मरना Cancel
By admin | Published: October 9, 2014 06:53 PM2014-10-09T18:53:14+5:302014-10-09T18:53:14+5:30
तरुण जगण्याला अकाली पोखरणार्या वाळवीला अटकाव करायचा, निराशेच्या अंधार्या बोगद्यात शिरून भेदायची मरणाची काळीछाया म्हणून आजच्या अंकात एक विशेष चर्चा. आज आंतरराष्ट्रीय आत्महत्त्या प्रतिबंधक दिन.
Next
रडू, भांडू, झगडू, लढू.
पण मरणार नाही,
स्वत:चा जीव घेत
जगणं नाकारणार नाही.
करता येईल हे
प्रॉमिस स्वत:ला?
१५ ते २९
या वयोगटात जगात
सर्वाधिक आत्महत्त्या
भारतात होतात.
जगात ४0 सेकंदाला
एक माणूस आत्महत्त्या करतो.
आत्महत्त्या करणार्या
तीन व्यक्तींपैकी एक माणूस
दुर्दैवानं भारतीय असतो.
म्हणजेच दर दोन मिनिटाला
भारतात एक व्यक्ती
आत्महत्त्या करते.
भारतातही सर्वाधिक
आत्महत्त्या
महाराष्ट्रातच होतात.
२0१३ मध्ये राज्यात
१६ हजार ६२२ लोकांनी
स्वत:चाच जीव घेतला.
एक माणूस
जेव्हा आत्महत्त्या करतो,
तेव्हा त्याच्यासारख्या
२0 जणांनी स्वत:ला
संपवण्याचे प्रयत्न
केलेले असतात.
गेल्या दशकभरात
भारतातील आत्महत्त्यांच्या
प्रमाणात तब्बल
२२ टक्क्यांनी
वाढ झाली.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com