर पाऊस आणि सोबत स्मार्ट फोन असला की सेल्फी काढण्याचा मोह तर होणारच  पण पावसात सारखा सारखा सेल्फी काढण्यासाठी स्मार्ट फोन वापरला तर तो खराब होतो. यासाठी सेल्फी काढण्यासाठी तो हातात न धरता सेल्फी स्टिकवर ठेवणं हे केव्हाही सुरक्षित. सेल्फी स्टिक असली की कितीही सेल्फी आणि ग्रूपी काढता येतात. आता केवळ सेल्फी स्टिक नाही तर सेल्फी स्टिकच किटच मिळतं. त्यात सेल्फी स्टिकसोबत थ्री इन वन लेन्सचं किट मिळतं. या लेन्ससह सेल्फी स्टिक वापरली तर वाईड अ‍ँगलमधला सेल्फी किंवा ग्रूपीही सहज काढता येतो. आणि सेल्फी काढताना ओल्या हातानं न हाताळावा लागल्यानं फोनही सुरक्षित राहतो.
 
2.फोनला रेनकोट
पावसाळ्यात स्मार्ट फोन घेवून निर्धास्त होवून फिरायचं असेल तर फोनला पाण्यापासून वाचवणारा खात्रीशीर पर्याय हवाचं! त्यासाठी थोडे जास्त पैसे खर्च करण्याची तयारी मात्र हवी.  वॉटरप्रूफ केस घेवून त्यात जर स्मार्ट फोन ठेवला तर पावसाळ्यातल्या ओलेपणापासून आपला फोन नक्की वाचतो. या वॉटरप्रूफ केस आता खास स्मार्टफोनच्या मॉडेलनुसार मिळतात. वॉटरप्रूफ केसमध्ये स्मार्ट फोन ठेवल्यानं फोनचे सर्व पोर्ट सुरक्षित राहतात.
 
3. स्क्रीन सांभाळा
पावसाळ्यात हाताचे तळवे ओले असतात  आणि ओल्या हातातून फोन निसटण्याची शक्यताच जास्त. कितीतरी जणांचे स्मार्ट फोन ओल्या हातातून निसटून खाली पडल्यामुळे  त्याची स्क्रीन फुटून खराब होतात.  मोबाइल तोंडावर पडून फुटू नये यासाठी एड्ज टेम्पर्ड ग्लास स्क्रीन प्रोटेक्टर मिळतं ते वापरावं. यामुळे  स्क्रीन ओलेपणापासून  सुरक्षित राहते तशीच स्क्रॅचेसपासूनही. 
4  वॉटरप्रूफ पॉवर बँक
 स्मार्ट फोन चार्ज करण्यासाठी वॉटरप्रूफ पॉवर बँक मिळते. ती वापरल्यास दिवसातून दोनदा स्मार्ट फोनची बॅटरी व्यवस्थित चार्ज होते.  
5.  ब्ल्यू टूथ हेडसेट
फोन जर ब्ल्यू टूथ हेडसेटला जोडून ठेवला तर आलेला फोन घेण्यासाठी, कट करण्यासाठी याच साधनाचा वापर होतो आणि फोन सारखा खिशातून किंवा पर्समधून काढावा लागत नाही. आणि साहजिकच त्याचा बाहेरच्या पावसाच्या पाण्याशी संबंधही येत नाही.  फोन घेण्यासोबत पावसाळ्यात विना अडथळा गाणी ऐकण्यासाठी या ब्ल्यू टूथ हेडसेडचा उपयोग होतो.

Web Title: Did the smartphone take a raincoat?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.