डाएट कोल्ड्रिंक पिताय? तुम्हाला विस्मरणाचा आजार होवू शकतो
By admin | Published: April 25, 2017 05:33 PM2017-04-25T17:33:05+5:302017-04-25T17:33:05+5:30
अनेकांना वाटतं की डाएट हा शब्द लागला की सगळं पावन होतं. पण तसं नसतं.
Next
>- प्रियंवदा पाटील
कोल्ड्रिंक पिणं आरोग्याला घातक आहे हे तर काय आता आपल्याला माहिती आहे. पण डाएट कोल्ड्रिंक? अनेकांना वाटतं की डाएट हा शब्द लागला की सगळं पावन होतं. पण तसं नसतं. बोस्टन विद्यापिठातील एका सव्र्हेक्षणानुसार सतत सोडायुक्त पेय प्याल्यानं मेंदूच्या पेशींना सुस्ती येते, त्या लहान होतात आणि त्यातून अल्झायमर आणि डीमेन्शिया सारखे आजार होवू शकतात.
अतिरिक्त साखर, कृत्रिम रंग, यांच्या सततच्या सेवनानं कार्डिअॅक रिस्क वाढते. पचन बिघडतं हे तर उघड आहेच. डायबिटिस चा त्रास होवू शकतो.
मात्र हा अभ्यास सांगतो की, अतीरिक्त साखर रक्तात गेल्यानं मेंदूच्या कामावर परिणाम होतो आणि त्यातून विस्मरणाची प्रक्रिया सुरु होते. जलदही होते. आणि जे जास्त डाएट ड्रिंक्स पितात त्यांना तर याचा जास्त त्रास होवू शकतो. त्यातून पुढे अल्झायमर आणि डीमेन्शियाही वाढीस लागू शकतो.
वयाच्या तिशीत असलेल्या 4000 लोकांचं सव्र्हेक्षण केल्यानंतर हे निरिक्षण हाती आलं आहे.