गाईड नको, डोकं सांभाळा!
By admin | Published: June 9, 2016 12:06 PM2016-06-09T12:06:29+5:302016-06-09T12:06:29+5:30
जर आपल्याला आयुष्यात अचूक रस्ता धरायचा असेल तर कुणालातरी मार्गदर्शक म्हणून निवडलं पाहिजे.बरोबर ना? कुठे पिकनिकला चाललो असेल तरी कुणीतरी गाईड लागतो दिशा दाखवायला .मम्मी पप्पा पण म्हणतात, ‘ती चौथ्या मजल्यावरची पिंकी बघ, दहावीला तिला 94% मार्क मिळाले, तिचा गाईड म्हणून उपयोग कर.
Next
>जर आपल्याला आयुष्यात अचूक रस्ता धरायचा असेल तर कुणालातरी मार्गदर्शक म्हणून निवडलं पाहिजे.बरोबर ना? कुठे पिकनिकला चाललो असेल तरी कुणीतरी गाईड लागतो दिशा दाखवायला .मम्मी पप्पा पण म्हणतात, ‘ती चौथ्या मजल्यावरची पिंकी बघ, दहावीला तिला 94% मार्क मिळाले, तिचा गाईड म्हणून उपयोग कर.
हे सगळं ठीक आहे हो पण याच गाईड नावाच्या गोष्टीनं आपलं डोकं निकामी केलंय, कल्पकता शून्यावर पोहोचवली आहे. याची सुरूवात पाचवीपासूनच होते. मोठी माणसे म्हणतात ‘वाचाल तर वाचाल’. पण मला वाटतं ‘या गाईडला वाचाल तर फसाल’. आज मी या गाईडला चांगलं खडसवणार आहे आणि जाब विचारणार आहे, आज याच्यामूळेच माङया बुद्धीला गंज लागला आहे.
त्या दिवशी मॅडम म्हणाल्या आई वर निबंध लिहून आणा, तेव्हा हे गाईड म्हणालं, ‘ माङया 385 नंबरच्या पानावर आई निबंध आहे’. कर कॉपी. पण माङया आईविषयी लिहायचं तर असं कॉपी करुन कसं चालेल. मग गाईड मिटलं नी माझं मी लिहिलं.
जे गाईडच तेच प्रश्नसंचाचंही.
आळशी मुलांसाठी काठावर पास होण्याची उत्तम सोय. वर्षभर मस्ती, टाईमपास, टवाळक्या करायच्या आणि परिक्षेच्या एक दिवस आधी यातून अभ्यास करून ढकलपास व्हायचं. या रेडिमेडमुळे आम्ही पुस्तकच वाचणं बंद केलं.
अनेकांच्या बुद्धिमत्तेचा जीवच घेतलाय त्यांनी. दहावीत मार्क भरपूर, पुढेही गाईड, रेडिमेड नोट्स, प्रश्नचिन्हं आहेतच सोबत पण स्वत:ची निर्णयक्षमता, विषय समजणं सारं बंद.
अती होतंय हे सारं, निदान आपण आपल्यापुरतं तरी पुस्तकांना जवळ करत, गाईडला नाही म्हणू.
- राम दादाभाऊ पंडित
वाचक कट्टा
हा कट्टा खास तुमच्यासाठी.
मनातलं सारं शेअर करण्याची एक खास जागा. तुमचाही लेख या वॉलवर झळकू शकतो. या कट्टयावर त्याची चर्चा होऊ शकते.
तेव्हा लिहा आणि तुमचे लेख आम्हाला oxygen@lokmat.com
वर मेल करा.
निवडक लेखांना या वाचक कट्टय़ावर झळकण्याची संधी