डिजिटल मार्केटिंग- नव्या संधीचं नवं करिअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 05:14 PM2018-08-09T17:14:17+5:302018-08-09T17:28:23+5:30
ऑनलाइन खरेदी-विक्रीसह जाहिरात आणि मार्केटिंगचं जग विस्तारत आहे. या डिजिटल क्षेत्रात आपल्यासाठी नवीन संधी आहेत. त्या कोणत्या?
- ऋ षिकेश पंडित
भारत आज जगातील चीननंतरचा सर्वात जास्त इंटरनेट यूझर असलेला देश आहे. तरीही भारतातील केवळ 35 ते 40 टक्के जनताच इंटरनेटचा वापर करते. विचार करा हा आकडा जर 80 ते 90 टक्के इथर्पयत गेला तर चित्नच काही वेगळं असणार आहे. भारतात आज डिजिटल हा फक्त बझवर्ड राहिला नाहीये. डिजिटल मार्केटिंग भारतामध्ये वेगाने वाढत असलेलं क्षेत्न आहे. 2010 र्पयत डिजिटल मार्केटिंगचा विचार बर्याच कंपन्यांनी गंभीरपणे केला नव्हता. त्या कंपन्या आपापली मार्केटिंग धोरणं बदलायला तयार नव्हत्या आणि पारंपरिक पद्धतीचं मार्केटिंग हा एकच मार्ग अवलंबून आपला ब्रॅण्ड लोकांर्पयत पोहोचवत होत्या.
आणि आज 2018 मध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. कंपन्यांनी डिजिटल मार्केटिंगचा पर्याय नाही वापरला तर बाजारात त्यांना हवा असलेला परिणाम साधता येणं केवळ अशक्य आहे. कारण तुलनात्मकदृष्टय़ा पारंपरिक मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग समोर खूपच अकार्यक्षम वाटायला लागलं आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या घडीला कंपन्यांकडे डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंग धोरण नसेल तर ग्राहक त्यांच्या उत्पादनापासून दूर जातील आणि दुसर्या प्रतिस्पध्र्याकडून त्यांना हवं असलेलं उत्पादन विकत घेतील ही वस्तुस्थिती झालीये. हीच सर्व कंपन्यांची डोकेदुखी होऊन बसली आहे. तसेच डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना नवीन असल्यानं त्यांची उत्पादनं किंवा ब्रॅण्ड लोकांर्पयत पोहोचविण्यासाठी योग्य कौशल्य अवगत असलेल्या लोकांची कमी किंवा तुटवडा कंपन्यांना खूप जाणवत आहे. म्हणून हीच खरी वेळ आहे ती गरज जाणून घेऊन डिजिटल मार्केटिंगच्या अतिशय मनोरंजक दुनियेत पाऊल टाकण्याची!
डिजिटल मार्केटिंगची प्राधान्यक्रमाची गरज प्रत्येक दिवशी कंपन्यांना समजायला लागली आहे. त्यांना हे चांगलेच समजत आहे की डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंगला दुसरा कोणताच चांगला पर्याय उपलब्ध नाही. सध्या कंपन्या देर से आये लेकिन दुरु स्त आये या टप्प्यातून जात आहेत. आणि म्हणून कंपन्यांनी डिजिटल मार्केटिंगचं महत्त्व समजून त्याची कास धरायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे डिजिटल किंवा ऑनलाइन मार्केटिंगला आज महत्त्व आहे, त्याकडे करिअर संधी म्हणून आपण पहायला हवं.
डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठीचे निकष अगदीच साधे आहेत. कोणत्याही (हो अगदी कोणत्याही) शाखेचा पदवीधर डिजिटल मार्केटिंगचं कौशल्य आत्मसात करून या विश्वात उडी घेऊ शकतो, नोकरी मिळवू शकतो. जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंगविषयी जास्तच आकर्षण असेल तर इंटरनेटच ज्ञान असलेली कोणतीही व्यक्ती हे कौशल्य आत्मसात करून नोकरी न करता आपला छोटा व्यवसायदेखील सुरू करू शकते.
डिजिटल मार्केटिंग शिकावं कसं?
आता डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी खूप क्लासेस उपलब्ध आहेत. त्यांचा कालावधी 2 महिने ते 6 महिन्यांर्पयत असू शकतो. त्याचबरोबर इंटरनेटचा वापर करून यू टय़ूब पाहून, ब्लॉग वाचून डिजिटल मार्केटिंगविषयी मूलभूत आवश्यक ज्ञान मिळवता येतं. क्लासची फी काही हजारांत असते, पण क्लास चांगला आहे ना, याची खातरजमा करूनच आपण प्रवेश घ्यावा.
नोकरीच्या संधी कोठे?
डिजिटल मार्केटिंग शिकल्यानंतर विविध प्रकारचं काम करता येईल.
* डिजिटल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
* सर्च इंजिन ऑप्टमायझेशन एक्सक्युटिव्ह
* सोशल मीडिया मार्केटिंग एक्स्पर्ट/ एक्सक्युटिव्ह
* कण्टेण्ट रायटर
* सर्च एंजिन मार्केटर
*कण्टेण्ट मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
* इनबॉउन्ड मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
* कॉपी रायटर
* ई-मेल मार्केटिंग एक्सक्युटिव्ह
* परफॉर्मन्स मार्केटर
(लेखक डिजिटल मार्केटर आहेत.)