प्रेमभंग झालाय, वजन वाढू शकतं.
By admin | Published: April 25, 2017 04:15 PM2017-04-25T16:15:14+5:302017-04-25T16:15:14+5:30
प्रेमभंगाच्या इमोशनल घोळात एक केमिकल लोचा शरीरातही होवू शकतो.
Next
>- चिन्मय लेले
प्रेमभंग.
या विषयात जेवढं लिहू तितकं कमीच.
आणि कितीही लिहा, त्यातला दर्द काही व्यक्त होत नाही.
किंवा कुणी वाटूनही घेवू शकत नाही.
मात्र प्रेमभंगाच्या या सार्या इमोशनल लोच्यात एक केमिकल लोचा शरीरातही होवू शकतो. त्याकडे मात्र कुणी लक्ष देत नाही.
वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रानं अलिकडेच प्रसिद्ध केलेल्या एका बातमीनुसार आता तरुण मुलांमध्ये एक नवीन ट्रेण्ड दिसतो आहे.
त्या ट्रेण्डचं नाव आहे ब्रेकप गेनर!
म्हणजे काय तर प्रेमभंग झाल्याच्या दुर्खात अनेकजण खात सुटतात. जंकफूड खातात. कोल्डड्रिंक पितात. बोअर झालं की चॉकलेट खातात. चहा-कॉफी पितात. त्यानं आपल्या मेंदूला तरतरी येईल असं त्यांना वाटतं.
मात्र मेंदू तसाच जड असतो होतं एवढंच की, त्यामुळे शारिरीक वजन वाढत जातं. त्या वजनानं हार्मोनल घोळ होतात. विशेषतर् मुलींमध्ये. पाळीचे प्रश्न वाढतात. त्यातूनही वजन वाढतं.
आणि मग एकामागून एक चक्र सुरुच राहतं. परिणाम तोच.
वजन वाढ.
त्यातून येणारं डिप्रेशन.
आपल्या रंगरुपाचे प्रश्न.
आणि त्या नैराश्यातून अधिक खाणं हे सारं चक्र अनेक तरुण मुलांमध्ये दिसतं.
प्रेमभंग राहतो बाजूलाच शरीराची वाताहात सुरु होते.