जोकोविच - चॅम्पियन घडण्याची गोष्ट
By admin | Published: June 9, 2016 09:39 AM2016-06-09T09:39:36+5:302016-06-09T09:39:36+5:30
नोवाक जोकोविच टेनिसचा नवा सुपरस्टार. त्याच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धापलिकडे जाऊन त्याला भेटा. चॅलेंज या शब्दाचा नवा अर्थच कळेल. खरंतर जोकोविच म्हणजे एकेकाळी रॉजर फेडररची सावलीच होता आणि राफेल नदालच्या झंझावातात तर त्याचं नाव कुठं दिसतही नव्हतं.
Next
नोवाक जोकोविच टेनिसचा नवा सुपरस्टार. त्याच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धापलिकडे जाऊन त्याला भेटा.
चॅलेंज या शब्दाचा नवा अर्थच कळेल. खरंतर जोकोविच म्हणजे एकेकाळी रॉजर फेडररची सावलीच होता आणि राफेल नदालच्या झंझावातात तर त्याचं नाव कुठं दिसतही नव्हतं. एका दोघांचं नव्हे तर बीग फोरचं आव्हान त्याच्यापुढे होतं. फेडरर, नदाल, स्कॉट आणि मरे. या चौघांसमोर जोकोविच कुठं दिसत होता. पण आज तो दिसतोय.
असा दिसतोय की, त्याचं वर्णनच टेनीसचं जग बीग वन म्हणून करतंय. 29 वर्षाचा मुलगा आणि चार ग्रॅण्ड स्लॅमचा मानकरी.
भविष्यात तो किती ग्रॅण्डस्लम जिंकेल याचा अंदाजच नाही असं टेनीसचं जग म्हणतंय.
पण हा प्रवास सोपा नव्हताच, हे जोकोविचही मान्य करतो. तो म्हणतो फेडरर आणि नदाल ज्या काळात खेळताहेत त्याच काळात आपण खेळतो आहोत याचा खरं सांगतो सुरुवातीला फार आनंद वाटत नव्हताच. पण मी खेळत राहिलो आणि हळूहळू माझं मत बदलत गेलं. माङया लक्षात आलं की, आपल्या आयुष्यात जे जे घडतं, त्यामागे एक कारण असतं. तुम्ही एका विशिष्ट जागी असता किंवा पोहचता, काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात त्यामागे नियतीचा काहीतरी हेतू असतो. तो हेतू हाच की, तुमची वाढ व्हायी. तुम्ही संपूर्णत: बदलून जात आपलेआपणच विकसीत होत जावं. हे एकदा लक्षात आल्यावर मला समजलं की समोर दोन प्रबळ चॅम्पियन आहेत, आपली काय पत्रस असा विचार न करता आपल्याला स्वत:चीच ताकद वाढवायला हवी.
तेच मी केलं.आणि करतोय!
आपली ताकद वाढवत नेणं, यापलिकडे दुसरं काहीच महत्वाचं नाही यशासाठी!’
तो म्हणतोय ते त्यानं करुन दाखवलंय. या सर्बियन तरुणाच्या यशाची पताका आज सर्वात उंच फडकते आहे. भाषांवर जीवापाड प्रेम करणारा, वाचणारा हा खेळाडू. त्याला एक दोन नाही अनेक भाषा बोलता येतात. त्या तो शिकलाय. सर्बियन, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इटालियन एवढय़ा भाषा त्याला येतात.
एक सुपरस्टार नव्हे तर चॅम्पियन कसा घडतो याचं हे एक आपल्यासमोरचं वर्तमानातलं रूप आहे.
नोवाक जोकोविच
-चिन्मय लेले