ऑफिसात तुम्हाला कुणी छळतंय का?

By admin | Published: October 16, 2014 06:41 PM2014-10-16T18:41:30+5:302014-10-16T18:41:30+5:30

ऑफिसात डोक्याला ताप नाही, कुणीच आपल्याला त्रास देत नाही, असं कधी होतं का?

Do anyone harass you in the office? | ऑफिसात तुम्हाला कुणी छळतंय का?

ऑफिसात तुम्हाला कुणी छळतंय का?

Next

- ऑक्सिजन टीम

ऑफिसात डोक्याला ताप नाही,
कुणीच आपल्याला त्रास देत नाही, असं कधी होतं का?
म्हणजे भले आपल्याला कुणी त्रास देवो ना देवो, आपण स्वत:ला ‘त्रास’ करून घेतोच. जेलस होतो. आपल्याही नकळत ऑफिस पॉलिटिक्सचा भाग होतो.
कामाचा भाग असं म्हणून हे सारं सोडलं आणि स्पर्धेत अपरिहार्यच आहे सारं मानलं तरी प्रत्यक्षात मात्र हा विषय जरा गांभीर्यानं पहायला हवा.
अलीकडेच एण्टरप्राईज इनोव्हेशन या अमेरिकेतील संस्थेनं एक सर्व्हे प्रसिद्ध केला. आयटी फिल्ड पुरताच हा सर्व्हे र्मयादित आहे. मात्र तो अभ्यास जे म्हणतोय तो धक्कादायक आहे. आयटी क्षेत्रातील ७५ टक्के लोकांनी असं कबूल केलंय की, त्यांचा ऑफिसमध्ये मानसिक छळ होतो. आणि या मनस्तापामुळे कामावरचं लक्ष उडतं. ६७ टक्के लोक सांगतात की, आपल्याला एकाच माणसानं जास्त छळलं तर ३३ टक्के लोकांनी सांगितलंय की ऑफिसमधल्या एका टोळक्यानं आपल्याला बरेचदा टार्गेट केलं.
हा अभ्यास गांभीर्यानं घेत जरा आपल्या अवतीभोवती पाहिलं तर असं दिसतं की, असा त्रास नव्यानं नोकरीला लागलेल्या अनेकांना सहन करावा लागतो. पण नोकरी जाऊ नये, आपला अधिक छळ होऊ नये म्हणून अनेकजण तोंड बांधून हा बुक्क्याचा मार सहन करतात.
मात्र गप्प बसल्यानं हा त्रास कमी होत नाही. तो वाढतच जातो.
साप भी मर जाए और लाठी भी ना तुटे अशा अत्यंत नाजूकपणे आपण हा प्रश्न सोडवला पाहिजे.
त्यासाठी न घाबरता काही गोष्टी नक्की करायला हव्यात, तरच आपलं कामात लक्ष लागेल!


ऑफिसात मानसिक छळ होतोय? हे करा.

1) नाही म्हणा.
एखाद्या गोष्टीनं तुम्हाला वारंवार त्रास दिला जात असेल तर आपल्याला हे आवडत नाही, असं पुन्हा करू नका हे शांतपणे मात्र धीटपणे, तरीही नम्रपणे स्पष्ट सांगा. भांडू नका, पण खमके व्हा.
2) शांत रहा
तुम्ही चिडावं, काहीतरी बोलावं, चरफडावं हेच समोरच्याला अपेक्षित असतं. तुम्ही शांत राहिलात आणि आनंदी दिसलात तर त्याचा वार बसत नाही. त्यामुळे शांत रहा, पण त्याला सांगा की, तू जे करतोय ते मला कळतं. तुम्ही चिडून काही बोललात तर त्याचं ऑफिसात भांडवल होऊन गोष्टी तुमच्या विरोधात जाण्याची शक्यताच जास्त.
3) शक्य असेल तर तुमच्या बॉसला एकदा स्पष्टपणे सांगा. पण सूर तक्रारीचा नको तर आपण कानावर गोष्टी घालतोय असा ठेवा. एकदाच सांगा, चहाड्या करू नका.
4) आवश्यक असेल तर एचआरवाल्यांना एक कॉन्फिडेन्शियल मेल लिहा.
5) असेलच काही भांडण तर ते मिटवा, तुम्ही वाढवू नका. सहनच नाही झालं तर एकदा चारजणांना एकत्र घेऊन सोक्षमोक्ष लावा. भांडण विसरून जा, पण ती वृत्ती मात्र लक्षात ठेवून सावध रहा.

Web Title: Do anyone harass you in the office?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.