आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

By admin | Published: April 10, 2017 05:55 PM2017-04-10T17:55:37+5:302017-04-10T17:57:28+5:30

वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.

Do not live for us, little for yourself! | आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

आपण जगू ना, आपल्यासाठी थोडं तरी!

Next

- वैशाली भगवानराव खंडागळे
ता. जि. परभणी
गुढीपाडवा झाला. अजून आपण त्यावेळी आलेले शुभेच्छांचे फोटो डिलीट करतो आहोत.
निमित्त काहीही असो गुढीपाडवा किंवा १ जानेवारी सोशल मिडियांवर फॉरवर्ड होणारे मेसेज आणि फोनवर शुभेच्छांचा वर्षाव होतो.
वाटतं त्यापलिकडे उरलंय का काही या दिवसांचं नाविन्य? मारे संकल्प केले तरी ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठी फारसे कष्टही आपण घेत नाही.
अर्थात भरमसाठ संकल्प करून अर्धवट सोडण्यापेक्षा आणि त्याचं ओझं वागवण्यापेक्षा सहज सोपं आपल्याला जमल आणि झेपेल असं काही तरी करूयात ना! सोशल मिडिया आपला कितीतरी वेळ फुकट जातो; आणि त्यापलिकडे आपल्याला काही दिसत नाही आणि आपण ते पहायचा प्रयत्न ही करत नाही.
मग एक छोटसं काम नक्कीच करू शकतो आपण की सोशल मिडियावर वाया जाणारा वेळ हळूहळू कमी करू शकतो. ओझं न घेता केलं की जमतं सगळं. त्यामुळे आपल्याला आपले छंद जोपसण्यास वेळ मिळेल.
तणावयुक्त जीवनामध्ये आपल्याला स्वत:साठी वेळ नाही. सतत धावपळ, दगदग, ताणतणाव आणि उदासिनता मग यामध्ये स्वत: करता वेळच कुठे आपल्याला? स्वत:च्या शरीरासोबत मनही निरोगी ठेवणं फार गरजेचं आहे. व्यायाम आणि आवडणाऱ्या गोष्टीकरता रोज वेळ कसा काढायचा हे ठरवायला हवं. ते केलं तर आपल्याला आपलंच आयुष्य भारी वाटू शकेल. 
आयुष्यात ज्यांना मनापासून सॉरी म्हणायच त्यांना भेटून सॉरी म्हणणं एवढं कुठं अवघड आहे? आपल्याकरता सतत काहीतरी करणाऱ्या लोकांना तुम्ही माझ्याकरता किती महत्त्वाचे आहात हेही सांगूच ना एकदा तरी. खूप दिवसापासून राहून गेलेलं कामाचा आजपासूनच शुभारंभ करू. आणि काहीच नाही तर ‘एक उनाड दिवस’ मनसोक्त जगत आयुष्यावर भरभरून प्रेम करू.

 

Web Title: Do not live for us, little for yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.